10th, Sci. Animal classification. 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण 4



10th, Sci. Animal classification. 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण 4.



आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇

 👉  माहिती विज्ञानाची 🎷         

आज आपण प्राणी सृष्टीतील 10 पैकी काही असमपुष्ठरज्जू प्राणीसंघ यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. यातून आपणास खूप आश्चर्यकारक माहिती समजणार आहे.


✍️ रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)
स्वरूप:  साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना ‘स्पंज’ म्हणतात. त्यांच्या शरीरावर अनेक ‘ऑस्टीया’ आणि एक मोठे ‘ऑस्कुला’ असतात.
आद्यस्तर: हा पेशीस्तरीय आहे.
वैशिष्ट्य: शरीरास कंटिकांचा/शुकिकांचा (Spicules) किंवा स्पाँजिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका हया कॅल्शियम कार्बोनेट (CaCO3) किंवा सिलीकाच्या (SiO2) च्या बनलेल्या असतात.
सममिती: हे प्राणी असममिती आहेत.
अधिवास: बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात.
प्रचलन: आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून त्यांना ‘स्थानबद्ध प्राणी’ (Sedentary animals) म्हणतात.
प्रजनन:  मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा/आणि लैंगिक पद्धतीने होते.  मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते.
उदाहरणे : सायकॉन, यूस्पॉंजिया bath sponge (आंघोळीचा स्पंज), हायालोनिमा, युप्लेक्टेल्ला, इत्यादी.


Today we are going to see detailed information about some non-chordate animal groups in the animal world. From this, we will understand a lot of amazing information.


Phylum-Porifera
Nature: These animals have with simplest body plan and are called ‘Sponges.
Habitat: Most of them are marine and few are freshwater dwellers.
Locomotion: These animals are sedentary animals because they are always attached to the substratum and, hence do not show locomotion. 
Structure of body: Small organisms from water are taken in through the Ostia and given out through the oscula. 
Characteristics: The spongy body is supported by spicules or spongin fibers. Spicules are made up of calcium carbonate (CaCO3) or silica (SiO2).
Coelom: these are acoelomate animal
• Body symmetry: asymmetrical
Germinal layers: cellular grade
Reproduction:   asexual method-  budding and/ or by sexual methods. They have a good ability for regeneration
Examples: Sycon, Hyalonema, Euspongia (Bath sponge), Euplectella, etc.


🏓 सिलेंटराटा / निडारीया प्राणीसंघ
(Phylum – Coelenterata/Cnidaria)
स्वरूप:  शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. 
दंडाकृती शरीर असेल तर ‘बहुशुंडक’ (Polyp) आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर ‘छत्रिक’ (Medusa) म्हणतात.
अधिवास:  बहुतेक प्राणी समुद्रात आढळतात. काही मोजकेच प्राणी गोड्या
पाण्यात आढळतात.
सममिती: शरीर अरिय सममित असते.
आद्यस्तर: द्‌विस्तरी
वैशिष्ट्ये: यांच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके (Tentacles) असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी होतो तर दंशपेशी (Cnidoblast) भक्षाच्या शरीरात विषाचे
अंतःक्षेपण करतात. दंश पेशी चा उपयोग संरक्षणासाठी सुद्धा होतो.
उदाहरणे : प्रवाळ (Corals), जलव्याल (Hydra), पोर्तुगीज-मॅन-ऑफ-वॉर (फायसेलिया), सी-ॲनिमोन (समद्रफूल), जेलीफिश (ऑरेलिया), इत्यादी.


Phylum – Coelenterata/Cnidaria
Nature: The body of these animals is cylindrical or
umbrella-like. 
If the body is cylindrical, it is called a ‘Polyp’ and
 if the body is umbrella-like, it is called a ‘Medusa’.
Habitat: Most animals are marine. Only a few animals are freshwater dwellers.
 Symmetry: Bodies of these animals are radially symmetrical  
Germinal layers: diploblastic
Characteristics: Cnidoblast-bearing tentacles are present 
around the mouth. Tentacles are useful for capturing the prey.  cnidoblasts inject the Tointon into the body of prey. Those are useful for protection too.
Examples: Corals, Hydra, Aurelia (Jellyfish), Adamsia (Sea anemone), Physalia (Portuguese-man-of-warr), etc.


🎷 चपट्या कृमींचा संघ (Phylum -Platyhelminthes)
स्वरूप: शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते. म्हणून यांना ‘चपटेकृमी’ म्हणतात.
अधिवास: काही थोडे प्राणी स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात आढळतात. बहुतेक प्राणी अंत:परजीवी (endoparasite) असतात.
जननस्तर:  हे प्राणी त्रिस्तरीम्हणजे यांचे शरीर बहिर्जनस्तर, मध्यजनस्तर आणि अंत:स्तर अशा तीन जननस्तरांपासून बनलेले असते. 
शरीर:  देहगुहाहीन 
सममित: द्विपार्श्व 
उभयलिंगी:  हे प्राणी उभयलिंगी (Hermaphrodite) असतात, म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजननसंस्था असतात.
प्रजनन: लैंगिक प्रजनन
उदाहरणे : प्लॅनेरिया, पट्ट्कृमी, लिव्हरफ्ल्युक, इत्यादी.

🎇 Phylum – Platyhelminthes
Characteristic: The body of these animals is slender & flat like a leaf or strip. Hence, they are called  ‘flatworms’. 
Habitat: Most of these animals are endoparasites. Few are free-living & aquatic.
 Coelom: The body is acoelomate 
 symmetry: bilaterally symmetrical.
 Germinal layers: These are triploblastic i.e. their body is made up of three germ layers- endoderm, ectoderm & mesoderm. 
Reproduction: These animals are hermaphrodite i.e. male and female reproductive systems are present in the same animal body. 
Examples: Planaria, Tapeworm, Liver fluke, etc.

ऐकावे ते नवलच🎷

समुद्रामध्ये प्रवाळ खडक असतात. हे खडक म्हणजे नीडारीया संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते. याच खडकांपासून ‘पोवळे’ या प्रकारचे रत्न मिळवतात
उपयोग: आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे प्रवाळ-भस्म तयार केले जाते.

Surprising information 🎷
Coral reefs are present in the ocean. These reefs are colonies of specific cnidarians. A precious stone called ‘Coral’ (पोवळा).
Use:  the coral powder (प्रवाळ भस्म) used in Ayurveda is derived from these reefs.


                   *कुठल्याही व्यक्तीच्या मनाला लागेल असं काही बोलत जाऊ नका.*
                  *कारण तुम्हाला महिती नसतं की तो त्याच्या रोजच्या आयुष्यात काय काय सहन करतो.*

        *आपला दिवस आनंदी जावो.*🎷