परीक्षेसह अभ्यास… रासायनिक अभिक्रियांचा 2 🎷

 

परीक्षेसह अभ्यास… रासायनिक अभिक्रियांचा 2 🎷


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇

👉 माहिती विज्ञानाची 🎷

🎉 खालील अभ्यासक्रमावर लगेच एक छोटीशी परीक्षा👇 एकदम शेवटी. 🙏

🌼 रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय?

 ज्या अभिक्रियेत अभिक्रियाकारक किंवा अभिक्रियाकारकामध्ये बदल होऊन नवीन गुणधर्माचा पदार्थ किंवा नवीन गुणधर्मांचे पदार्थ तयार होतात त्यास रासायनिक अभिक्रिया म्हणतात.


रासायनिक बदल हे अपरिवर्तनीय असतात.


🌴 आज आपण रसायनिक अभिक्रियांचे प्रकार पाहणार आहोत.


1. संयोग अभिक्रिया : – ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन किंवा दोन पेक्षा अधिक अभिक्रियाकारकंपासून केवळ एकच उत्पादित मिळते त्यांना संयोग अभिक्रिया असे म्हणतात.

A) हायड्रोजन वायू हवेत जाळला असता पाणी तयार होते.

2H2+ O2 = 2H2O


B) लोहाची गंधका बरोबर अभिक्रिया झाल्यावर आयर्न सल्फाइड तयार होते.

Fe+ S = FeS

 

बऱ्याच वेळेस दोन पेक्षा अधिक अभिक्रियाकारकांचे उदाहरण दिले जात नाही त्यामुळे हे unique उदाहरण

C) चुन्याच्या निवळीतून दीर्घकाळ कार्बन डाय-ऑक्साइड वायू प्रवाहित केला असता कॅल्शियम बायकार्बोनेट हे एकच उत्पादित तयार होते .

CaCO3+ H2O+ CO2 = Ca(HCO3)2


2. अपघटन अभिक्रिया :- केवळ एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळत असतील तर त्या रासायनिक अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात.

CaCO3 = CaO + O2

कॅल्शियम कार्बोनेटला 1000° C उष्णता दिली असता कॅल्शियम ऑक्साईड तयार होऊन कार्बन डाय-ऑक्साइड वायु मुक्त होतो.



3. विस्थापन अभिक्रिया : – ज्या रासायनिक अभिक्रियेत जास्त क्रियाशील मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्याची जागा घेऊन नवीन पदार्थ तयार होतात त्या रासायनिक अभिकेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात.


कॉपर सल्फेट च्या द्रावणात जस्ताचा चुरा टाकला असता जस्त धातु तांब्याची जागा घेते व झिंक सल्फेट तयार होऊन तांबे विस्थापित होते.

Zn + CuSO4 = ZnSO4 + Cu 


4. दुहेरी विस्थापन अभिक्रिया :-

ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया कारकांच्या मुलकात आदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे तयार होतात व एक अवक्षेप तयार होतो त्यास दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात.


बेरियम क्लोराइडची सोडियम सल्फेट बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराइड व पांढऱ्या रंगाचा बेरियम सल्फेट चा अवक्षेप तयार होतो .

या रासायनिक अभिक्रियेला अवक्षेपण अभिक्रिया असे पण म्हणतात.

BaCl2 + Na2SO4 = BaSO4 + 2NaCl


5. उदासीनिकरण अभिक्रिया :- ज्या रासायनिक अभिक्रियेत आम्लाची आम्लारी बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते त्यास उदासीनीकरण अभिक्रिया असे म्हणतात.

HCl + NaOH = NaCl + H2O


6. उष्माग्राही अभिक्रिया :- ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता ग्रहण केली जाते ( शोषली जाते) त्यास उष्माग्राही रासायनिक अभिक्रिया म्हणतात.


पाण्यात साखर टाकली असता उष्णता ग्रहण केली जाते.

H2O(l) + C12H22O11 (s) = C12H22O11 (aq)


7. उष्मादाई रासायनिक अभिक्रिया :- ज्या रासायनिक अभिक्रिये उष्णता बाहेर पडते त्यास उष्मादाई रासायनिक अभिक्रिया म्हणतात.

सोडियम धातूचा तुकडा पाण्यात टाकल्यास खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर पडते , या क्रियेत सोडियम हायड्रॉक्साइड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो.

2Na + 2H2O = 2NaOH + H2


8. रेडॉक्स अभिक्रिया :- ज्या रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिडीकरण व क्षपन दोन्ही क्रिया एकाच वेळेस होतात त्यास रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतात .

मुद्दा सातव्यातील उदाहरण येथे लागू होते.



शीघ्र अभिक्रिया :- जी रासायनिक अभिक्रिया अत्यंत जलद गतीने घडून येते त्यास शीघ्र/ जलद अभिक्रिया असे म्हणतात. उदा. A. सोडियम धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया हि शीघ्र अभिक्रिया आहे.(मुद्दा सातवा) 

B. आम्लाची आम्लारी बरोबर अभिक्रिया हि शीघ्र अभिक्रिया आहे.



9. मंद अभिक्रिया :- जी अभिक्रिया घडून येण्यास अत्यंत जास्त वेळ लागतो त्यास मंद अभिक्रिया असे म्हणतात.

 उदा. लोखंडाचे गंजणे

Fe2O3 ·nH2O


10. ज्वलन अभिक्रिया:– ज्या अभिक्रियेत पदार्थ जलद जळून उष्णता बाहेर पडते त्यास ज्वलन अभिक्रिया असे म्हणतात.

2H2 + O2 = 2H2O

@@@—@@@

🌅 वरील अभ्यासक्रमावर लगेच एक छोटीशी परीक्षा. 🥁 उत्तर हे एका शब्दात किंवा दोन शब्दात रिकाम्या जागेतील शब्दाप्रमाणे लिहावे.

https://forms.gle/AWMWokTRA2VpFeuT7



*🙏 सुमधुर स्नेह वंदन।🙏*

*जल्दबाजी में किया गया विश्वास*

*और मेहनत के बिना लगाई गई आस,*

 *इन दोनों का परिणाम धोखा ही होता है।*

*🙏आपका हर दिन 

मंगलमय और सुखमय हो।🙏*