10 वी, भाग II, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान 2, 10th, part II, Cell Biology and Biotechnology 2
मानवाने मानवासाठी काहीतरी हातभार लावलाच पाहिजे. आज आपण एका विषयावर येणार आहोत जो भविष्यकाळासाठी काळाची गरज ठरणार आहे. तो विषय म्हणजे अवयव -दान व देहदान.
We must contribute something for humans. Today, we are going to discuss a topic that will become crucial for the future – organ donation and body donation.
🎷 स्रोताच्या आधारावर मूलपेशींचे दोन प्रमुख प्रकार कोणते?
उत्तर: स्रोताच्या आधारावर मूलपेशींचे दोन प्रमुख प्रकार
भ्रूणीय मूलपेशी (Embryonic stem cells)
वयस्क/ प्रौढ मूलपेशी (Adult stem cells)
🥁Which are the two types of stem cells depending upon the source?
Ans: Depending upon the source, the two types of stem cells are as follows
Embryonic stem cells
Adult stem cells.
🥁 मुल पेशींचे जतन कसे केले जाते?
उत्तर:
- मुल पेशींच्या जतन क्रियेसाठी द्रवरूप नायट्रोजन चा वापर केला जातो.
- मूलपेशींचे जतन करण्याकरीता नाळेतील रक्त, रक्त-अस्थिमज्जा अथवा कोरकपुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतूविरहीत अशा छोट्या छोट्या कुप्यांमध्ये ठेवले जाते.
- ह्या कुप्या -135 0 C पासून -190 0 C इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवून त्यांचे सुरक्षित जतन केले जाते.
🎷 How stem cells preserved?
Ans:
- liquid nitrogen is used for the purpose of preservation of stem cells.
- Stem cell samples are carefully collected from sources like cord blood, red bone marrow or embryo (blastocyst) and are kept in small, sterile vials.
- Those vials are kept in liquid nitrogen at -135° C to -190° C.
भ्रूणीय मूलपेशी (Embryonic stem cells)
उत्तर:
- फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व फलित अंड्याचे रूपांतर भ्रूणात होते.या भ्रूणपेशींचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होते. याच भ्रूणपेशींना मूलपेशी असे म्हणतात.
- गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृतपेशी, चेतापेशी इ. निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. या सर्व पेशी एकाच मूल पेशीपासून तयार होतात.
- आश्चर्य म्हणजे मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीं पासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशींपासून जन्म घेतात.
- मूल पेशी या अविभेदित, प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. म्हणजेच मूलपेशी सर्व मानवी पेशींच्या पालकपेशी असतात.
- 14 व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजे 5 ते 7 व्या दिवशी जर या मूल पेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवले व त्यांना विशिष्ट
- जैवरासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशींमध्ये, त्यापासून ऊतींमध्ये व नंतर त्या अवयवांमध्ये होऊ शकते असे दिसून आले आहे.
- फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व त्याचे रूपांतर भ्रूणात होते. या भ्रूणपेशींचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होते व असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या पेशींना मूलपेशी असे म्हणतात. म्हणजेच मूलपेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला ‘बहुविधता’ (Pluripotency) असे म्हणतात.
🎺 Embryonic stem cells
Ans:
- Embryonic cells before differentiation are called as embryonic stem cells.
- Division of the zygote starts and thereby it is converted into embryo.
- 220 different types of cells in human body are formed from single type cells i.e. embryonic stem cells.
- Thus, stem cells are primary type of undifferentiated cells with self-multiplying ability and they are parent cells of all types of human cells. This property of stem cells is called as pleuripotency.
- It has been found that if these stem cells are collected well before the beginning of differentiation on 14th day i.e. during 5th – 7th day and cultured with certain biochemical stimulus in laboratory, as per the stimulus, they can transform themselves into desired type of cells, thereby tissues and finally into organs.
🎺 अवयवदान व देहदान
- विज्ञानाच्या प्रगतीतून आपणास जेव्हा लक्षात आले की मृत्यूनंतरही शरीरातील काही अवयव चांगल्या स्थितीत असू शकतात, तेव्हा त्या अवयवांचा गरजवंत रुग्णास वापर केला असता त्यांचे आरोग्य चांगले होते हे लक्षात आले.
- देहदान आणि अवयव दान या संकल्पनेतून आपण गरजवंत रुग्णास चांगले आयुष्य देऊ शकतोत.
- एखाद्याला उत्तम आरोग्य मिळावे किंवा एखाद्यास जीवदान मिळावे यासाठी अवयवदान योग्य ठरते.
- त्वचा, डोळे, हाडे, फुप्फुसे, स्वादुपिंड, यकृत, वृक, हृदय, हृदयाच्या झडपा इत्यादी अवयवांचे दान करता येते.
फायदे
- अवयव दानातून व्यक्तींचे प्राण वाचवता येतात.
- अंध व्यक्तीस दृष्टी मिळू शकते.
- देहदानातून वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते.
🎷 Organ and body donation
- If the organs of deceased / Dead, Late are in good condition and functional than organs can be used for donation.
- Due to progress in science it is possible to donate organs.
- Someone can lead a better and healthy life after receiving the donated organ.
- Skin, pancreas, bone 🦴, lungs 🫁 eye 👁️, liver, kidney, heart 💖, heart valves etc can be donated.
Benefits
- Blind persons can get the vision by eye donation.
- Organ donations can save the life of other needy patients.
- The critical patients life can be saved by organ donation.
- By body donation, body can be made available for research in medical studies.