10 वी. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे…🎷

 10 वी. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे…🎷

या पाठावर आधारित एक छोटीशी MCQ परीक्षा👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

संज्ञा:- मूलद्रव्याच्या अदयाक्षररुपी संक्षेपात त्या मूलद्रव्याची संज्ञा असे म्हणतात. उदाहरणार्थ हायड्रोजन –  H

लोह/आयर्न – Fe 

* मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूंचे प्रकार कोणकोणते आहेत?

उत्तर:- 1. मूलद्रव्य धातू Na,Mg,Al, अधातू S,Cl,N आणि धातुसदृश्य Si,As,Sb, या प्रकारात येतात.

2. A. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग म्हणतात. B.संयुगांत घटक मूलद्रव्यांचे प्रमाण निश्चित असते उदा FeS — 7:4. C. संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात.

* व्याख्या A. संयुजा:- 

द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असे म्हणतात. किंवा 

मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात.

B. रासायनिक अभिक्रिया:- पदार्थांमधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होऊन पूर्णतः नवीन व कायमस्वरूपी उत्पादित मिळते त्या प्रक्रियेस रासायनिक अभिक्रिया म्हणतात.उदा:


3. रासायनिक समीकरण:- रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेची संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण म्हणतात.उदा:- 


* विविध संयुगांची रासायनिक रेणूसुत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते? संयुगांची रेणूसुत्रे कशी लिहितात.

उत्तर:- मूलद्रव्यांची संज्ञा व संयुजा माहीत असल्यास आपणास संयुगांचे रासायनिक रेणुसूत्र लिहिता येते. संयुगांची रेणूसुत्रे लिहिताना आयनांची संख्या संज्ञाच्या उजव्या खालच्या बाजूला लिहितात. रासायनिक सूत्र मिळवताना संयुजाचा तिरकस गुणाकार करतात.उदा…


* भौतिक बदल

1. भौतिक बदलामध्ये केवळ पदार्थाची भौतिक अवस्था बदलते जसे स्थायू, द्रव, वायू .

2. भौतिक बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा बदल आहे.

3. भौतिक बदलात मूळ पदार्थ सहजासहजी मिळवता येतो.

4. भौतिक बदलात कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही.

* रासायनिक बदल:-

1. रासायनिक बदलात पदार्थांच्या भौतिक तसेच रासायनिक गुणधर्मात बदल होतात.

2. रासायनिक बदल हा कायमस्वरूपी असतो.

3. रासायनिक बदलात मूळ पदार्थ मिळवता येईलच असे निश्चित नसते. उदा a.दुधाचे दह्यात रूपांतर झाल्यावर दह्यापासून दूध मिळवता येत नाही. b. कैरी पिकल्यावर अंबा तयार होतो, आंब्यापासून कैरी मिळवता येत नाही.

4. रासायनिक बदलात एक किंवा अधिक नवीन पदार्थ तयार होतात.

🎺 वरील मुद्द्यावरून आपणास भौतिक बदल व रासायनिक बदल हा फरक लिहिता येतो.


* रासायनिक अभिक्रियेचे महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर:- 1. रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचे रूपांतर हे उत्पादितामध्ये होते.

2. रासायनिक अभिक्रियेत एकूण वस्तुमान अक्षय्य राहते.

3. रासायनिक अभिक्रियेत अणूंची एकूण संख्या कायम असते.

4. रासायनिक अभिक्रियेत तयार होणाऱ्या उत्पादित घटकांचे प्रमाण व गुणधर्म हे अभिक्रिया कारकांच्या घटकांचे प्रमाण व गुणधर्म यापेक्षा वेगळे राहतात.

5. रासायनिक अभिक्रियेत सामान्यतः ऊर्जेचे उत्सर्जन(बाहेर पडणे) किंवा शोषण होते.


*रासायनिक अभिक्रिया लिहिताना वापरण्यात येणारे चिन्ह संकेत कोणते?

उत्तर:- रासायनिक अभिक्रिया लिहिताना पुढील चिन्ह संकेतांचे पालन करावे.

1. समीकरणाच्या डाव्या बाजूला नेहमी अभिक्रिया कारके लिहावीत, तर उजव्या बाजूला उत्पादिते लिहावीत.

2. दोन किंवा दोनपेक्षा अधिक अभिक्रिया कारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये ”अधिक” ( + ) चे चिन्ह लिहावे.

3. रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवण्यासाठी अभिक्रियाकारकंपासून उत्पादितंकडे जाणारा बाण दर्शवावा.

जर रासायनिक अभिक्रियेस उष्णता दिली जात असेल तर बाणावर ∆ असे चिन्ह काढावे.

4. काही रासायनिक अभिक्रियेमध्ये उत्प्रेरकांचा दाब किंवा ठराविक तापमान विचार करावा लागतो अशा वेळेस या बाणावर लिहाव्यात.

5. रासायनिक समीकरणाचा संपूर्ण अर्थबोध होण्यासाठी त्यांच्या भौतिक अवस्था लिहाव्यात, जसे स्थायू (s) ,द्रव (l),वायू(g).

6. जर रासायनिक अभिक्रियेत वायू बाहेर पडत असतील तर वरच्या दिशेने बाण दर्शवावा.  अवक्षेप तयार होत असतील तर खालच्या दिशेने बाण दर्शवावा. जर अभिक्रिया कारके किंवा उत्पादिते जलीय द्रावणात असतील तर त्यांच्यापुढे (aq) असे लिहावे.

7. अभिक्रियाकारक किंवा उत्पादित यांची विशेष माहिती किंवा त्यांची नावे रेणुसूत्रा खाली लिहावीत.


* रासायनिक अभिक्रियांचे चार प्रकार आहेत

1 संयोग अभिक्रिया  

2.अपघटन अभिक्रिया 

3.विस्थापन अभिक्रिया,

4.दुहेरी विस्थापन अभिक्रिया.


* संयोग अभिक्रिया ( combination reaction):- ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन किंवा दोन पेक्षा अधिक अभिक्रियाकारकांपासून केवळ एकच उत्पादित मिळते त्या रासायनिक अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात.

उदा. 1 हायड्रोजन वायू हवेत जाळला असता पाणी तयार होते.

2H2 + O2  —->  2H2O

2.मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते

अपघटन अभिक्रिया (decomposition reaction):- ज्या रासायनिक अभिक्रियेत केवळ एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या रासायनिक अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात.

@ अपघटन अभिक्रियांचे तीन प्रकार आहेत

A. औष्णिक अपघटन अभिक्रिया:- ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया कारकाला उष्णता देऊन त्याचे विघटन केले जाते त्या अभिक्रियेला औष्णिक अपघटन अभिक्रिया म्हणतात.

उदा. कॅल्शियम कार्बोनेटला 1000°C पर्यंत तापवल्यास त्याचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड CaO तयार होते व या क्रियेत कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो.

B. विद्युत अपघटन अभिक्रिया:- ज्या रासायनिक अभिक्रियेत संयुगाच्या द्रावणातून किंवा द्रविभूत (aq) संयुगातून विद्युत धारा प्रवाहित करून त्या संयुगाचे विघटन केले जाते, त्या अभिक्रियेला विद्युत अपघटन अभिक्रिया असे म्हणतात.

C.फोटोलाइटिक विघटन /प्रकाशाच्या क्रियेद्वारे रेणूंचे विघटन(प्रकाश अपघटन)(photolytic decomposition reaction):- सूर्य प्रकाशाच्या द्वारे जेव्हा पदार्थाचे विघटन होते तेव्हा त्यास फोटोलाइटिक विघटन असे म्हणतात.

सिल्वर ब्रोमाईडला सूर्यप्रकाशात उघडे ठेवल्यास चांदी व ब्रोमीन वेगळे होतात.


3. विस्थापन अभिक्रिया (displacement reaction):- ज्या रासायनिक अभिक्रियेत एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात.

उदा. कॉपर सल्फेट च्या द्रावणात लोखंडी खिळा टाकला.

कॉपर सल्फेट च्या निळसर मोरपंखी द्रावणात लोखंडी खिळा टाकला असता लोहा द्वारे तांब्याचे विस्थापन होऊन हिरव्या रंगाचे आयर्न सल्फेट तयार होते.


4. दुहेरी विस्थापन अभिक्रिया (double displacement reaction):- ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन अभिक्रियाकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन दोन नवीन उत्पादिते तयार होतात व त्यात एक अवक्षेप असतो अशा अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात.

उदा. सोडियम क्लोराइड च्या द्रावणात सिल्वर नायट्रेटचे द्रावण मिसळले असता

सोडियम क्लोराइड च्या द्रावणात सिल्वर नायट्रेटचे द्रावण मिसळले असता, सिल्वर क्लोराइड चा पांढऱ्या रंगाचा अवक्षेप बनतो व सोडियम नायट्रेट चे द्रावण तयार होते.

* उष्माग्राही अभिक्रिया (endothermic reaction):-  ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते, त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात.

उदा. साखर पाण्यात टाकली असता


साखर पाण्यात टाकली असता ती पाण्यात विरघळते या अभिक्रियेत उष्णता शोषली जाते त्यामुळे द्रावणाचे तापमान कमी होते.


*उष्मादायी अभिक्रिया (exothermic reaction):- ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात.

उदा.सोडियम धातू पाण्यात टाकला

सोडियम धातू पाण्यात टाकला असता सोडियम हायड्रॉक्साइड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो या क्रियेत प्रचंड उष्णता बाहेर टाकली जाते.


* रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते?

उत्तर:-रासायनिक अभिक्रियेच्या दरावर एकूण पाच घटक परिणाम करतात, ते पुढील प्रमाणे.

1. अभिक्रिया कारकांचे स्वरूप (nature of reactants):- धातूचे स्वरूप म्हणजेच त्यांची क्रियाशीलता रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करते.

उदा. कॅल्शियम व जस्त धातूची विरल हायड्रोक्लोरिक अमला बरोबर अभिक्रिया होऊन त्या धातूंचे क्षार तयार होतात व या क्रियेत हायड्रोजन वायू मुक्त होतो पण जस्ट धातूच्या तुलनेत कॅल्शियम धातूची अमलाबरोबर जलद अभिक्रिया होते कारण कॅल्शियम हा जास्त पेक्षा जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहे.

2. कणांचा आकार ( size of particles):- रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिक्रियाकारकांच्या कणाचा आकार जेवढा लहान तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो.

उदा. शहाबादी फरशी चे तुकडे व शहाबादी फरशीचा चुरा/ पुड/भुकटी यांची विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास शहाबादी फरशी ची पुड/भुकटी ताबडतोब आम्लाबरोबर विरघळते व कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर पडण्याचा दर जास्त असतो, त्या तुलनेत फरशीसोबत रासायनिक अभिक्रिया मंद गतीने होते.

3. संहती:-  रासायनिक अभिक्रियेचा वेग हा अभिक्रिया कारकांच्या संहतीवर म्हणजेच तीव्रतेवर अवलंबून असतो. उदा. सहज हायड्रोक्लोरिक आम्लाची कॅल्शियम कार्बोनेट बरोबर जलद अभिक्रिया होते त्या तुलनेत विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर   अभिक्रिया मंदपणे होते.

4. तापमान:- रासायनिक अभिक्रियेचा वेग हा तापमान वाढवल्यास जलद गतीने होतो.

उदा सामान्य तापमानाला स्थायुरूप कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन होत नाही. पण तापमान 1000°C पर्यंत वाढवल्यास त्याचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईडCaO व कार्बन डाय-ऑक्साइड CO2 तयार होतात.

5. उत्प्रेरक:- 

व्याख्या:- ज्या पदार्थाच्या केवळ अल्प उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजेच वेग वाढतो परंतु त्या पदार्थांमध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थांना उत्प्रेरक म्हणतात.

उदा KClO3 पोटॅशियम क्लोरेटला उष्णता दिल्यावरही रासायनिक अभिक्रियेचा वेग म्हणजेच दर वाढत नाही. पण मॅग्नीज डाय-ऑक्साइड MnO2 या उत्तप्रेरकाच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रिया जलद होऊन ऑक्सिजन O2 वायू बाहेर पडतो.


या पाठावर आधारित एक छोटीशी MCQ परीक्षा

https://forms.gle/dATaFTmhUSEvTG4e6


*जीवनात काही व्यवहार करतांना ,          

फायदाच बघायचा नसतो               

आपल्या मुळे इतरांना मिळालेला ,              आनंद बघायचा असतो…                  

ओंजळ आनंदाने भरलेली असताना ,             ती सांडायच्या आत इतरांना                            त्यातले देता आले पाहिजे….!*🎷