Elements, Symbols,and At.No. & Valency,मूलद्रव्य, संज्ञा, अणुअंक, आणि संयुजा.
*🙏 सुमधुर सस्नेह वंदन।🙏*
*मेरे कर्म ही मेरी पहचान बने तो बेहतर है।*
*चेहरा का क्या है, वो तो मेरे साथ चला जायेगा।*
*🙏आपका हर दिन मंगलमय और सुखमय हो।🙏*
दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सॲप
ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हावे. जॉईन होण्यासाठी निळ्या लिंक ला स्पर्श करावा.
👇What’s app link 👇
–> 🔴माहिती विज्ञानाची 🎷 🔴
ग्रुप वर जॉईन का व्हावे? याचे कारण….
• आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.
• दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो.
• एखाद्याने प्रश्न विचारला व आपल्याला त्या प्रश्नाचे जर उत्तर देता आले तर तो आनंद वेगळाच असतो.
• तुम्ही विद्यार्थी आहात तर शिकले पाहिजे, वयाने मोठे भाऊ-बहीण आहात तर लहान मुलांना अभ्यासात मदत करता आली पाहिजे, पालक आहात तर मुलांचा अभ्यास घेता आला पाहिजे, आजोबा/ आजी आहात तर नातवाच्या प्रश्नांचे उत्तर देता आले पाहिजे.
• विज्ञानातील बराचसा भाग हा शाश्वत आहे, त्यामुळे बरेच विज्ञान आपल्याला आले पाहिजे.
• देशाची प्रगती करायची असेल तर शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत. शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी विज्ञान समजले पाहिजे.
• आणखीन कितीतरी कारणे आपणास सांगता येतील, यासाठी सस्नेह निमंत्रण🙏🎷
* मूलद्रव्य
- एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य.
- एखाद्या पदार्थाचे इतके साधे-सोपे रूप, ज्याचे अन्य कोणत्याही रूपात रासायनिक प्रक्रियेने विघटन करता येणार नाही, त्याचबरोबर त्याचे सर्व अणु हे एकसारखे आहेत, त्यास मूलद्रव्य म्हणतात.
* अणुअंक:- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉनच्या (p) संख्येला अणुअंक असे म्हणतात.
🎷संयुजा:-
- द्विक किंवा अष्टस्थिती प्राप्त करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असे म्हणतात.
- मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात.
🎻 मूलद्रव्यांचा प्राथमिक अभ्यास करत असताना एक ते वीस अणुअंक असलेली मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा आपणास माहित असाव्यात.
मूलद्रव्य संज्ञा अणुअंक संयुजा
हायड्रोजन H 1 1
हेलियम He 2 —
लिथियम Li 3 1
बेरिलियम Be 4 2
बोरॉन B 5 3
कार्बन C 6 4
नायट्रोजन N 7 3
ऑक्सिजन O 8 2
फ्ल्युओरिन F 9 1
निऑन Ne 10 —
सोडियम Na 11 1
मॅग्नेशियम Mg 12 2
ॲल्युमिनियम Al 13 3
सिलिकॉन Si 14 4
फॉस्फरस P 15 3 & 5
सल्फर /गंधक S 16 2
क्लोरीन Cl 17 1
अरगॉन Ar 18 —
पोटॅशियम. K 19 1
कॅल्शियम Ca 20 2
वीस मूलद्रव्यांचा अभ्यास झाल्यावर आपल्याला काही मूलद्रव्य , त्यांच्या संज्ञा व त्यांच्या संयुजा यांचे ज्ञान हवे.
मॅग्नीज Mn 25 2
आयर्न Fe 26 2 & 3
कोबाल्ट Co
निकेल Ni 2
तांबे Cu 1 & 2
जस्त Zn 2
ब्रोमीन Br 1
चांदी Ag 1
कथिल Sn
आयोडीन I 1
टंगस्टन W
सोने Au
पारा Hg
वरील काही मूलद्रव्यांचे अणुअंक व संयुजा दिल्या नाही कारण त्यांची विशेष गरज भासत नाही.
* काही निष्क्रिय वायू मूलद्रव्य आपणास माहीत हवेत जसे वर हेलियम (He), निऑन(Ne), अरगॉन (Ar) त्याच सोबत आणखीन काही मूलद्रव्य आपणास माहीत हवेतच.
क्रिप्टॉन Kr
झेनॉन Xe
रेडॉन Rn
* बोरॉन (B), सिलिकॉन (Si) हि मूलद्रव्य आपण पाहिली, पण त्याच सोबत काही धातूसदृश्य मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा आपणास आल्या पाहिजेत.
जर्मेनियम Ge
अँटीमनी Sb
टेल्यूरियम Te
पोलोनियम Po
व्याख्या: जी मूलद्रव्य धातू व अधातू यांचे गुणधर्म दर्शवतात त्यांना धातुसदृश्य असे म्हणतात. ही मूलद्रव्य डावीकडील धातूंना उजवीकडील अधातूपासून वेगळे करतात.
🎺 गण 1 मध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, सीसीअम Cs, फ्रान्सिअम (Fr ) ही मूलद्रव्ये येतात. या मूलद्रव्यांना अल्क धातू असे म्हणतात.
🥁 गण 2 मध्ये बेरिलियम (Be), मॅग्नेशियम (Mg), कॅल्शियम (Ca) स्टोन्शियम (Sr), बेरियम(Ba), रेडियम (Ra) ही मूलद्रव्ये येतात. गण 2 मधील मूलद्रव्यांना अल्कधर्मी मृदा धातू असे म्हणतात.
🎸 गण 17 मधील मूलद्रव्यांना हॅलोजन मूलद्रव्य असे संबोधतात. कारण यांची हायड्रोजन बरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यावर ही मूलद्रव्य आम्ल तयार करतात.
उदा: फ्ल्युओरीन (F), क्लोरीन (Cl), ब्रोमीन (Br) आयोडीन (I), एस्टाटिन (At)
🪇 तीन संयुजा दर्शवणारी मूलद्रव्य म्हणजे बोरॉन (B) व ॲल्युमिनियम (Al)
😀 चार संयुजा दर्शवणारी मूलद्रव्य ही कार्बन (C) व सिलिकॉन (Si) ही आहेत.
😊 परिवर्ती संयुजा दर्शवणारे मूलद्रव्य.
1. तांबा (Cu), Cu+ –> Cuprous क्युप्रस
Cu++ –> कॉपर
2. पारा (Hg) Hg+ –> मर्क्युरस
Hg++ –> मर्क्युरीक
3. लोहा (Fe). Fe++ –> आयर्न
Fe+3 –> फेरीक
4. टिन (Sn) टिन हे मूलद्रव्य परिवर्ती संयुजा दर्शवते जसे +2, +4
🤝 किरणोत्सारी मूलद्रव्य
- काही मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे/ किरणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो, त्याला किरणोत्सार असे म्हणतात.
- साधारणत: निसर्गामध्ये अणुअंक 82 ते अणुअंक 92 अणुक्रमांकाची मूलद्रव्ये स्वयंस्फूर्त / उत्स्फूर्तपणे किरणोत्सर्ग करताना आढळतात. याला नैसर्गिक किरणोत्सर्ग म्हणतात.
- उदा: युरेनियम (U), थोरियम (Th), रेडिअम (Ra)