10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 4.

 

10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 4.



आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇

आज आपण अत्यंत छोटे छोटे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न जरी छोटे असले तरी त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या ज्ञानात नक्कीच भर पाडतील.

Today we are going to see very small questions. Although the questions are short, answering them will surely add to our knowledge.

🎷 नावे लिहा. Name the following.

1. फुलातील आवश्यक मंडले.
उत्तर: पुमंग आणि जायंग हे फुलातील आवश्यक मंडले आहेत.

* Two essential whorls in flower.
Ans: Androecium and gynoecium


2. फुलातील अतिरिक्त मंडले.
उत्तर: निदलपुंज आणि दलपुंज हे फुलातील अतिरिक्त मंडले आहेत.

* Two accessory whorls in flower.
Ans: calyx and Corolla.


3. जुळ्यांचे प्रकार.
उत्तर: 
1. एकयुग्मजी जुळे,
2. सायमिज जुळे,
3. द्वि युग्मजी जुळे हे तीन जुळ्यांचे प्रकार आहेत.

* Types of twins.
Ans:
 Monozygotic twins, 
Siamese twins and 
dizygotic twins.


4. पुरुष प्रजनन संस्थेची संबंधित विविध संप्रेरके.
उत्तर: 
  • 1. पियुषिकेतून स्त्रवणारी पुटीका ग्रंथी संप्रेरक FSH
  • 2. पीतपिंडकारी संप्रेरक LH म्हणजेच ICSH आणि
  • 3. वृषणातून स्त्रवणारे टेस्टोस्टेरॉन.

* Hormones related with male reproductive system.
Ans: 
  • Follicles stimulating hormone FSH.
  • ICSH interstitial cell-stimulating hormone. or Luteinizing hormone secreted by pituitary gland,
  • Testosterone secreted by testis.


5. पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध ग्रंथी
उत्तर: शुक्राशय, पुरस्थग्रंथी आणि काऊपर्स ग्रंथी.

* Different glands associated with male reproductive system.
  • Ans: seminal vesicles, 
  • prostate gland, 
  • Cowper’s or bulbourethral glands.

6. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्त्रवली जाणारी संप्रेरके.
उत्तर: इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन

* Hormones secreted by overy of female reproductive system.
Ans: Estrogen and 
progesteron.


7. प्रजननासंबंधी आधुनिक तंत्रज्ञान पद्धती.
उत्तर: काचनलिकेतील फलन IVF, भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी.

* The modern techniques in reproduction.
Ans: 
  • In Vitro Fertilization IVF, 
  • Surrogate mother,
  • Sperm Bank.


8. कुटुंबनियोजनाची साधने.
उत्तर:  कॉपर टी (तांबी), निरोध, तोंडावाटे घ्यावयाच्या संतती नियमनाच्या गोळ्या.

* Methods of family planning.
Ans: 
  • copper T,
  • Oral contraceptive pills.
  • Condoms

9. कोणतेही दोन लैंगिक रोग.
उत्तर:  एड्स AIDS , सायफिलीस, गोनोऱ्हीया.

* Any two sexual diseases.
Ans: 
Gonorrhoea
Syphillis.


10. सायफिलीसची लक्षणे
उत्तर: शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे.


* Symptoms of syphilis.
Ans: 
Occurrence of chance (patches) on various parts of body including genitals, rash, fever, inflammation of joints, alopecia  ( hair loss or baldness )


11. गोनोऱ्हीयाची लक्षणे.
उत्तर: लघवी करताना आग व वेदना होणे शिश्न व योनी मार्गातून पू स्त्रावणे, मित्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे.

* Symptoms of gonorrhoea.
Ans: 
Painful and burning sensation during urination,
Oozing of pus through penis and vagina,
Inflammation of urinary tract, anus, throat, eyes etc


12. मासिक पाळीत रक्तस्त्राव किती दिवस सुरू राहतो.
उत्तर: मासिक पाळीत रक्तस्त्राव हा साधारणतः पाच दिवस सुरू राहतो.

* How long does menstrual bleeding last?
Ans: Bleeding continues approximately for 5 days.

13. गर्भाशयातील वाढीच्या काळात 
भ्रूणानास अन्नपुरवठा कोण करतो.
उत्तर: अपरा 

* During growth in uterus
Who supplies food to the fetus?
Ans: placenta

🎺 पुढील अवयवांची कार्ये लिहा.
Write the functions of the following organs.

1. Calyx.
Ans: protection of inner whorls of flower and protection of bud.

* निदलपुंज.
उत्तर: फुलांच्या आतील मंडलांचे संरक्षण व कळीचे रक्षण करणे.

2. Corolla.
Ans:
Attracting insects for pollination,
Protection of inner whorls of flower.

* दलपुंज.
उत्तर: 
परागीभवन क्रियेत कीटकांना आकर्षित करणे.
फुलांच्या आतील मंडलांचे संरक्षण.

3. Sporangium.
Ans: production of spores,
Releasing spores by bursting.


* बिजाणुधानी.
उत्तर: बिजाणुची निर्मिती,
 बिजाणू बाहेर सोडणे.

4. Androecium.
Ans: production of pollen grains the male gametes of flower.

* पुमंग.
उत्तर: पुमंग हे पुल्लिंगी दल असून, पुयुग्मके निर्मिती.


5. Gynoecium.
Ans: production of female gametes of flower,
Participating in production of fruits.


* जायंग.
उत्तर स्त्रीयुग्मके निर्मिती, 
फळ तयार करताना सहभाग.

6. Endosperm.
Ans: Nourishment of the growing embryo.

* भ्रूणपोष.
वाढणाऱ्या भ्रणाचे पोषण.


7. Testis.
Ans: Production of sperms and male hormone e.


* वृषण.
उत्तर शुक्रपेशी निर्मिती आणि पुरुष संप्रेरक, टेस्टोस्टेरॉनची निर्मिती.


8. Scrotum.
Ans: Protection and temperature control of testis.


* वृषणकोश.
उत्तर: वृष्णाचे संरक्षण, वृषणाचे तापमान नियंत्रण.

9. Seminal vesicles.
Ans: Secretion of seminal fluid which forms major portion of semen. Nourishment of sperms.


* शुक्राशय.
उत्तर: रेत ज्यापासून बनते तो स्त्राव तयार करणे,
शुक्र पेशींचे पोषण करणे.


10. Penis.
Ans: Transferring the sperms to vagina at the time of intercourse,
Release of urine at the time of urination.


* शिश्न.
उत्तर: समागमाच्या वेळी रेत बाहेर टाकणे,
एरवी मूत्र बाहेर टाकणे.


11. Ovary.
Ans: Production of oocytes and female hormone – estrogen and progesterone.


* अंडाशय
उत्तर: अंडपेशींची निर्मिती.
स्त्री संप्रेरके इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन यांची निर्मिती.


12. Uterus.
 Answer: Growth and development of foetus during pregnancy. Helping in parturition (childbirth) by contractions

* गर्भाशय.
उत्तर: गर्भाची वाढ आणि विकास,
प्रसुतीस मदत करणे.

वरील माहिती आपले ज्ञान तर वाढवतेच त्याचसोबत पाठांतर वाढीस पण हातभार लागतो.

The above information not only increases your knowledge, but also contributes to increase learning process.

*माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्मानेच होते.. 

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर, फारसे मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच नाही, ज्याला सगळे चांगले म्हणतील…*

    🌼 *🎺🎷🥁*🌼