Top 10, 10th class, Heredity and Evolution 2, Top 10, 10 वी अनुवंशिकता व उत्क्रांती 2.

 


Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Top 10, 10th class, Heredity and Evolution 2

Top 10, 10 वी अनुवंशिकता व उत्क्रांती 2,

अनुवंशिकता व उत्क्रांती या पाठावर MCQ परीक्षा 👇 शेवटी आहे.

आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇


👉 माहिती विज्ञानाची 🎷

सेमी मराठी विद्यार्थ्यांची अशी इच्छा होती की मराठीच्या उत्तराखालीच जर इंग्रजी चे उत्तर लिहील्यास अभ्यास करण्यास सोपे जाते. त्यामुळे आजपासून आपण हा नवीन बदल करणार आहोत.


Semi-Marathi students wanted it would be easier to study if English answers were written under Marathi answers. So from today, we are going to make this new change.



 🥁 उत्क्रांती ( Evolution)
  • व्याख्या: उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा व जीवांचा विकास साधणारा क्रमिक बदल होय.
  • उत्क्रांतीच्या अभ्यासात फक्त पृथ्वीवरील जीवसृष्टीचाच विचार होत नाही तर अंतराळातील ग्रहताऱ्यांचा सुद्धा विचार करावा लागतो.
  • नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार नवनवीन जाती निर्माण होताना त्या जातीत अनेक पिढ्यापर्यंत वैशिष्ट्यपूर्ण बदल पिढ्यानपिढ्या घडत असतात.
  • आश्चर्य म्हणजे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात नव्हती केवळ मूलद्रव्य उपलब्ध होते. त्यानंतर सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली.
  • त्यानंतर निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपात प्राचीन पेशी तयार झाल्या असण्याची शक्यता आहे. ज्या पेशी जगल्या त्यांनी संख्या वृद्धी केली व जे सभोवतांच्या वातावरणात तग धरू शकले नाहीत त्या पेशी नष्ट झाल्या.
  • उत्क्रांतीचीच ही कमाल आहे की आजमीतिला गुंतगुंतीची रचना असनरे कोट्यावधी सजीव तयार झाले.
  • प्राणी विविधतेचा विचार केला तर एकपेशीय अमिबा, पॅरामेशियम ते समुद्रातील महाकाय देवमासा व पृथ्वीवरील हत्ती आणि मानव या सारखे प्राणी तयार झाले.
  • एकपेशीय क्लोरेला ते प्रचंड आकाराचे वडाचे झाड अशी विविधता वनस्पतीमध्ये दिसून येते.
  • सजीव हे सर्वत्र आहेत म्हणजे उत्तर ध्रुवा पासून ते दक्षिण ध्रुवा पर्यंत, तसेच हवा पाणी जमीन या सर्व ठिकाणी सजीवांचे अस्तित्व आढळून येते.
  • सजीवांचा उगम व विकासासंदर्भात ‘सजीवांचा क्रमविकास’ हा सिद्धांत सर्वमान्य आहे.

🥁 Evolution
  • Definition:- Evolution is a very  gradual process occurring in living organisms over a long duration.
  • In the study of evolution, it is necessary to include stars and planets in space to the Earth.
  • Response to natural selection generates new spaces.
  • 3.5 billion years ago life had been non-existent on the earth.
  • First simple elements are present in the ocean. By a combination of these elements organic and inorganic substances are formed.
  • A first primitive type of cell may have formed from a mixture of these organic and inorganic compounds.
  • According to the principle of natural selection, some cells grow well and some may be Parished because they cannot be adjusted to the surroundings.
  • At present, crores of species of plants and animals are present on the earth with great diversity.
  • Animal diversity ranges from the unicellular amoeba and paramecium to Ocean giant wheels and elephants on Earth up to man.
  • Plane diversity varies from unicellular chlorella to the huge banyan tree.
  • From the north pole to the south pole, life exists on Earth everywhere.
  • We are curious about the origin of life and the reasons for such great diversity. Now the theory of the ‘Gradual development’ of living organisms is accepted.


🎷 उत्क्रांतीचा सिद्धांत.
  • उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजेच जीवद्रव्य /पेशीद्रव्य हे समुद्रात निर्माण झाला.
  • याच जीवद्रव्यापासून एक पेशीय जीवांची निर्मिती झाली.
  • एक पेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल होत गेले व त्यापासून अधिक जटील व मोठे सजीव तयार झाले ही क्रिया जवळपास 300 कोटी वर्षाच्या कालावधीत घडली.
  • तयार झालेल्या सजीवातील बदल हे सर्वव्यापी असल्याने अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले.
  • संघटनात्मक उत्क्रांती:- सजीवांत जे बदल व विकास होत गेला त्या क्रम विकासाला संघटनात्मक उत्क्रांती असे म्हणतात.
  • उत्क्रांती: भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास यास उत्क्रांती म्हणतात.

🎻 Theory of evolution
  • According to the theory of evolution, the first living material means protoplasm has been formed in the ocean.
  • Unicellular organisms were formed from this protoplasm.
  • Gradual changes occur in the unicellular organisms to form more complex organisms. All these changes were slow and gradual in the duration of 300 crore years.
  • These changes and developments are all round and multi-dimensional due to which the evolution of different types of organisms takes place.
  • Organization: When living things arranged from the simplest to most complex are called organisation. 
  • Evolution: The progressive development of plants and animals from their ancestors having different structural and functional organization is called evolution.



🎷 उत्क्रांतीचे पुरावे
  • बाह्यरूपीय पुराव
  • शरीर शास्त्रीय पुरावे
  • अवशेषांगे
  • पुराजीव विषयक पुरावे (जीवाश्म विज्ञान)
  • जोडणारे दुवे
  • भ्रूणविज्ञानविषयक पुरावे

🎷 Evidence of evolution

  • Morphological evidence 
  • anatomical evidence
  • Vestigial organs 
  • paleontological evidence
  • Connecting links
  • Embryological evidence


🎺 अवशेषांगे
  • व्याख्या: सजीवांमधील ऱ्हास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी अवयवे जे उत्क्रांतीचे प्रमाणीकरण आहे त्यास अवशेषांगे म्हणतात.
  • रवंथ करणाऱ्या प्राण्यासाठी उपयुक्त असणारे आंत्रपुच्छ मानवाला मात्र निरुपयोगी आहे.
  • अवशेषांगांचे इतर उदाहरणे म्हणजे अक्कलदाढ, माकड हाड, अंगावरील केस, कानांची स्नायू इत्यादी.

🥁 Vestigial organs
  • Definition: degraded or underdeveloped useless organs that are evidence of evolution have no apparent function in an organism and are called vestige organs.
  • In humans, the appendix is useless but it is functional in ruminants.
  • Some vestigial organs are the tailbone, wisdom teeth, body hairs, muscles of the ear pinna, etc.


* जोडणारे दुवे
  • दोन गटातील वनस्पती आणि प्राणी यांच्यातील काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा एकमेकांच्या जाती, वंश, गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात.
  • उदा,1. डकबिल प्लॅटिपस: डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे अंडी घालतो परंतु त्याच्यात दुग्ध ग्रंथी व शरीरावर केस असतात. म्हणजेच डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप व सस्तनी या वर्गातील दुवा आहे.
  • 2.पेरीपॅटस:-  पेरीपॅटस या प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत शरिर व पातळ उपचर्म  दिसून येतात तसेच या प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून हे लक्षात येते की पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
  • 3. लंगफीश: लंगफीश हा जरी मत्स्य वर्गातील असला तरी फुप्फुसाद्वारे श्वसन करतो. 
  • या उदाहरणावरून हे लक्षात येते की सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर प्राणी हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत.

🎷 Connecting links
  • Some organism shows some morphological characters related to two different groups called connecting links.
  • Ex. 1. Duckbill platypus: due to the presence of mammary glands and hairs on the body of the duckbill platypus it shows characteristics of mammals. It also lays eggs like reptiles. So it shows a connecting link between reptiles and mammals.
  • 2. Peripatus:- peripatus is a connecting link between Annelida and Arthropoda. Segmented body and thin cuticles are characteristics of Annelida and tracheal respiration and open circulatory system like arthropods.
  • 3. Lungfish: is a connecting link between fish and amphibians. Lungfish perform respiration with lungs through their fish.
  • The above examples indicate that mammals evolved from reptiles and amphibians from fishes.
अनुवंशिकता व उत्क्रांती या पाठावर MCQ परीक्षा 👇



                  *आयुष्यात वाईट गोष्टी नक्कीच असू शकतात पण आयुष्य कधीच वाईट असू शकत नाही.* 
                *आयुष्य हे एक फूल आहे ज्यात काटे खूप आहेत पण सौंदर्याची कमतरता नाही.*

        *आपला दिवस आनंदी जावो.*🎷