10th, Sci. Animal classification 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण 1

 

10th, Sci. Animal classification 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण

   आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

👉 माहिती विज्ञानाची 🎷

विज्ञान विषय हा केवळ परीक्षेपुरता न पाहता ज्ञानवृद्धीसाठी पाहिल्यास आपणास एक वेगळाच आनंद मिळतो.

You get a different joy if you look at the science subject for knowledge gain and not just for exams.

इयत्ता नववी मध्ये आपण वनस्पतींचे वर्गीकरण शिकलोत. आज प्राण्यांचे वर्गीकरण पाहणार आहोत. विज्ञानामध्ये काही मुद्दे हे आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे असतात. त्या मुद्द्यांचा, वाक्यांचा कुठेतरी संदर्भ येत असतो आणि एखाद्याने प्रश्न विचारल्यावर आपण जर उत्तर देत असू तर एक वेगळे समाधान आपल्याला होते. त्यामुळे विज्ञान अभ्यासाची गोडी आपण लावली पाहिजे.

In class IX we learned the classification of plants. Today we will see classification of animals. Some points in science are worth remembering for long life. Those points, sentences have a reference somewhere and if we answer when someone asks a question, we get a different satisfaction. Therefore, we should enjoy the study of science.


* वनस्पतीचे वर्गीकरण कसे करण्यात आले?

उत्तर: वनस्पती वर्गीकरणासाठी पुढील पाच मुद्द्यांचा आधार घेण्यात आला.

1. वनस्पती शरीरास अवयव आहेत की नाही जसे मूळ, खोड, पान, फुल.

2. संवहनी ऊती आहेत की नाहीत. जसे जल वाहून नेण्यासाठी जलवाहिन्या व अन्न वाहून नेण्यासाठी रसवाहिन्या.

3. वनस्पतीमध्ये बिया तयार होत आहेत की नाहीत जसे बीजपत्री , अबीजपत्री.

4. वनस्पतींच्या बिया ह्या फळांमध्ये अच्छादित आहे की(आवृत्तीची), फळाच्या बाहेर आहेत(अनावृत्तबीजी).

5. बिया मध्ये असणाऱ्या दलांची संख्या एक आहे (एकबीजपत्री) की दोन आहे (द्विबीजपत्री).


* How are the plants classified?

Ans: 

  • For classification of plants 5 basics points are considered.
  • Presence or absence of organs such as roots,  stem, branches, leaves, flowers etc.
  • Presence or absence of conducting tissue such as xylem for conduction of water phloem for conduction of food.
  • Presence or absense of seeds in plant such as  cryptogam and phanerogams
  • If the seeds are enclosed in fruit than it is called as Angiosperms and if the seeds are outside food then it is called as gymnosperms.
  • Number of cotyledons in seed if one then it is called as monocot and if two then it is called as dicotyledon.


* सजीवांशी वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जात?

उत्तर: 

  • मूलभूत गुणधर्माच्या  निकशावर सजीवांचे वर्गीकरण पद्धतशीरपणे करता येते.
  • सजीवांमध्ये केंद्रक आहे किंवा नाही, सजीव एकपेशीय आहेत की बहुपेशीय, सजीवात पेशीभित्तिका आहे किंवा नाही आणि सजीवांच्या पोषण पद्धती कोणत्या यावर सजीवांचे वर्गीकरण करता येते.

* Which characteristics are used for classification of organisms?
Ans:
  • According to their basic characteristics living organisms are systematically classified.
  • These characteristics are presence or  absence of nucleus, unicellular body or multi cellular body, presence or absence of cell wall and the mode of nutrition in organisms.

* पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत.

* There are about 7 million species of different animals on earth.


* प्राण्यातील साम्य आणि फरकावर आधारित गट आणि उपकट करून प्राण्यांचे वर्गीकरण केले जाते.

*Animal classification is done Depending upon the similarities and differences among them.

* प्राणी वर्गीकरणाचे फायदे
  • प्राण्यांच्या वर्गीकरणामुळे त्यांचा अभ्यास सुलभतेने करता येतो.
  • एखाद्या गटातील मोजक्या  प्राण्यांचा अभ्यास झाला तरी त्या गटातील इतर सर्व प्राण्याविषयी माहिती मिळते.
  • प्राणी वर्गीकरणामुळे प्राण्यांच्या उत्क्रांती विषयी माहिती मिळते.
  • प्राण्यांना अचूकपणे आणि सहज ओळखण्यास मदत होते.
  • प्राणी वर्गीकरणामुळे प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नातेसंबंध समजू शकते.
  • प्राण्यांचे राहण्याचे ठिकाण म्हणजेच अधिवास निसर्गातील नेमके स्थान (position) समजायला मदत होते.
  • प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची सखोल माहिती मिळते.

* Benefits of animal classification.
Ans: 
  • Benefits of animal classifications are as follows,
  • Studying animals in detail is easy.
  • By studying some animals from a group it is easy to understand the entire group.
  • Animal classification helps to better understanding of animal evolution.
  • Helps to identify animals accurately and easily.
  • One can understand the relationship of animals with other living things.
  • The habitat of animals and its exact rule in nature can be understood.
  •  Classification helps to study the various adaptations of animals.

* समपृष्ठरज्जू प्राणी
  • पृष्ठरज्जू असतो.
  • कल्लाविदरे किंवा फुफ्फुसे असतात.
  • चेतारज्जू एकच असून तो पोकळ आणि शरीराच्या पृष्ठ बाजूस असतो.
  • हृदय हे शरीराच्या अधर बाजूस असते.

* Chordates animal.
  • Notochord present.
  • Pharyngeal gill splits or lungs present.
  • Nerve chord is darsal, Hollow and single
  • Heart is ventral  side of body.

* असमपृष्ठरज्जू प्राणी.
  • पृष्ठरज्जू नसतो.
  • ग्रसनीमध्ये कल्ला विदरे नसतात.
  • चेतारज्जू हा दुहेरी,भरीव असून शरीराच्या अधर बाजूस असतो.
  • हृदय असेल तर शरीराच्या पृष्ठ बाजूस असते.

* Non chordates.
  • Notochord is absent.
  • Pharyngeal gill splits are absent.
  • nerve cord ventral , solid and paired.
  • Heart is dorsally located.

वरील मुद्द्यांच्या आधारे आपणास समपुष्ठरज्जू प्राणी व असमपुष्ठरज्जू  प्राणी यांच्यात फरक  करता येते.
Based on the above points, we can easily write difference between  chordate animals and non-chordate animals.



                  *आपल्या आयुष्याच्या गाडीला कुठे ना कुठे ब्रेक लागणार हे माहीत असून सुद्धा आपला जीवनप्रवास मस्त सुसाट वेगाने चालू असतो, कारण छान अस ध्येय गाठायचं असतं,*
                  *मात्र वाटेत आलेल्या मुक्कामाला विसरायचं नसतं, कारण या मुक्कामानेच प्रवासातला चांगला वाईट काळ अनुभवला असतो…!!!*

      *आपला दिवस आनंदी जावो.*🎷