- Top 10, 10th Class part I, अवकाश मोहिम
* अच्छी सुरत हो तो, अच्छी बात है
*अच्छी सुरत से ज्यादा मायने अच्छा स्वभाव रखता है !**सुरत तो उम्र के अनुसार बदल जायेगी ,**पर अच्छा स्वभाव आपका जीवनभर साथ देगा..*
🎷 कृत्रिम उपग्रहाचे प्रकार
उपग्रहांच्या कार्यानुसार त्यांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.
- हवामान उपग्रह – हवामानाचा अंदाज व अभ्यास करण्यासाठी.
- दळणवळण उपग्रह – जागतिक संपर्क व दूरसंचार
- ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह – दूरचित्रवाणी कार्यक्रमासाठी.
- दिशादर्शक उपग्रह – पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची स्थान निश्चिती व भूजल वायू वाहतुकीचे नियंत्रण व सुसंचालन यासाठी.
- सैनिकी उपग्रह – लष्करी संरक्षण दृष्टिकोनातून पृथ्वीवरील ठिकाणांची माहिती मिळवणे सीमारेषांचे निरीक्षण करणे यासाठी.
- पृथ्वी निरीक्षक उपग्रह – संपूर्ण पृथ्वीचे नियमितपणे सर्वांग निरीक्षण व माहिती संकलन करण्यासाठी.
🥁 कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमण कक्षा.
- व्याख्या:- उपग्रहांचा ग्रहाभवती फिरण्याचा/ परिक्रमा करण्याचा मार्ग म्हणजे भ्रमण कक्षा.
- उपग्रहांच्या कार्यावरून त्यांची भ्रमण कक्षा ठरते.
- कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा म्हणजे उपग्रहाचा पृथ्वीभोवती भ्रमण/परिक्रमा (फिरणे) करण्याचा मार्ग होय.
- उपग्रहांची भ्रमण कक्षाही वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असू शकते. उपग्रहांची भ्रमण कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्ताला समांतर किंवा कोन करणारी असू शकते.
- उपग्रहांच्या पृष्ठभागापासूनच्या उंचीनुसार त्यांच्या कक्षेचे तीन प्रकार पडतात.
A. उच्च भ्रमण कक्षेचे उपग्रह (HEO- High Earth orbit)
B.मध्यम भ्रमण कक्षेचे उपग्रह (MEO – medium Earth orbit)
C.निम्न भ्रमण कक्षेचे उपग्रह ( LEO- low earth orbit)
🎷 उच्च भ्रमण कक्षेचे उपग्रह (HEO- High Earth orbit)
- व्याख्या:- पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35780 किलोमीटर किंवा अधिक उंचीवरील कृत्रिम उपग्रहांना उच्च भ्रमणकक्षेचे उपग्रह म्हणतात.
- उच्च भ्रमण कक्षेच्या उपग्रहांना भूस्थिर उपग्रह (Geosynchronous satellite) म्हणतात.कारण उपग्रहांची पृथ्वीभोवती परिभ्रमणाची दिशा व पृथ्वीची परिवलनाची दिशा एकच असते त्याच सोबत उपग्रहाचा पृथ्वीभोवतीचा परिभ्रमण कालावधी व पृथ्वीचा परिवलन कालावधी एकच असतो. अशा उपग्रहांची पृथ्वी सापेक्ष स्थिती ही स्थिर असल्याचा भास होतो
- उपयोग:-उच्च कक्षा उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात हवामानशास्त्र, दूरसंदेशवहन, दूरचित्रवाणी, आकाशवाणीचे प्रसारण यासाठी उच्च भ्रमण कक्षेचे उपग्रह वापरले जातात.
🥁 मध्यम भ्रमण कक्षेचे उपग्रह
व्याख्या:-भूपृष्ठापासून 2000 km ते 35780 km यांची दरम्यान असलेल्या कृत्रिम उपग्रहांना मध्यम भ्रमण कक्षेचे उपग्रह म्हणतात.
कक्षा:- या उपग्रहांची कक्षा लंबवर्तुळाकार असते आणि हे उपग्रह उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेशावरून मार्गक्रमण करतात. या कक्षांना ‘ध्रुवीय कक्षा’ असे म्हणतात. हे उपग्रह 2 ते 24 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतात.
उपयोग:- ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासास उपयुक्त. दिशा-दर्शक उपग्रह या कक्षामध्ये भ्रमण करतात.
🎻 निम्न भ्रमण कक्षेचे उपग्रह
- व्याख्या:- भूपृष्ठ पासून 180 km ते 2000 km या उंची दरम्यान असलेल्या कृत्रिम उपग्रहांना निम्न भ्रमण कक्षेचे उपग्रह म्हणतात.
- कक्षांच्या उंचीनुसार जवळपास 90 मिनिटात यांचे एक परिभ्रमण पूर्ण होते. आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक(International Space Station) , हबल दुर्बीण हे याच कक्षामध्ये परिभ्रमण करतात.
- उपयोग:- शास्त्रीय प्रयोगासाठी अथवा हवामान अभ्यासासाठी.
शास्त्रज्ञांच्या मते एका अंदाजानुसार काही वर्षात पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांची संख्या दहा लाखापर्यंत पोहोचेल. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 9 हजाराहून अधिक उपग्रह स्थापित करण्यात आले आहेत त्यापैकी पाच हजाराहून अधिक स्टार लिंग चे आहेत हे एक प्रकारचे तारा मंडळ आहे जे पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात इंटरनेट सेवा स्थापित करण्यासाठी स्पेस एक्स तयार करत आहे हे पूर्ण करण्यासाठी हजारो उपग्रह पाठवायचे आहेत. सौजन्य 🙏 12 जानेवारी 2024 दिव्य मराठी आवृत्ती छत्रपती संभाजीनगर.