10th, Sci. Animal classification. 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण 5.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

10th, Sci. Animal classification. 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण 5.


आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या 
What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇

आज आपण प्राणी सृष्टीतील असमपृष्ठरज्जू प्राणीसंघातील उर्वरित संघांचा अभ्यास करणार आहोत.

🎷 गोलकृमी प्राणीसंघ (Phylum- Aschelminthes)

स्वरूप: ह्या प्राण्यांना गोलकृमी म्हणतात कारण ह्या प्राण्यांचे शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते.

शारीरिक सममिती: द्विपार्श्व सममिती

आद्यस्तर: त्रिस्तरीय म्हणजेच त्यांचे शरीर बहिर्जनस्तर, मध्यजनस्तर आणि अंत:स्तर अशा तीन जननस्तरांपासून बनलेले असते.

वैशिष्ट्ये:  गोल कृमींचे शरीर अखंडित असून शरीराभोवती भक्कम उपचर्म असते.

देहगुहा:  शरीरात आभासी देहगुहा असते.

आधिवासी: काही प्राणी स्वतंत्र राहणारे तर काही अंत:परजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात.

प्रजनन :  गोल कृमी हे एकलिंगी असतात व लैंगिक प्रजनन करतात.

प्रचलन: पाण्यात राहणारे पोहण्याच्या क्रियेतून हालचाल करतात.

उदाहरण: पोटातील जंत (Ascaris), हत्तीपाय रोगाचा जंत/ फायलेरिया (Filaria worm), डोळ्यातील / जंत लोआ लोआ (Loa loa), इत्यादी.

✍️ Phylum- Aschelminthes

Characteristics: Body of these animals is non-segmented and body is covered with tough cuticle.

Body symmetry: bilaterally symmetrical.

Habitat: These animals are either free living or endoparasites. Free living animals are either
aquatic or terrestrial.

Coelom: pseudocoelomate

Germinal layers: Body of these animals are triploblastic i.e. their body is made up of three germ layers- endoderm, ectoderm
& mesoderm. 

Structure: they are called as flat (like a leaf or strip ) worm 🐛 because their body is cylindrical, long thread like and unsegmented.

Reproduction: These animals are unisexual and type of reproduction is sexual.

Locomotion: bye swimming.

Examples: Ascaris (Intestinal worm), Filarial
worm, Loa loa (Eye worm), etc.


वलयी प्राणीसंघ (Phylum – Annelida)

स्वरूप: . हे प्राणी लांबट,दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड-खंडीभवन आढळते, म्हणून
त्यांना ‘खंडीभूत कृमी’ (Segmented Worms) म्हणतात.

शारीरिक सममिती: द्‌विपार्श्व सममिती दर्शवतात

आद्यस्तर: त्रिस्तरीय 

वैशिष्ट्ये: ह्यांच्या सर्वांगाभोवती कायखंड-खंडीभवन असे विशिष्ट उपचर्म (Cuticle) असते.

देहगुहा: सत्य-देहगुहा युक्त.

आधिवास: बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही प्राणी हे बाह्यपरजीवी (Ectoparasites) तर काही स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय व गोड्या पाण्यात आढळणारे आहेत किंवा काही प्राणी भूचर असू शकतात.

प्रजनन: हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असून लैंगिक प्रजनन दर्शवतात.

प्रचलन: ह्यांचे प्रचलन होण्यासाठी दृढरोम (Setae) किंवा परापाद (Parapodia) किंवा चूषक (Suckers) यांसारखे
अवयव असता. हे सरपटणारे प्राणी आहेत.

उदाहरण: गांडूळ (Earthworm), जळू(Leech), नेरीस (Nereis)sand worm वाळूचा किडा, इत्यादी.


Phylum – Annelida

Characteristics: body is covered with special cuticle and metamerically segmented

Body symmetry: bilaterally symmetrical

Habitat: Most of Annelidas are free-living, but few are ectoparasites. Free-living animals may be marine or fresh water dwellers or terrestrial. 

Coelom: Coelomate

Germinal layers: triploblastic

Structure: Body of these animals is long, cylindrical.

Reproduction: These animals are either hermaphrodite or unisexual and show sexual reproduction.

Locomotion: Annelida have setae or parapodia or suckers for creeping mode of locomotion. 

Examples: Earthworm 🪱, sand worms, Leech, Nereis, etc.


संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)

स्वरूप: . या प्राण्यांना छोट्या – छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात. म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात.

शारीरिक समिती: द्विपार्श्व सममित असून शरीर खंडीभूतही असते.

आद्यस्तर: त्रिस्तरीय 

वैशिष्ट्ये: यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल (Exoskeleton) असते. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. म्हणून संधिपाद प्राणीसंघ हा प्राण्यांमधील सर्वांत मोठा आणि जीवन-संघर्षात सर्वप्रकारे यशस्वी झालेला असा संघ होय.

देहगुहा: सत्य देहगुहा

आधिवासी:  हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वांत उंच पर्वत शिखर अशा सर्वप्रकारच्या अधिवासांत आढळतात.  

प्रजनन: . हे प्राणी एकलिंगी असून, लैंगिक प्रजनन हे अंडी, अळी, कोश या अवस्थातून होते.

प्रचलन: अपंगांच्या जोड्या असल्यामुळे चालणे, पोहणे, उडणे व सरपटणे या क्रिया हे प्राणी करू शकतात.

उदाहरण: मधमाशी 🐝, खेकडा 🦀, कोळी🕷️, विंचू🦂, पैसा, गोम, सर्व कीटक जसे झुरळ🪳, मुंग्या🐜, फुलपाखरू🦋, इत्यादी.


Phylum- Arthropoda

Characteristics: they are called as arthropods because they have jointed appendages. This is largest phylum with highly successful animals in animal kingdom because the number of animals from arthropoda phylum is highest on planet Earth.

Body symmetry: bilaterally symmetrical

Habitat: All types of habitats ranging from deepest oceans to
 highest mountains.

Coelom: Eucoelomate 

Germinal layers: triploblastic

Structure: different types of body structures are seen. Some have hard exhauskeleton. Some are 8 legged.

Reproduction: these are unisexual animals. Sexual reproduction takes place in them. Metamorphosis seen such as eggs, larvae, pupae and adult.

Locomotion: swimming, creeping, flying, walking, etc.

Examples: honey bee 🐝, crab 🦀, scorpion🦂 , spider 🕷️, all insects such as cockroach 🪳, ant 🐜,  butterfly 🦋, Centipede, millipede, prawn 🦐, etc

 
*जो व्यक्ती आपल्याला समजून घेते
 आणि समजावूनही सांगते 
ती व्यक्ती योगायोगाने नाही 
तर नशिबाने भेटते*
🎷