10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 7.


10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 7.


आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

फुले सर्वांनाच आवडतात परंतु फुलांच्या सर्व भागांची माहिती व नावे माहीत नसतात. आज आपण फुलाची रचना पाहू. फुलातील आश्चर्यकारक घटक व त्यांची माहिती, कार्य अभ्यासणे आनंददायक ठरेल.


🥁 फुलाची रचना

एकक: वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.

मंडले: फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण चार मंडले असतात- निदलपुंज (Calyx), दलपुंज (Corolla), पुमंग (Androecium) आणि जायांग (Gynoecium).

आवश्यक मंडले: पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात म्हणून यांना ‘आवश्यक मंडले’ (Essential Whorls) म्हणतात.

अतिरिक्त मंडले:  निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलांच्या संरक्षणाचे काम करतात म्हणून त्यांना ‘अतिरिक्त मंडले’ (Accessary

Whorls) म्हणतात.

 निदल: निदलपुंजातील घटक दलांना ‘निदल’ म्हणतात आणि  निदल हिरव्या रंगाचे असतात. पाकळ्या: दलपुंजातील घटक दलांना ‘पाकळ्या’ म्हणतात आणि पाकळ्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात.

पुंकेसर: पुमंग हे पुल्लिंगी (Male) दल आहे. त्याच्या घटक दलांना पुंकेसर (Stamen) म्हणतात. 

स्त्रीकेसर: जायांग हे स्त्रीलिंगी (Female) दल आहे. त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर (Carpel) म्हणतात.

 उभयलिंगी फूल: जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला ‘उभयलिंगी’ (Bisexual) म्हणतात. उदा. जास्वंदी, गुलाब, टोमॅटो, आंबा इत्यादी.

एकलिंगी फूल: जर फुलामध्ये पुमंग आणि जायांग पैकी एकच मंडल असेल तर अशा फुलाला ‘एकलिंगी’ फूल म्हणतात.

 नर फूल: जर फुलांमध्ये फक्त पुमंग असेल तर ‘नर फूल’ आणि फक्त जायांग असेल तर ‘मादी फूल’म्हणतात. उदा. पपई, टरबूज, काकडी.

पुष्पवृंत: बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला ‘पुष्पवृंत’ (Pedicel) म्हणतात आणि अशा फुलांना पुष्पवृंती फुले म्हणतात स्थानबद्ध फुले: देठच नसणाऱ्या फुलांना ‘स्थानबद्ध’ (Sessile) फुले म्हणतात.


🌹Everyone likes flowers but not all the information and names of the parts of flowers are known. Today we will look at the structure of the flower. It will be a pleasure to study the amazing parts of flowers and their information & functions.


🥁 Parts of flower 

Unit: Flower is structural unit of sexual reproduction in plants.

Floral whorls : Flower consists of four floral whorls as calyx, corolla, androecium and  gynoecium; arranged in sequence from outside to inside.

Essential whorls: Androecium and gynoecium are called ‘essential whorls’ because they perform the function of reproduction.

 Accessory whorls: Calyx and corolla are called as ‘accessory whorls’ because they are  responsible for protection of inner whorls. 

Sepals: Members of calyx are called as ‘sepals’ and they are green coloured. 

Petals: Members of corolla are called as ‘petals’ and they are variously colored.

Bisexual flower: A flower is called as ‘bisexual’ if both whorls i.e. androecium and gynoecium are present in the same flower. Ex. Hibiscus, Rose, tomato, mango. 

Unisexual flower:  A flower is called as ‘unisexual’ if any one of the two whorls such as androecium and gynoecium  is present in the flower. If only androecium is present, it is

‘male flower’ and if only gynoecium is present, flower is ‘female flower’. Ex. Papaya, Bitter gourd, pumpkin, cucumber🥒, ect.

Pedicel: Many flowers have the stalk for support, called as ‘pedicel’ and such flowers are called as ‘pedicellate’. 

Sessile flower: Flower without stalk is called as ‘sessile’.

 Ex. Rice, Wheat,Saffron, Chaff flower,


🎺 आवृत्तबीजी वनस्पतीमधील द्विफलन

परागण: परागण हि  क्रीया अजैविक घटक वारा, पाणी किंवा जैविक घटक कीटक, पक्षी आणि इतर प्राणी, पक्षी यांच्या मदतीने होते. 

अंकुरित परागकण : परागणाच्या वेळी कुक्षी चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर परागकण अंकुरित होतात. म्हणजेच त्यांत दोन पुंयुग्मक तयार होतात.

परागनलिका: पराग कणापासून एक दीर्घ परागनलिका तयार होते. परागनलिका दोन पुंयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोषात पोहोचते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुंयुग्मक भ्रूणकोषामध्ये सोडले

जातात. 

फलन: दोन पैकी एक पुंयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज (Zygote) तयार होतो. यालाच फलन (Fertilization) म्हणतात.

भ्रूणपोष:  दुसरे पुंयुग्मक दोन ध्रुवीय केंद्राकांशी संयोग पावून भ्रूणपोष (Endosperm) तयार होतो. 

द्विफलन: या फलन प्रक्रियेत दोन पुंयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन (Double Fertilization) म्हणतात.


🥁 Double fertilization in angiosperms 

.

Pollination:  Pollination occurs with the help of abiotic agents like wind, water and biotic agents like insects, birds and other animals. 

Stigma: Stigma becomes sticky during pollination.

Male gametes: Pollens germinate when they fall upon sticky stigma i.e. a long pollen tube and two male gametes are formed.

Pollen tube: The pollen tube carries male gametes. Pollen tube reaches the embryo sac via style. Tip of the pollen tube bursts and two male gametes are released in embryo sac.

Fertilization: One male gamete unites with the egg cell to form zygote. This is fertilization. Endosperm: Second male gamete unites with two polar nuclei and endosperm is formed.

Double fertilization: Double fertilization is a complex process as two male nuclei participate with female gamet , so it is called as double fertilization. 



                 *नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही,*

                 *पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच.*


     *आपला दिवस आनंदी जावो.*🎷