9 वी. प्रकाशाचे परावर्तन

 प्रकाशाचे परावर्तन

प्रकाश हे खरे तर विद्युत चुंबकीय तरंग होत ज्यामुळे दृष्टीची संवेदना निर्माण होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आरश्याची व्याख्या :- आरसा म्हणजे असा पृष्ठभाग जो प्रकाश परावर्तित करतो आणि स्पष्ट अशी प्रतिमा तयार करतो.

आरशाचे दोन प्रकार आहेत सपाट आरसा आणि गोलीय आरसा.

गोली आरशाचे दोन प्रकार आहेत

अ. अंतर्वक्र आरसा 

ब. बहिर्वक्र आरसा

काचे पासून आरसा कसा तयार करतात ? 

काचे पासून आरसा तयार करण्यासाठी गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ असा ॲल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा लेप दिला जातो. परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागास संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक ले पावर लेड ऑक्साईड Pb3O4  सारख्या पदार्थाचा लेप दिला जातो

आभासी प्रतिमा :- जेव्हा प्रकाश किरण प्रत्यक्ष एकमेकांना न भेटता प्रतिमा तयार करतात तेव्हा त्यास आभासी प्रतिमा म्हणतात. आभासी प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही.

सपाट आरशाद्वारे तयार होणारी प्रतिमा स्त्रोता एवढीच असते.

आरशाद्वारे तयार होणाऱ्या प्रतिमेचे सूत्र

विविध कोना मध्ये दोन आरसे ठेवले असता प्रतिमांची संख्या तक्त्यात दाखवली आहे.

n – प्रतिमांची संख्या ,   A – आरशा मधील कोन 

A         | n

————–

15      |    2

30      |    11

45      |   18

60       |   05

90       |   03

120     |  02

आपण आरशामध्ये आपली संपूर्ण प्रतिमा केव्हा पाहू शकतो ? 

आरशामध्ये व्यक्तीची संपूर्ण प्रतिमा पहायची असेल तर त्या व्यक्तीच्या अर्ध्या उंचीचा आरसा असणे आवश्यक आहे.

गोलिय आरशाच्या संदर्भात मुद्दे

1. बहिर्वक्र आरसा :- गोली आरशाचा बाह्य पृष्ठभाग जर परावर्तक असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा असे म्हणतात.

2. अंतर्वक्र आरसा :- गोली आरशाचा आतील पृष्ठभाग जर परावर्तक असेल तर त्यास अंतर्वक्र आरसा असे म्हणतात.

3. ध्रुव :- आरशाच्या मध्यास ध्रुव P असे म्हणतात .

4. वक्रता केंद्र :- आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र C असे म्हणतात.

5. वक्रता त्रिज्या :- आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या त्रिजेस वक्रता त्रिज्या R असे म्हणतात.

6. मुख्य अक्ष:- ध्रुव आणि वक्रता केंद्र यामधून जाणाऱ्या सरळ रेषेला मुख्य अक्ष असे म्हणतात.

7. मुख्य नाभी

A. अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी :- अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावरील एका बिंदूत एकवटतात त्या बिंदूला त्या आरशाची मुख्य नाभी F असे म्हणतात.

B. बहिर्वक्र आरशाची मुख्य नाभी: बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तना नंतर आरशा मागील मुख्य अक्षा वरील एका विशिष्ट बिंदू पासून आल्यासारखे भासतात. या बिंदूला बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी F म्हणतात.

नाभीय अंतर :- आरशाचा ध्रुव P आणि नाभी C यांच्यातील अंतराला नाभीय अंतर f म्हणतात.

वरील संकल्पना पाठ न करता आपणास समजण्यासाठी खालील प्रतिमा उपयुक्त ठरते

.

नेहमी लक्षात ठेवावे की नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते.

अंतर्वक्र आरशा समोरील पदार्थाची प्रतिमा किरणाकृतीने काढण्यासाठी प्रकाश परावर्तनाचे नियम.

* नियम 1 :- मुख्य अक्षाला समांतर असणारे आपत्ती किरण परावर्तनानंतर मुख्य नाभीतून F जातात.

* नियम 2 :-मुख्य नाभीतून F जाणारे आपत्ती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर असतात.

* नियम 3 :- जे आपत्ती केली वक्रता मध्यातून C जातात ते परावर्तित होऊन त्याच मार्गाने परत जातात.