10 वी भाग II, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान, 10th part II, Cell Biology and Biotechnology. 1
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇
आज आपण असा धडा पाहणार आहोत ज्याचा भविष्यातही खूप उपयोग होणार आहे. आपले उज्वल भविष्य याच पाठावर आधारित आहे. नवीन संशोधन व शोध कार्य करण्यासाठी हा धडा उपयुक्त ठरेल.
नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी या धड्यातून आपल्याला नक्कीच मिळू शकतात.
Today we are going to see a lesson that will be very useful in the future. Our bright future is based on this lesson. This chapter will be useful for new research and discovery work.
We can definitely get job or business opportunities from this lesson.
काही माहिती आपल्याला आयुष्यभर माहित हवी त्यातील पेशी, ऊती यांच्या व्याख्या.
Some information we need to know throughout our life is the definition of cells, tissues.
पेशी म्हणजे काय?
उत्तर: सजीवांच्या शरीराचे संरचनात्मक व कार्यात्मक आणि लहानात लहान जैविक एकक जे स्वतंत्रपणे प्रजनन करू शकते त्यास पेशी म्हणतात.
What is cell?
Ans.The smallest structural and functional unit of living matter that makes up all living things.
ऊती म्हणजे काय?
उत्तर: सजीवांचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला उती म्हणतात.
What is tissue?
Ans: Tissue is a group of cells that work together to perform a similar function.
ऊती संवर्धन म्हणजे काय?
उत्तर: सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतूक माध्यमात सजीवांच्या पेशी किंवा ऊतींची वाढ करणे या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात.
What is the tissue culture?
Ans: A method of biological research in which fragments of tissue from an animal or plant are transferred to an artificial environment in a nutrient and sterile medium in which tissues can continue to survive and function.
ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया कोणत्या आहेत?
उत्तर: प्राथमिक संस्कार, प्रजनन/ विभाजन/ बहुविधन, खोड-मुलारंभ, प्राथमिक कठीण्यकरण, द्वितीय कठीण्यकरण इत्यादी, प्रक्रिया ऊती संवर्धन करताना कराव्या लागतात.
Which are the various processes in tissue culture?
Ans: primary treatment, reproduction /cell division /multiplication, shooting or rooting, primary hardening, secondary hardening etc. are the processes in tissue culture.
पेशी विज्ञान (Cytology)
पेशींचे प्रकार पेशीची रचना पेशीतील विविध अंगके आणि पेशी विभाजन इत्यादींचा अभ्यास म्हणजे पेशी विज्ञान होय. पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. मानवी आरोग्य क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात क्रांतिकारी बदल पेशी विज्ञानामुळेच घडून आले.
Cell Biology / Cytology
The study of structure, types and different organelles of the cell, cell division and some other aspects together is known as cell biology or cytology.It is a branch of zoology. In the field of human health, there are revolutionary changes due to advances of cell biology.
मूलपेशी ( stem cell)
- शरीरातील ज्या विशिष्ट पेशी इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात तसेच जखम भरून काढतात अशा पेशींना मूलपेशी असे म्हणतात.
- वाढीच्या सुरुवातीच्या काळात असणाऱ्या युग्मनजातील सर्व पेशी मूलपेशीच असतात. नाळेचे रक्त साठवण्याची काळजी त्यामुळे काही पालक घेतात.
- मूलपेशी कोणत्याही प्रकारच्या ऊतींची निर्मिती करू शकतात.
- एखाद्या अवयवाच्या ऱ्हास पावलेल्या भागाची पुनर्निर्मिती मूलपेशी द्वारे करता येते.
- मुल पेशींच्याद्वारे प्रयोग शाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती मायटॉसिस क्रियेतून तयार करत येतात.
Stem Cell
- In the body of multicellular organisms special types of cells are present that can give rise to cells of all other types are called stem cells.
- The zygote formed after fertilization contain stem cells. They can give rise to new organism.
- At the time of wound healing stem cells perform important function.
- In laboratory new tissues are produced with the help of stem cells by mitosis division..
मूलपेशी कोठे असतात?
- आईच्या गर्भाशयातील नाळेत.
- भृणाच्या कोरकपुटी ( blastocyst) अवस्थे मध्ये.
- प्रौढ व्यक्ती मधील मेद ऊती मध्ये. (Adipose tissue)
- रक्तामध्ये.
- रक्त अस्थी मज्जेत ( red bone marrow)
Where are stem cells found?
- In red bone marrow.
- Adipose tissue adult human beings.
- In the umbilical cord present in the uterus of mother.
- In the blastocyst stage of embryonic development.
- In blood.
*पायाचं दुखणं आणि संकुचित विचार,
माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत…!*
*तूटलेली लेखणी आणि इतरांशी इर्शा,
स्वतःच भाग्य लिहू देत नाही…!!*
*कामाचा आळस आणि पैशाचा लोभ,
माणसाला मोठ होऊ देत नाही…!!*
*आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे,
हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही..!!*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷