10 वी. विज्ञान I, भिंग व त्यांचे उपयोग… 2 🎷

 10 वी. विज्ञान I, भिंग व त्यांचे उपयोग… 2🎷

आपण भिंगा द्वारे मिळणाऱ्या  सहा वेगवेगळ्या प्रतिमांचा अभ्यास केला. पण याच सहा प्रतिमा जर आपण एकाच आकृतीत काढू शकलो तर लक्षात ठेवण्यास हे सोयीस्कर जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सहा प्रतिमा लक्षात ठेवण्यासाठी च्या काही युक्त्या

1.  जसा जसा पदार्थ भिंगाकडे सरकतो ,तशी तशी प्रतिमा मुख्य नाभीपासून  दूर जाते.( प्रथम पाच आकृत्यांसाठी )

2. पदार्थ जसा जसा भिंगाकडे सरकतो तसतशी प्रतिमा ही आकाराने मोठी मोठी होत जाते.

🎷 अंतरगोल भिंगा द्वारे मिळणाऱ्या प्रतिमा

1. वस्तूचे स्थान :- अनंत अंतरावर .

प्रतिमेचे स्थान :- नाभी F1 वर 

प्रतिमेचा आकार :- बिंदूरूप 

प्रतिमेचे स्वरूप :- आभासी व सुलटी

2. वस्तूचे स्थान :- प्रकाशीय केंद्र O व अनंत अंतर यामध्ये कोठेही.

प्रतिमेचे स्थान :- प्रकाशीय केंद्र O व नाभी F1 च्या मध्ये 

प्रतिमेचा आकार :- पदार्थापेक्षा लहान. 

प्रतिमेचे स्वरूप :- आभासी व सुलट

🎻 भिंगासाठी कार्टेशियन चिन्ह संकेत

1. पदार्थ नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवावा.

2. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे प्रकाशिय मध्यापासून O मोजावीत.

3. A. प्रकाशीय मध्याच्या उजवीकडील सर्व अंतरे धन +ve मानावित तर

B. प्रकाशीय मध्याच्या डावीकडे मोजली जाणारी सर्व अंतरे ऋण -ve मानावीत.

4. A. मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजली जाणारी अंतरे धन मानावित.

B. मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे ऋण मानावेत.

5. A. बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर धन मानावे , 

B. अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर ऋण मानावे

🎺  भिंगाचे सूत्र

u – पदार्थाचे प्रकाशीय केंद्र पासूनचे अंतर

v – प्रतिमेचे प्रकाशीय केंद्र पासूनचे अंतर

f – भिंगाचे नाभीय अंतर.

🥁.  विशालन m

Magnification 

एखाद्या भिंगामुळे होणारे विशालन m प्रतिमेच्या उंचीचे h2 वस्तूच्या उंचीशी h1 असणारे गुणोत्तर होय.

m – विशालन

h1 – पदार्थाची उंची

h2 – प्रतिमेची उंची

u – पदार्थाचे प्रकाशीय केंद्र पासूनचे अंतर

v – प्रतिमेचे प्रकाशीय केंद्र पासूनचे अंतर

🎷 भिंगाची शक्ती power of lens

 भिंगाची शक्ती ( P ) म्हणजे आपाती प्रकाश किरणांचे अभिसरण किंवा अपसरण करण्याची क्षमता. 

भिंगाची शक्ती ही भिंगाच्या नाभीय अंतरावर अवलंबून असते . भिंगाची शक्ती ही डायॉप्टर (D) मध्ये मोजतात.

🎸 मानवी डोळा.👁️

मानवी डोळ्याची आकृती काढत असताना जो भाग आपण काढत आहोत त्या भागाची माहिती करून घ्यावी म्हणजे आकृती कायम लक्षात राहते.

मानवी नेत्र गोलाचा व्यास सुमारे 2.4 cm असतो.

डोळ्याचे स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर 2 cm असते.

👁️ सुस्पष्टदृष्टीचे लघुत्तम अंतर

मानवी डोळ्याला ताण न येता निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती स्पष्टपणे दिसते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी ( निकटबिंदू ) सुस्पष्टदृष्टीचे लघुत्तम अंतर 25 cm असते.

👀 सुस्पष्टदृष्टीचे अधिकतम अंतर.

मानवी डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे दिसू शकते त्यानंतर आला सुस्पष्टदृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात निरोगी मानवी डोळ्यासाठी दूर बिंदू अनंत अंतरावर असतो म्हणून आपण चंद्र , तारे सहज पाहू शकतो.

A. पारपटल :- मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पडदा असतो त्याला पारपटल म्हणतात.

कार्य :- डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन करणे.

B. बुबुळ :- पारपाटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो त्यास बुबुळ म्हणतात.

कार्य:- योग्य प्रमाणात प्रकाश किरण बाहुली कडे पाठवणे.

बाहुली :- बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यास डोळ्याची बाहुली असे म्हणतात.

कार्य:- डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करणे.

नेत्रभिंग :- डोळ्याच्या बाहुलीच्या मागे पारदर्शक बहिर्गोल भाग असतो त्यास नेत्रभिंग म्हणतात.

कार्य :- नेत्रभिंगामुळे पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते.( पण मेंदू दृष्टी पटलावरील संकेतांचा अर्थ स्पष्ट करतो आणि या क्रियेतून पदार्थाची जशी आहे तश्या प्रतिमेचे आपणास आकलन होते )

रोमक स्नायू / समायोजित स्नायू :-  यांच्यामुळे नेत्रभिंगाचा आकार योग्य पद्धतीने बदलता येतो. ज्यावेळेस आपण जवळची वस्तू पाहतो त्यावेळेस नेत्र भिंगाचा आकार कमी होऊन नाभीय अंतर हे कमी झाल्यामुळे जवळच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा डोळ्यांमध्ये तयार होते. ज्यावेळेस आपण दूरच्या वस्तू पाहतो त्यावेळेस समायोजित स्नायूमुळे नेत्रभिंगाचे नाभीय अंतर वाढते व दूरच्या वस्तू आपण स्पष्टपणे पाहू शकतो यास डोळ्याची समायोजन शक्ती असे म्हणतात.

दृष्टीपटल :- डोळ्याचा पडदा  म्हणजेच दृष्टीपटल हे एक संवेदनशील पटल म्हणजे पडदा आहे.

 कार्य :- प्रकाशाच्या उद्दीपनास प्रतिसाद देऊन विद्युत संकेत निर्माण करने.

नेत्रचेता  / दृष्टीचेता :- दृष्टी पटलावरील विद्युत संकेत मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवणे.

कार्य :- मज्जातंतूद्वारे पाठवलेल्या संदेशांचे अर्थ व्यक्त करणे आणि वस्तू जशी आहे तसे आपणास आकलन होणे.