🙏🌹💐 *” दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना,*
*जरी छोटी वाटत असली तरी,
तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकत लपलेली असते.”*
गाठभेट 2 ..🎷 शास्त्रीय कारणांची..
*. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो.
*मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग करतात.
*. रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते, मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात.
* पाव तयार करताना फुगतो.
* . शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते.
*अंतर आणि विस्थापन या वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
* पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवतात.
*. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक
स्नायू म्हणतात.
* अणु घड्याळ अचूक असते.
*. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते.
*. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करावी.
* डासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही.
* नैसर्गिक वायू हे पर्यावरण स्नेही इंधन आहे.
* संश्लिष्ट अपमार्जके ही साबनापेक्षा सरस आहेत.
*. आकाश दिवसा निळे दिसते.
*. तेल पाण्यात मिसळत नाही; परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की, तेल व पाणी एकजीव होते.
* दगडी कोळसा Black Gold म्हणून ओळखला जातो.
*. वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते.
*आपले वस्तुमान चंद्र आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणी एक सारखे असते.
* 5°C तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.
* पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये.
*. स्थितिक विद्युत चे प्रयोग पावसाळ्यात यशस्वी होत नाहीत.
*. हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी.
* कीटक भक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.
* सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.
*जुन्या काळी रेल्वे गाडी कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत.
* अवकाशात किंवा चंद्रावर आवाज ऐकू येत नाही.
*दगडफूल हे सहजीवी पोषणाचे उदाहरण आहे.
*अमरवेलीला चूषक मुळे असतात.
*. लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते.
* एकात एक अडकलेल्या दोन स्टेनलेस स्टीलच्या वाट्या वेगळ्या करण्यासाठी त्या तापवाव्या लागतात.
* हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्या पेक्षा थंड लागतो.
*. कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही.
*. त्सुनामीच्या आपत्तीपासून लोकांचा जीव वाचवता येतो.
*. कोरडया केसातून वेगाने फिरवलेल्या प्लास्टिकच्या कंगव्याकडे कागदाचे तुकडे आकर्षिले जातात.
*. चाकावर लोखंडाची धाव बसवताना गरम करून बसवतात.
*धातुच्या रिकाम्या भांड्याला काठीने आघात केल्यावर होणारा आवाज त्या भांड्यास बोटाने स्पर्श करताच थांबतो.
* वस्तूचे वजन स्थळ परत्वे बदलते मात्र वस्तूमान सर्वत्र स्थिर राहते.
( व्याख्या- वस्तुमान, वजन, भिन्न गुरुत्वीय त्वरण )
उत्तर:-1. व्याख्या- वस्तुमान:- वस्तू मधील द्रव्य संचायाला वस्तुमान (m) असे म्हणतात. वस्तुमान म्हणजे जडत्वाचे गुणात्मक माप आहे.
2.व्याख्या वजन:- वस्तूवर कार्य करणाऱ्या गुरुत्व बलाला त्या वस्तूचे वजन म्हणतात. पृथ्वीवर गुरुत्वीय त्वरण सगळीकडे सारखे नसते. W=mg या सूत्रानुसार वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते.
* आपण पृथ्वी पेक्षा चंद्रावर उंच उडी मारू शकतो.
(गुरुत्वीय त्वरण फरक)
उत्तर:- 1.चंद्रावर गुरुत्वीय त्वरण (1.63 m/S^2) पृथ्वीवरील गुरुत्वीय त्वरणा(9.8 m/s^2) पेक्षा 1/6 ने कमी आहे.
2. h=u^2/2g या सूत्राचा विचार केल्यास असे सिध्द होते की, आपण ठराविक आरंभ वेगाने (u) पृथ्वीपेक्षा चंद्रावर जास्त उंच उडी मारू शकतो.
* एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.
( व्याख्या, बाहयतम कवच,संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान )
उत्तर:- 1 मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या बाहयतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरते.
2. एकाच गणाचा विचार केला असता गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दर्शवतात.
3. उदा. गण 7 मधील मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 7 आहे . त्यामुळे त्या सर्व मूलद्रव्यांची संयुजा ही 1 येते. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे.
* गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.
(व्याख्या, नवीन कवच, अंतर, केंद्रकीय प्रभार कमी, आकर्षण बल कमी )
उत्तर:- 1. अणुचे केंद्रक ते बाह्यतम कवच यामधील अंतराला अणुत्रिज्या म्हणतात. अणुच्या त्रिज्ये वरून अणुचा आकार ठरतो.
2. गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडत जाते, त्यामुळे अणु केंद्र ते बाह्यतम कवच अंतर वाढते. अंतर वाढल्यामुळे केंद्रकीय प्रभार कमी होतो इलेक्ट्रॉन वरील आकर्षण बल कमी होते म्हणून गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.
* खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डब्बा वापरणे योग्य ठरते.
(ऑक्सिडीकरण, चव, वास, )
उत्तर:- 1. जर खाद्यतेल हवेच्या संपर्कात आले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते. या क्रियेत त्यास खवटपणा प्राप्त होतो. याचाच परिणाम तेलाची चव व वास बदलणे यात होते.
2. पण जर खाद्यतेल हवाबंद डब्यात ठेवले तर त्याचा ऑक्सिजनशी संपर्क तुटतो त्यामुळे ते दीर्घकाळ टिकते.
(याचबरोबर ऑक्सिडीकरण विरोधकाचा वापर पण केला जातो)
* चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते. व कार्बन डाय-ऑक्साइड वायू दीर्घकाळ प्रवाहित केल्यास ती रंगहीन होते.
( रासायनिक अभिक्रिया, कॅल्शियम कार्बोनेट- दुधाळ कॅल्शियम बायकार्बोनेट- रंगहीन)
उत्तर:- 1. चुनखडी 1000°C पर्यंत तापवली असता तिचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड CaO व कार्बन डायऑक्साइड CO2 वायू तयार होतो.
2. हा तयार झालेला कार्बन डायऑक्साइड चुन्याच्या ताज्या निवळीतून थोडा वेळ पाठवला असत कॅल्शियम कार्बोनेट मुळे CaCO3 निवळी दुधी रंगाची होते. या चित्रावरून दीर्घकाळ कार्बन डाय-ऑक्साइड प्रवाहित केला तर कॅल्शियम बायकार्बोनेट CaHCO3 मुळे चुण्याची निवळी रंगहीन बनते.
* विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात.
(विद्युत सुवाहक, रोधकता, ऊष्णता)
उत्तर:- 1. तांबे Cu व ॲल्युमिनियम Al हे धातू उत्तम विद्युत सुवाहक आहेत.
2. याचबरोबर तांबे व ॲल्युमिनियम यांची रोधकता ही खूप कमी आहे त्यामुळे निर्माण होणारी उष्णता ही कमी असते. म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात.
* घरगुती वीज जोडणीस भूसंपर्क तार आवश्यक आहे.
(उपकरणात दोष, प्लॅस्टिक आवरण, जमीन , विभव)
उत्तर:- 1. आपण वापरत असलेल्या उपकरणातील दोषामुळे जर व्यक्तीचा संपर्क उपकरणाच्या धातू भागाशी आला तर तीव्र विजेचा धक्का बसून जीवित हानी होऊ शकते. कारण वीजयुक्त तार व उदासीन तार यांच्यामधून 220 volt व्होल्ट इतके विभवांतर असते.
2. तसेच तारांचे प्लॅस्टिक आवरण निघून गेल्यास त्यातून खूप मोठ्या प्रमाणात विद्युतधारा वाहू लागते व यातून खूप मोठी उष्णता निर्माण होते.
3. पण भूसंपर्क तार जमिनीस जोडलेली असेल तर शून्य विभाव असलेल्या जमिनीकडे वीज वाहू लागते, वरील अपघातापासून बचाव होतो.
म्हणून घरगुती वीज जोडणीस भूसंपर्क तार आवश्यक आहे.
* विद्युत इस्त्री, टोस्टर यासारख्या साधनांमध्ये शुद्ध धातू ऐवजी नायक्रोम च्या संमिश्रा चा उपयोग करतात.
(तत्त्व -औष्णिक परिणाम, रोधकता, ऑक्सिडीकरण)
उत्तर :- 1. विद्युत इस्त्री, टोस्टर यासारख्या साधनांचे कार्य हे विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर अवलंबून असते.
2. नायक्रोम [Ni+Cr+(Fe)] या संमिश्रची रोधकता खूप जास्त आहे. (तांबे या धातूच्या 66 पट).नायक्रोनचे ऑक्सिडीकरण न करता त्यास उच्च तापमानापर्यंत तापवता येते. पण असे शुद्ध धातूंच्या बाबतीत करता येत नाही.
म्हणून विद्युत इस्त्री, टोस्टर यासारख्या साधनांमध्ये शुद्ध धातू ऐवजी नायक्रोम च्या संमिश्रा चा उपयोग करतात.
* विद्युत वाहक तारेपासून चुंबकसूची दूर नेल्यास चुंबकसूचीचे विचलन कमी होत जाते.
(चुंबकीय क्षेत्र, अंतर )
उत्तर:- 1. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असल्यास विचलन जास्त होते तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असल्यास चुंबकसूची चे विचलन कमी होते. चुंबकसूची चे विचलन हे त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्रावर अवलंबून असते.
2. विद्युत वाहक तारेपासून जसजसे दूर जावे, त्या प्रमाणात विद्युत धारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होत जाते.
म्हणून विद्युत वाहक तारेपासून चुंबकसूची दूर नेण्यास चुंबकसूची चे विचलन कमी होत जाते.
* वितळतार तयार करण्यासाठी कमी वितळणांक असलेल्या पदार्थाची तार वापरतात.
(प्रमाणाबाहेरील विद्युत धारेला प्रतिबंध, एकसर जोडणी)
उत्तर:- 1. विद्युत उपकरणातून मर्यादेबाहेर विद्युत धारा जाऊन उपकरणांचे व विद्युत परिपथाचे नुकसान टाळण्यासाठी वितळतार परीपथात एकसर जोडणी जोडतात.
2. परिपथातील वाढीव विद्युत धारा परिपथातून गेली तर तारेचे तापमान वाढते, त्यामुळे वितळतार खंडित होते.
म्हणून वितळतार तयार करण्यासाठी कमी वितळणांक असलेल्या पदार्थाची तार वापरतात.
* थंड प्रदेशात गोठलेल्या तलावात सुद्धा मासे जिवंत राहू शकतात.
( पाण्याचे असंगत आचरण, बर्फाची घनता )
उत्तर:- 1.थंड प्रदेशात हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0°C पेक्षा कमी होते याचा परिणाम तलाव गोठतात.
2. तलावाच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान 4°C झाले की त्या पाण्याचे आकारमान कमी झाल्यामुळे ते जड होऊन तळाशी जाते. तलावाच्या सर्व पाण्याचे तापमान 4°C होईपर्यंत ही क्रिया चालू राहते.
3. नंतर पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान 0°C होऊन पाण्याच्या पृष्ठभागावर बर्फाचा थर तयार होतो. बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक असल्यामुळे बर्फाखाली 4°C पाणी राहते. या 4°C पाण्यात मासे जिवंत राहू शकतात.
🎷 *एसटी बसमध्ये बसलेल्या मुलीला कंडक्टर म्हणाला, “हा तूझा मोबाईल तूला आयुष्यात खूप पुढे नेईल”*
*कॉलेजकुमार आनंदाने म्हणाला, “अरे व्वा, कसं काय?”*
*कंडक्टर म्हणाला, “तूझा स्टॉप मागे जाऊन दीड तास झालाय”*
😂😅😆😁🤣