10th science, Part II, Heredity and Evolution 3, 10 वी विज्ञान, भाग II, अनुवंशिकता व उत्क्रांती 3.


10th science,part II, Heredity and Evolution 3,

10 वी विज्ञान, भाग II, अनुवंशिकता व उत्क्रांती 3.


Touch the blue link🔗 below to join this What’s App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇


पृथ्वीवर व विश्वात प्रचंड आश्चर्यच आश्चर्य आहे.
अबालवृद्धांना हा प्रश्न खूप वेळेस पडतो की माकडापासून मानवाची निर्मिती कशी झाली? ती कशी असेल व संपूर्ण माकडांचे मानवात रूपांतर का झाले नाही? काही माकडे मकडेच का राहिली?
उत्तर मोठे जरी असली तरी संपूर्ण उत्तर देणे गरजेचे आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • उत्क्रांतीचे वेगवेगळे पुरावे आहेत.पृथ्वीची निर्मिती झाल्यावर जीवसृष्टीचे अस्तित्व नव्हते. 3.5 अरब वर्षापूर्वी जीवसृष्टी पृथ्वीवर नव्हती.
  • प्रथम महासागरामध्ये पेशीद्रव्याच्या रुपात जीवसृष्टीची निर्मिती झाली, आणि त्यापासून एक पेशीय सजीव तयार झाले , हे सर्व घडून येण्यासाठी 300 करोड वर्ष लागले असावेत.
  • मानवी उत्क्रांती ही अत्यंत सावकाश झालेली आहे. चार्ल्स डार्विन यांनी सिद्ध करून दाखवले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाल्या आहेत व या विकासाला नैसर्गिक निवडीचे तत्त्व कारणीभूत ठरले असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
  • सुमारे सात कोटी वर्षापूर्वी डायनासोर नष्ट झाले तेव्हा माकडासारखे प्राणी यांच्या पेक्षा प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्युरप्रमाणे दिसणार्‍या प्राण्यापासून विकसित झाले असावेत.
  • 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला,
  • हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. कालांतराने हे सुरुवातीचे एपसारखे (एप – कपि) प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबन आणि ओरँग उटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले.
  • उरलेले हे एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हातांचा अधिक वापर करावा लागे. हे कारण मानवी आकृती निर्मिती साठी पुरेसे ठरते.
  • कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे, पहिले मानवसदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले.
  • मानवसदृष्य प्राण्याची आपल्याकडे सर्वांत पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील व उत्‍तर भारतातील ‘रामापिथिकस’ या एपची.
  • पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. हे कसे व कोणत्या पद्धतीने झाले असावे यासाठी काही तर्क आहेत पुरावे आहेत 
  •  विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते, की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते.
  • लॅमार्कवाद (Lamarckism) : उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टीस्ट लॅमार्कयांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व इंद्रियांचा नवापरांचा सिद्धांत (Use or disuse of organs) असे म्हटले.
  • लॅमार्कच्या मते ज्या माकडांनी बदल घडून येण्यास पुढाकार घेतला त्यांचे पुढे मानवात रूपांतर झाले असावे.
  • संपादित गुणांचा अनुवंश: विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला. सजीवाच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात.
  • प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यांत आढळतात. या वैशिष्ट्यांचा विचार केला असता मानवांचा पूर्वज हा माकडच ठरतो. उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्याबदलांची अखंड प्रक्रिया आहे.
  • सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जातिबदल/जातिउद्भव (Speciation) होतो. पृथ्वीवर एकूण सात खंड आहेत. हे खंड दरवर्षी 2.5 सेंटीमीटर एकमेकांपासून दूर सरकतात हा विचार मनात घेतला तर आपल्याला माकडा मधील बदल लक्षात येईल. माकडापासून मानव निर्मिती ची क्रिया ही अत्यंत मंद गतीने झालेली आहे.
  • हाडांच्या रचनेत व जोडणीतील साम्य: मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर यांत वरवर पाहता कोणतेही साम्य नाही, तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे; परंतु प्रत्येकाच्याअवयवातील हाडांच्या रचनेत व जोडणीत मात्र साम्य दिसून येते. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत असेच दर्शवते.
  • अवशेषांगे: मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे.याच प्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत.

There are great wonders on earth and in the universe.

Young and old often ask the question, How humans evolved ? Why didn’t all apes transform into humans? Why do some monkeys remain monkeys?
Even if the answer is long, it is necessary to give a complete answer.
There are different evidences for evolution, first it is necessary to learn that evidence.
Life did not exist when the earth was created. Also Life did not exist on Earth 3.5 billion years ago.
First, life formed in the oceans in the form of cellular matter, and from that a cellular matter organism was formed, all of which may have taken 300 million years.

  • evolution of human rakes place very slow. Charles Darwin proved that all species of living organisms evolved from a common ancestor in sequence and over a period of thousands of years.
  • When the dinosaurs died out about seven million years ago, ape-like animals may have evolved from animals that looked a bit like today’s modern lemurs.
  • About 4 crore year ago tail of these monkey like animals of Africa is said to be disappeared. Due to enlargement of brain they developed gradually and there hands were also improved.
  • Some ape-like animals reach the South and North East Asia and finally evolved into gibbon and orangutan.
  • 2.5 crore years ago, remaining ape like animals stayed in Africa and from them gorilla and chimpanzees evolved.
  • Evolution of some of the 2 crore year old species of apes seems to be occurred in different way. These apes had to use their hands more for eating food and other work. This reason is sufficient for the formation of the human figure.
  • Due to dry environment some of apes started to live on land. On land there lumbar bones develop in such a way that they start to stand erect poster in grassland, so their hands become available for use. About 2 crore years ago the first human-like animals with erect posture which were using their hands evolved.
  • Ramapithecus: from East Africa, the first record of human-like animals is with us in the form of the ‘Ramapithecus’ ape. About 40 lacs year ago,.this ape grew in size and became more intelligent and thus the ape of South Africa evolved.
  • The member of the genus Homo, human-like animals started to appear about 20 lakh years ago and the skilled human developed from lemur-like apes.
  • About 15 lakh years ago human walking with erect posture evolved. They may dwell in China and Indonesia the Asian continent.
  • The evolution of upright man continued in the direction of developing his brain for about 100000 years. In due course of time, they discovered the fire.
  • The brain of a 50000-year-old man had sufficiently evolved. Now it is a member of the class-wise man ( Homo sapiens).
  • The first example of a wise man is the Neanderthal man.
  • The Cro-Magnon man evolved about 50,000 years ago.
  • Above 10,000 years ago, wise men started to practice agriculture.

* We have some evidence for all these evolutions.

  • The study of fossils provides evidence of evolution.
  • Anatomical evidence suggests that similarities in bone structure and Bony joints indicate that our ancestors were the same.
  • Connecting links between two animals indicate that amphibians evolved from fishes and mammals evolved from reptiles.
  • Embryological evidence indicates the common 
  • origin of all these animals.

*_मन  समुद्राएवढं असेल तर उत्तमच, 
पण त्याच सोबत 
खडकावर आदळून शांत परतणा-या 
अबोल लाटेसारखी
 वेदना, सहन करण्याची
 सहनशक्तीही त्यात असावी लागते* ……_
 🎺 आपला दिवस आनंदात जावो. 🎷