अभ्यास….. रासायनिक अभिक्रियांचा 3 🎷
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील👇 निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा.
🥁 या लेखावर आधारित छोटीशी गुगल फॉर्म परीक्षा 👇
🥥 पहिल्या लेखात रासायनिक अभिक्रियाचा सखोल अभ्यास कसा करावा हे शिकलोत , त्यामध्ये मूलद्रव्य , संज्ञा , इलेक्ट्रॉन संरुपण , संयुजा , मुलक व रासायनिक अभिक्रिया लिहिण्याचे नियम आपण पाहिलोत.
दुसऱ्या लेखात रासायनिक अभिक्रियांचे मुख्य चार प्रकार व इतर सहा असे एकूण दहा प्रकार पाहिलोत.
आज रासायनिक अभिक्रियेस मदत करणारे / सहकारी पाहू , म्हणजेच रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक पाहू.
रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक खालील प्रमाणे.
1. रासायनिक अभिक्रियांचे स्वरूप :- ॲल्युमिनियम Al व जस्त Zn यांची विरल हायड्रोक्लोरिक आम्ला (HCl) बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन हायड्रोजन H2 वायू मुक्त होतो.
पण ॲल्युमिनियमचा Al रासायनिक अभिक्रियेचा वेग जस्ता पेक्षा जास्त असतो.
मूलद्रव्याच्या क्रियाशीलतेवर रासायनिक अभिक्रियेचा दर अवलंबून असतो. धातूचे स्वरूप हे रासायनिक अभिक्रियेच्या दरातील फरकाला कारणीभूत असते.
2. अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार :- रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान तेवढा रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त.
उदा. शहाबादी फरशी व शहाबादी फरशीची भूकटी/ पूड/ चूर्ण यांची विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता शहाबादी फरशीची भूकटी ची रासायनिक अभिक्रिया जलद होते.
कारण रासायनिक अभिक्रियेत पृष्ठभाग जेवढा जास्त उपलब्ध होतो तेवढा रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त असतो.
3. रासायनिक अभिक्रियेचे तापमान :- रासायनिक अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो , रासायनिक अभिक्रिया घडत असताना तापमान वाढल्यास रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वाढतो. रासायनिक अभिक्रियेत उष्णतेचे चिन्ह बाणावर त्रिकोण ने दाखवले जाते.
4. उत्प्रेरक :-
ज्या पदार्थाच्या केवळ अल्प उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर/ वेग वाढतो, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात.
उदा 1. वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करताना निकेल Ni या उत्प्रेरकाचा वापर केला जातो.
उदा 2. पोटॅशिअम क्लोरेट (KCIO3 ) ला उष्णता दिली असता मंदगतीने ऑक्सिजन वायू बाहेर पडतो. पण पोटॅशियम क्लोरेट ला मॅग्नीज डाय-ऑक्साइड MnO2 या उत्प्रेरकासोबत तापवले असता जलद गतीने ऑक्सिजन वायू बाहेर पडतो.
5. अभिक्रियाकारकांची संहती :- संहती म्हणजे तीव्रता.
- द्रावण= द्रावक +द्राव्य
- ज्या द्रावणामध्ये द्राव्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते, त्या द्रावणाला सौम्य किंवा विरल द्रावण असे म्हणतात.
- ज्या द्रावणामध्ये द्राव्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असते, त्या द्रावणाला तीव्र किंवा संहत द्रावण असे म्हणतात.
- अभिक्रियाकारकांची संहती जेवढी जास्त तेवढा रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त.
पुढील परीक्षा देताना शॉर्ट answer सर साठी मोजका शब्द लिहा.
💯 या भागावरील छोटीशी परीक्षा देण्यासाठी पुढील निळ्या लिंकला स्पर्श करा. 🎺
https://forms.gle/wtULyZ9J3ybmUDWn8
*रांगोळी ही पुसली जाणार आहेहे माहीत असून देखीलआपण ती अतिशय सुबकआणि रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो.**तसेच आपलं आयुष्य हेकधीतरी संपणारच आहेते अधिक सुंदरआणि सुंदर जगण्याचा प्रयत्न करा.**🥥 नारळी पौर्णिमा 🥥 व🪢रक्षाबंधनाच्या 🪢हार्दिक शुभेच्छा…!!!**आपला दिवस आनंदी जावो.*🎺