10th, Sci II. Towards green energy, 1. 10 वी, विज्ञान II, हरित ऊर्जेच्या दिशेने 1.

 

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

10th, Sci II. Towards green energy 1

10 वी, विज्ञान II, हरित ऊर्जेच्या दिशेने 1.


आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला 🔗 स्पर्श करा👇
👉 माहिती विज्ञानाची 🎷


🎷 ऊर्जा (energy) म्हणजे काय?
उत्तरthe : कार्य करण्याच्या दरास/ क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

* What is energy?
Ans: The capacity to do work is called energy.

* ऊर्जेचे विविध प्रकार (Types) कोणते?
उत्तर: ऊर्जेचे दोन प्रकार आहेत.
1.स्थितीत ऊर्जा आणि 
2.गतीज ऊर्जा.

* What are different types of energy?
Ans: The two types of energy are
1. Potential energy and
2. kinetic energy.

* उर्जेची विविध रूपे(Forms) कोणती?
उत्तर: ऊर्जेची विविध रूपे पुढीलप्रमाणे 
प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा, सौर ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, केंद्रकीय ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, आणि पवन ऊर्जा.

* What are different forms of energy?
Ans: different forms of energy are as follows
Wind energy, light energy, heat energy, solar energy, electrical energy, nuclear energy, chemical energy, mechanical energy, and tidal energy.

* आपल्या दैनंदीन जीवनात विद्युत ऊर्जा कुठे-कुठेवापरली जाते?
उत्तर: आपल्या दैनंदीन जीवनात विद्युत ऊर्जा पुढील उपकरणात वापरले जाते.
टीव्ही सेट, फ्रीज , मोबाईल/भ्रमणध्वनी फोन चार्जर, पंखा ,इस्त्री, पाण्याची मोटार इत्यादी.

* Where do we use electrical energy in our day-to-day life?
Ans: in our day-to-day life electrical energy is used in various appliances
Cell phone chargers, TV sets, water pumps, fans, electric irons, refrigerators, etc.


* विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते?
उत्तर: मोठ्या जनरेटर च्या मदतीने विद्युत ऊर्जा निर्माण होते. संवाहक ताराभोवती चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल झाल्यामुळे विभवांतर/ फरक निर्माण होतो. यामुळे विद्युत उर्जेची निर्मिती होते. हे कार्य  विद्युत चुंबकीय तत्त्वावर आधारित आहे. 

How electric energy is produced?
Ans: electric energy is produced in the large generators. Potential difference is created by the change in the magnetic field around the conducting wire. This results in the formation of electric energy. This is based on the principle of electromagnetic induction.

* मायकेल फॅराडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्त्वाचा शोध लावला.  

* Michael Faraday invented the principle of electromagnetic induction.


* कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हटले असावे?
उत्तर: कोळशात साठवलेली ऊर्जा रासायनिक बंधाच्या स्वरूपात असते. कोळशात असलेले अणू आणि रेणू रासायनिक बंधांमुळे तयार होतात. कोळसा जाळण्याच्या वेळी रसायनिक बंध तुटून औष्णिक ऊर्जा तयार होते.

* Why is the energy in the coal called chemical energy?
Ans: the energy stored in coal is in the form of a chemical bond. The atoms and molecules which are present in the coal are formed due to chemical bonds. At the time of the burning of coal, the chemical energy, in coal is transformed into thermal energy.

* टर्बाइन फिरविण्यासाठी वाफच का वापरतात?
उत्तर: जलविद्युत केंद्रांच्या तुलनेत औष्णिक विद्युत केंद्राचे मोठे फायदे आहेत.
पाणी तापवल्याने तयार होणारी वाफ उच्च दाब आणि तापमानाखाली असते. याचा वापर करून परिणामकारकरीत्या टरबाइन फिरवले जातात. एक महत्त्वाचा फायदा म्हणजे  पाण्याच्या वाफेचे संघनन करून पुन्हा पाणी मिळवता येते.

* Why steam is used to rotate the turbine?
Ans: As compared to hydroelectric power stations, thermal power stations have great advantages.
The steam produced by water heating is under high pressure and temperature. With this steam force, it is easy to rotate a turbine. The main advantage is the same steam is again condensed and converted back into water.

* अणु विखंडनाची प्रक्रिया कशी होते?
उत्तर: अणु केंद्रक हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेले असते. अणु केंद्रकावर दुसऱ्या न्यूटनचा मारा करून त्याचे केंद्रकीय विखंडन केले जाते. या क्रियेत खूप मोठी ऊर्जा बाहेर पडते यास केंद्रकीय ऊर्जा असे म्हणतात.

* How does Nuclear fission take place?
Ans: The nucleus of an atom is made up of protons and neutrons. By bombarding another neutron in the nucleus, Nuclear fission is done. By fusion of the nucleus the energy liberated is known as atomic energy.

* नैसर्गिक वायू वापरून वीज निर्मिती प्रकल्प फायदेशीर ठरतो.
उत्तर: 1. नैसर्गिक वायू मध्ये गंधक (S) नसल्यामुळे ते प्रदूषणकारी नाही.
2. औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाच्या ज्वलनातून प्रदूषण ही खूप मोठ्या प्रमाणावर होते. या तुलनेत नैसर्गिक वायू हा उत्तम इंधन स्त्रोत असल्यामुळे हे वीज प्रकल्प फायदेशीर ठरतात.


.* Advantages of power generation plant, using natural gas
Ans: 1. It is less polluting as there is no sulphur (S) in natural gas.
2. Hence Power plant by natural gas is more efficient than a thermal power plant.

* जनरेटर मध्ये चुंबक फिरवण्यासाठी टर्बाइनचा वापर केला जातो.
* A turbine is used to rotate the magnet in the generator.
* अपुऱ्या इंधनाच्या ज्वलनातून अपायकारक असा कार्बन मोनॉक्साईड (CO) वायू तयार होतो.

* Incomplete combustion of fuels leads to the formation of carbon monoxide (CO).

* सौर विद्युत घट अर्धवाहक (semiconductor) या विशिष्ट
प्रकारच्या पदार्थापासून म्हणजेच सिलिकॉन ने बनलेलेअसतात.

* Solar cells are made of a special type of material called a Semiconductor such as silicon (Si)