10 वी, विज्ञान I, भिंग व त्यांचे उपयोग..1. 🎷

10 वी, विज्ञान I, भिंग व त्यांचे उपयोग..1. 🎷

भिंगांचे उपयोग

A. चष्म्यामध्ये 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

B.घड्याळ दुरुस्तीसाठी 

c.सूक्ष्मदर्शक microscope आणि दूरदर्शिकेमध्ये telescope.

D.घराच्या पुढच्या दारातील नेत्रगोल.

🥁 बहिर्वक्र भिंगांचे आकारावरून तीन प्रकार पडतात.

अंतर्वक्र भिंगांचे आकारावरून तीन प्रकार पडतात

🎷 व्याख्या बहिर्वक्र भिंग :- ज्या भिंगाचा मध्यभाग हा फुगीर असून दोन्ही टोकांना निमुळता होतो त्यास बहिर्वक्र भिंग म्हणतात.

2. बहिर्वक्र भिंगाद्वारे दोन प्रकारच्या प्रतिमा मिळतात वास्तव आणि आभासी.

3. बहिर्वक्र भिंगाद्वारे सर्व आकाराच्या प्रतिमा मिळतात बिंदुरूप , पदार्थापेक्षा लहान , पदार्थाच्या आकाराची , मोठी अत्यंत मोठी .

4. बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर हे धन + ve असते.

 

🥁 व्याख्या अंतर्वक्र भिंग :- 

1. ज्या भिंगांचे दोन्ही पृष्ठभाग आतील बाजूने गोलीय असतात त्यांना (द्विअंतर्वक्र) अंतर्गोल भिंग म्हणतात.

2. अंतर्वक्र भिंग हा मध्यभागी निमुळता असतो

3. अंतर्वक्र भिंगाद्वारे केवळ आभासी प्रतिमा मिळते.

4. अंतर्वक्र भिंगा द्वारे केवळ दोन आकारांच्या प्रतिमा मिळतात बिंदू रूप आणि पदार्थापेक्षा लहान.

5. अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर ऋण -ve असते.

वरील मुद्दे घेऊन आपण अंतर्वक्र भिंग व बहिर्वक्र भिंग यातील फरक उत्तमरीत्या लिहू शकतो.

व्याख्या प्रकाशाचे अपवर्तन :- एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश किरण जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात.

भिंगातून प्रकाश जाताना त्या प्रकाशाचे दोनदा अपवर्तन होते.

आज भिंगांच्या संदर्भात काही व्याख्या पाहू.

1. वक्रता केंद्र :- भिंग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र C असे म्हणतात.

2. वक्रता त्रिज्या :- भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना वक्रता त्रिज्या R म्हणतात.

3. मुख्य अक्ष :- भिंगांच्या वक्रता केंद्रातून C जाणाऱ्या काल्पनिक सरळ रेषेला मुख्य अक्ष असे म्हणतात.

4. प्रकाशिय केंद्र O :- भिंगाच्या ज्या बिंदूतून प्रकाश किरण जाताना थोडेही विचलित होत नाहीत अशा मुख्य अक्षावरील एका बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र O म्हणतात.

5. A. बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी :- बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे अपाती किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावरील एका बिंदूत एकवटतात त्या बिंदूला त्या भिंगाची मुख्य नाभी F असे म्हणतात.


B.
अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी :- अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे अपाती किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावरील एका बिंदूतून अपसारित ( दूर )झाल्याचा भास होतो त्या बिंदूस त्या भिंगाची मुख्य नाभी F असे म्हणतात.


6. नाभी अंतर f :- भिंगाची मुख्य नाभी F व प्रकाशकीय मध्य O यामधील अंतराला नाभीय अंतर म्हणतात.

🎷 कोणत्या तीन नियमांचा वापर करून भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांची किरणाकृती काढता येते? 

1. मुख्य अक्षाला समांतर असणारा अपाती किरण अपवर्तनानंतर मुख्य नाभीतून F जातो.

2 . मुख्य नाभीतून F जाणारा प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर असतो.

3. भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून O जाणारा आपाती किरण त्याची दिशा न बदलता सरळ जातो.

🥁 बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध सहा प्रतिमा

1. वस्तूचे स्थान :- अनंत अंतरावर

प्रतिमेचे स्थान :- नाभीवर F2

 प्रतिमेचा आकार :- बिंदूरूप 

प्रतिमेचे स्वरूप :- वास्तव व उलट.

2. वस्तूचे स्थान :- 2F1 च्या पलीकडे 

R S  – पदार्थ ,  R’ S’ – प्रतिमा 

प्रतिमेचे स्थान :- F2 आणि 2F2 च्या दरम्यान.

 प्रतिमेचा आकार :- लहान 

प्रतिमेचे स्वरूप :- वास्तव व उलट.

3. वस्तूचे स्थान :- 2F1 वर 

X Y  – पदार्थ.   X’ Y’ – प्रतिमा

प्रतिमेचे स्थान :- 2F2 येथे

प्रतिमेचा आकार :- वस्तु एवढाच ( समान आकाराची)

 प्रतिमेचे स्वरूप :- वास्तव व उलट.

4. वस्तूचे स्थान :- F1 आणि 2F1 च्या दरम्यान.

Object – पदार्थ  ,    Image – प्रतिमा

 प्रतिमेचे स्थान :-मोठी प्रतिमा

 प्रतिमेचे स्वरूप :- वास्तव व उलट.

5. वस्तूचे स्थान :- नाभी F1 वर 

Object – पदार्थ , Image – प्रतिमा

प्रतिमेचे स्थान :- अनंत अंतरावर 

प्रतिमेचा आकार :- विशालित ( मोठी प्रतिमा ) 

प्रतिमेचे स्वरूप :- वास्तव व उलट.

6. वस्तूचे स्थान :- नाभी F1 व प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान.

Image – प्रतिमा

प्रतिमेचे स्थान :- वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजूस

प्रतिमेचा आकार :- विशालित / मोठी प्रतिमा 

प्रतिमेचे स्वरूप :- आभासी व सुलट.