10th, Sci. Animal classification 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण 2


10th, Sci. Animal classification 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण 2

आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇


🐦 पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी
 लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या 
शरीरात पृष्ठ बाजूस असते.हे मज्जातंतूंच्या ऊतींना उर्वरित शरीरापासून वेगळे ठेवते.

Notochord is a long rod-like supporting structure present on the dorsal side of an animal body. It keeps the nerve tissue isolated from the remaining body.


🐀 असमपृष्ठरज्जू प्राणी दहा संघांमध्ये (phylum) विभागले आहेत.
  • आदिजीव – अमिबा, पॅरामेशिअम
  • रंध्रीय – सायकॉन, युस्पॉंजिया (आंघोळीचा स्पंज) इत्यादी,
  • सिलेंटरेटा / निडारीया – प्रवाळ (Corals), जलव्याल (Hydra) , पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर इत्यादी, 
  • चपट्या कृमी -पट्टकृमी (tapeworm) ,लिव्हरफ्ल्युक, प्लानेरिया इत्यादी.
  • गोल कृमी – पोटातील जंत (Ascaris), डोळ्यातील जंत (Loa loa), हत्तीपाय रोगाचा जंत (Filaria worm), , इत्यादी 
  • वलयी प्राणीसंघ (Phylum – Annelida)- गांडूळ (Earthworm), जळू(Leech), नेरीस (Nereis) इत्याद
  • संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda) – खेकडा🦀,  झुरळ🪳, विंचू🦂,  कोळी🕷️,  पैसा,  मधमाशी🐝, फुलपाखरू🦋 इत्यादी.
  • मृदुकाय प्राणीसंघ (Phylum- Mollusca)- गोगलगाय, ऑक्टोपस, शिंपला (Bivalve) इत्यादी.
  • कंटकचर्मी – तारा मासा (Star Fish), सी- ककुंबर (समुद्री काकडी) सी-अर्चिन, ब्रिटलस्टार, इत्यादी.
  • अर्धसमपुष्ठरज्जू – बॅलॅनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस.
11वा संघ हा संघ समपृष्ठरज्जू प्राण्यांचा आहे. पण हे असमपृष्ठरज्जू प्राणी संघ नसून समपृष्ठरज्जू प्राणी संघ होत.
उदा. मानव 🙋, उंदिर 🐀, घोडा, गाढव 🐴 डुक्कर 🐷 गाय 🐄 , वटवाघुळ 🦇, कांगारू 🦘, डॉल्फिन🐬, हत्ती🐘 इत्यादी.


Nonchordates are divided into 10 phyla.
  • Protozoa -Amoeba and paramecium
  • Porifera – Sycon, Euplectella, Euspongia (Bath sponge),Hyalonema, etc.   
  • coelenteratata / cnidaria -Hydra, Corals, Adamsia (Sea anemone), Physalia (Portuguese- man-of-war), Aurelia (Jellyfish), etc.   
  • Platyhelminthes– Planaria, Liver fluke, Tapeworm, etc.
  • Aschelminthes– Ascaris (Intestinal worm), Loa loa (Eye worm) Filarial worm, etc.  
  • Annelida – earthworm 🪱, Leech, Nereis, etc.
  • Arthropoda -butterfly🦋, crabs 🦀, ant 🐜, scorpion 🦂, spider 🕷️, millipede, centipede, cockroach 🪳, honey bees 🐝, etc.  
  • Mollusca – octopus 🐙, Bivalve, snails 🐌, etc.
  • Echinodermata – sea cucumber, starfish⭐, sea urchin, brittle star, etc.
  • Hemichordate – Balanoglossus, Saccoglossus. etc.
  • 🐬All above are non-chordates and the   

  • 11th phylum is chordates – man♂️,bat 🦇, cat, 🐀, 🐴, dog 🐶, pig🐷, kangaroo 🦘, dolphin 🐬,Elephant 🐘 etc.

🐧 सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे आणि त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणीसंघ असेच ठेवलेआहे. समपृष्ठरज्जू प्राणीसंघाची विभागणी तीन उपसंघांत केलेली आहे. ते तीन उपसंघ
म्हणजे
  1. उपसंघ – पुच्छसमपृष्ठरज्जू प्राणी/कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी, युरोकॅार्डेटा (Urochordata) उदा.हर्डमानिया, डोलिओलम, ऑइकोप्ल्युरा, इत्यादी.
  2. उपसंघ – शीर्षसमपृष्ठरज्जूप्राणी सेफॅलोकॅार्डेटा (Cephalochordata) उदा. ॲम्फिऑक्सस. आणि
  3.  उपसंघ- पृष्ठवंशीय प्राणी व्हर्टिब्रेटा (Vertebrata/Craniata).

🐈 उपसंघ- पृष्ठवंशीय प्राणी व्हर्टिब्रेटा (Vertebrata/Craniata) या उपसंघाचे सहा वर्गांत वर्गीकरण केलेआहे. ते सहा वर्ग पुढील प्रमाणे
  •  चक्रमुखी प्राणीवर्ग (Class: Cyclostomata) – पेट्रोमायझॉन, मिक्झीन इत्यादी
  • मत्स्य प्राणीवर्ग(Class: Pisces) – पापलेट, समुद्र घोडा (sea horse) , शार्क, इलेक्ट्रिक-रे, स्टिंग-रे, Rohu (रोहू), इत्यादी.
  • उभयचर प्राणीवर्ग (Class: Amphibia)- बेडूक, सॅलॅमँडर, टोड, इत्यादी.
  • सरीसृप प्राणीवर्ग (Class: Reptilia) – सरडा, कासव, पाल, साप, सुसर, मगर इत्यादी.
  • पक्षी वर्ग (Class: Aves)- मोर, पेंग्वीन, कोंबडी, पोपट, कबुतर, बदक, इत्याद. आणि
  •  सस्तन प्राणीवर्ग (Class: Mammalia)- मानव, डॉल्फीन, कांगारू, वटवाघूळ इत्यादी.

* All chordate animals are grouped into a single phylum and the name of 
the phylum is the same i.e. Phylum- Chordata. This phylum has been divided into three subphyla
  1. subphyla Urochordata – Herdmania, Doliolum Oikopleura, etc.
  2. subphyla Cephalochordata– Amphioxus. & 
  3. subphyla Vertebrata

🙋 Subphylum Vertebrata has 
been further divided into six classes as-
  1.  Class: Cyclostomata- Petromyzon, Myxine, etc.
  2. Class: Pisces– Shark, Rohu, Pomfret, Sea horse, Electric ray, Sting ray, etc.
  3. Class: Amphibia– Salamander, Frog, Toad, etc
  4.  Class: Reptilia– crocodile 🐊, gharial , Tortoise 🐢, Lizard 🦎, Snake 🐉, etc.
  5. Class: Aves– cock , Peacock 🦚, Parrot 🦜, Pigeon 🐦, Duck 🦆, Penguin 🐧, etc. and 
  6. Class: Mammalia – human 🙋, elephant 🐘, pig 🐷, cow 🐄, dog 🐕, cat🐈 , rat 🐀, Kangaroo 🦘, bat 🦇 etc.

वरील पद्धत ही आत्तापर्यंत प्रचलित असलेली प्राण्यांची वर्गीकरण पद्धत होती.रॉबर्ट व्हिटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश ‘प्राणीसृष्टी’ (Kingdom-
Animalia) मध्ये केला आहे. या पद्धतीने प्राण्यांचे वर्गीकरण करत असताना
  1.  शरीराचेरचनात्मक संघटन (Body
    organization), 
  2. शरीराची सममिती (Body symmetry), देहगुहा (Body cavity), 
  3. जननस्तर (Germinal
    layers), 
  4. खंडीभवन (Segmentation) या आणि यांसारख्या काही मुद्‌द्यांचा आधार यासाठी घेतलेला आहे.


The above system of animal classification has been in practice till now. Nowadays, a new system of classification is followed.
 We will study this interesting new system of animal classification in brief.
The five kingdom classification system was given by Robert Whitakar. His classification is based on 
  • body organisation, 
  • body symmetry, 
  • body cavity, 
  • germ layers, 
  • segmentations, etc.

🦀 प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीत वापरलेले आधारभूत
मुद्दे
  •  रचनात्मक संघटन (Grades of organization)
  • शारीरिक सममिती (Body Symmetry)
  • आद्यस्तर/जननस्तर(Germinal layers) : द्‌विस्तरीय व त्रिस्तरीय (Diploblastic and triploblastic)
  • देहगुहा (Body Cavity/Coelom)
  • खंडीभवन (Body Segmentation)

🪳 (बऱ्याच वेळा आपणास मराठी पेक्षा इंग्रजी चे शब्द सोपे वाटतात. म्हणून काही मराठीच्या उत्तरात इंग्रजी शब्द ठेवलेले आहेत.)


⭐ Criteria for new system of classification
  • Grades of organization
  • Body symmetry
  • Germ layers diploblastic and triplastic
  • Body cavity (Coelom)
  • Body segmentation



     *जेव्हा काही लोक गरज असल्यावर आपली आठवण काढतात, 
तेव्हा, वाईट वाटून घेऊ नका, 
उलट गर्व करा की…*

               *एका मेणबत्तीची आठवण ही फक्त अंधार झाल्यावरच होते !*

     *आपला दिवस आनंदी जावो.*🎷