10th, Sci. Animal classification. 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण 6.

 

10th, Sci. Animal classification. 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण 6.


आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇

आज आपण उर्वरित प्राणी संघांचा अभ्यास करू.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मृदुकाय प्राणीसंघ (Phylum- Mollusca)


स्वरूप: या प्राण्यांचे शरीर हे मऊ, अखंडित आणि बुळबुळीत असते म्हणून यांना मृदुकाय

 प्राणी म्हणतात. काही प्राण्यांमध्ये कॅल्शियम-कार्बोनेट (CaCO3) युक्त संरक्षक कवच (Shell) असते. उदाहरणार्थ- शंख व शिंपले.

आद्यस्तर: शरीर त्रिस्तरी असते. 

वैशिष्ट्ये:हा प्राण्यांमधील दुसरा सर्वांत मोठा असा संघ आहे.(प्रथम संघ संधिपाद). आंतरांग संहती ‘प्रावार’ (Mantle) या पटली-संरचनेने आच्छादलेली असून हे प्रावार कठीण असते.

देहगुहा: सत्य देहगुहायुक्त

आधिवासी: हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही प्राणी गोड्या पाण्यातही आढळतात.

प्रजनन: हे प्राणी एकलिंगी असतात व लैंगिक प्रजनन करतात.

प्रचलन: शरीराचे प्रचलन हे पोहणे किंवा सरपटणे या क्रियेतून होते.

उदाहरण: कालव, द्विपूट/ शिंपला (Bivalve), गोगलगाय, ऑक्टोपस, स्क्विड (squid), इत्यादी.



Phylum- Mollusca

Characteristics: Body of these animals is soft, unsegmented and slimy. Hence they are referred as mollusc. This is second largest phylum in animal kingdom.(first is arthropoda)

Body symmetry: Except animals like snail, their body shows bilateral symmetry.

Habitat: These animals are aquatic or terrestrial. Most of the aquatic molluscs are marine, but few animals are fresh water dwellers too.

Coelom: eucoelomate

Germinal layers: Body of these animals is triploblastic.

Structure: Visceral mass is covered with mantle. This 

mantle secretes a hard, calcareous shell made up of calcium carbonate. This shell may be external or internal or even absent in some cases.

Reproduction: . These animals are unisexual and show sexual reproduction.

Locomotion: is by swimming, some animals creeping by foot.

Examples: Bivalve, Snail, squid, Octopus, etc. 



कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum- Echinodermata)

स्वरूप: ह्या प्राण्यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे (Spines) किंवा पट्टिकांचे (Ossicles/ plates) बनलेले असते.

शारीरिक समिती: या प्राण्यांच्या शरीरात प्रौढावस्थेत पंच-अरियसममिती आढळते; परंतु त्यांच्या अळी अवस्थे मध्ये द्विपार्श्व सममिती असते.

आद्यस्तर: शरीर त्रिस्तरी

वैशिष्ट्ये: कंटकचर्मी कंटक म्हणजे काटे व चर्म म्हणजे त्वचा, या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. शरीरातील नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी 

 होतो. 

देहगुहा: देहगुहायुक्त

आधिवासी: हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात.

प्रजनन: या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन / पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते.

 हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. लैंगिक प्रजनन करतात.

प्रचलन: हे प्राणी नलिकापाद (Tube-feet) यांच्या साहाय्याने प्रचलन करतात. काही प्राणी स्थानबद्ध (Sedentary) असतात.

उदाहरण : तारा मासा (Star Fish ⭐), सी-अर्चिन, ब्रिटलस्टार, सी- ककुंबर, इत्यादी.



Phylum- Echinodermata

Characteristics: Calcareous spines are present on the body of these animals; hence they are called as echinoderms.Tube feet are useful for capturing the prey.These animals have good ability of regeneration


Body symmetry: They show radially symmetrical in adult
stage. However, they show bilateral symmetry in larval stage.

Habitat: These animals are found only in ocean.

Coelom: eucoelomate

Germinal layers: triploblastic

Structure: They have skeleton made up of calcareous spines and / or ossicles (plates).

Reproduction: These animals are mostly unisexual. They show sexual reproduction.

Locomotion: They perform locomotion with the help of tube-feet. Some animals are sedentary.

Examples: Star fish ⭐, sea-urchin, brittle star, sea-cucumber, etc.


एक वैशिष्ट्य : तारामासा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू
शकतो व त्या एका भुजे पासून संपूर्ण शरीराची पुनर्निर्मिती करू शकतो.


One feature : In certain situations, star fish can break apart its body
parts and 

being able to grow an entire new body from just a single arm.


अर्धसमपृष्ठरज्जूप्राणीसंघ (Phylum- Hemichordata)


स्वरूप
: श्वसनासाठी ह्यांना एक ते अनेक कल्लाविदरे (Pharyngeal gill slits) असतात. या प्राण्यांचे शरीर तीन प्रमुख भागांमध्ये विभागलेले असते.
ते असे शुंड (Proboscis), गळपट्टी (Collar)आणि
प्रकांड (Trunk).

शारीरिक समिती: द्विपार्श्व सममिती

आद्यस्तर: त्रिस्तरीय

वैशिष्ट्ये: ह्या प्राण्यांना साधारणपणे ‘ॲकॉर्नकृमी’ म्हणतात. फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून यांना
अर्धसमपृष्ठरज्जूप्राणी म्हणतात.

देहगुहा: त्रिस्तरीय

आधिवासी: हे सागरनिवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात.

प्रजनन: हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी असू शकतात. लैंगिक प्रजनन करतात.

प्रचलन: पेरिस्टाल्टिक आकुंचन प्रसरण क्रियेतून सरपटत दृढ रोमाद्वारे प्रचलन करतात.

उदाहरण: सॅकोग्लॉसस आणि बॅलेनोग्लॉसस हे प्राणी समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू प्राणी यांच्यातील दुवा समजले जातात.

       

       Phylum- Hemichordata


Characteristics: Notochord is present in proboscis
region only. Hence, they are called as
hemichordates.(hemi – half). These animals are also called as ‘acorn worms’. Acorn worms are named for the acorn-shaped front end of their bodies. They are closely related to echinoderms and chordates.

Body symmetry: bilaterally symmetrical

Habitat: These animals are marine , live in burrows
in sand (seafloor).

Coelom: They have a true coelom.

Germinal layers: triploblastic

Structure: Body of these animals is divided into three
parts as proboscis, collar & trunk.

Reproduction: They are unisexual or some may be hermaphrodite. They show sexual reproduction.

Locomotion: Hemichordates move by peristaltic contractions of the proboscis. They have ciliated structures that helps locomotion

Ex.: Saccoglossus, Balanoglossus is considered as connecting link
between non-chordates and chordates. .


त्रिस्तरी  म्हणजे काय हे पुन्हा एकदा पाहू

 जर प्राण्यांचे शरीर बहिर्जनस्तर, मध्यजनस्तर आणि अंत:स्तर अशा तीन जननस्तरांपासून बनलेले असेल तर त्यास त्रिस्तरी असे म्हणतात.


Triploblastic means if the body of animal  is made up of three germ layers- endoderm, ectoderm & mesoderm then they are called as triploblastic.



                  *काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होण

 पण गरजेचं असत…,*

                    *आपण वाईट आहोत म्हणून नाही,

 तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी….*


     *आपला दिवस आनंदी जावो.*🎷