10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 8.
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला 🔗 स्पर्श करा👇
🎺 मानवी पुरुष प्रजनन संस्था (Male reproductive system)
- घटक अवयव: मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण (Testes), विविध वाहिन्या/नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते.
- वृषण: वृषण जोडी उदर पोकळीच्या बाहेर वृषणकोषामध्ये (Scrotum) असते.
- शुक्रपेशी: वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. त्यांमध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी (Germinal epithelium) अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी (Sperm) तयार करतात.
- नलिकांचा क्रम: तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे पाठवल्या जातात. त्या नलिकांचा क्रम वृषणजालिका (Rete testis), अपवाहिनी (Vas efferens),अधिवृषण (Epididymis), शुक्रवाहिनी (Vas deferens), स्खलन वाहिनी (Ejaculatory duct), मूत्र-जनन वाहिनी (Urinogenital duct) असा आहे.
- शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात तसतसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र बनतात.
- वीर्य: शुक्राशय , पूरस्थ ग्रंथी आणि काऊपर्स ग्रंथी अशा तीन ग्रंथींचा स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत म्हणजेच वीर्य तयार होते.
- समागमाच्या वेळी रेत शिश्नाद्वारे योनीत सोडले जाते.
Human male reproductive system
- component: Male reproductive system of humans consists of testes, various ducts and glands.
- Testes: Testes are present in the scrotum, outside the abdominal cavity.
- Testes contain numerous seminiferous tubules.
- Germinal epithelium present in the tubules divide by meiosis to produce sperms.
- Pathway: Those sperms are sent forward through various tubules. Sequence of those tubules is as-rete testis, vas eferens, epididymis, vas deferens, ejaculatory duct and urinogenital duct.
- As the sperms are pushed forwards from one duct to next, they become mature and able to fertilize the ovum.
- Sperm: The seminal vesicles and prostate gland produce a whitish fluid called seminal fluid. As it passes through the prostate gland, a milky fluid is added to make semen.
- During intercourse, semen is released from the penis into the vagina.
🥁 मानवी स्त्री-प्रजनन संस्था
(Female reproductive system)
- स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदर पोकळीतच असतात.
- अवयव: स्त्री प्रजनन संस्थेमध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो.
- ग्रंथी: बर्थोलिन ग्रंथीची एक जोडी हि योनी मुखाच्या मार्गात असते.
- साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी: अंडपेशी आळी-पाळीने एका एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडली जाते.
- अंडनलिका: अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासरखा असतो. त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते.
- रोमक: अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात. हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात.
- शुक्राणू: रेतातील काही दशलक्ष शुक्राणू पैकी एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करते.
- जनन मार्ग: गर्भाशयाची खालचे तोंड योनीमध्ये उघडते व याच जनन मार्गातून बाळ जन्माला येते.
- योनीचे कार्य: मासिक स्तरावरचा निचरा करणारा मार्ग समागमाचा मार्ग आणि बालकाचा जन्म होणारा मार्ग असे तिहेरी कार्य योनी द्वारे केली जातात.
🎺 Human female reproductive system
- All organs of female reproductive system are in abdominal cavity.
- Organs of female reproductive system includes a pair of ovaries, a pair of oviducts, single uterus and a vagina.
- Gland: With these, a pair of Bartholin’s gland is also located on either side of the vaginal opening. .
- Generally, every month, an ovum is released in abdominal cavity alternately from each ovary.
- Free end of oviduct is funnel-like. An opening is present at the center of it. Oocyte enters the oviduct through that opening.
- Cilia are present on inner surface of oviduct. These cilia push the oocyte towards uterus through the fallopian duct.
- Oocyte fertilize only in the middle part of the fallopian duct.
- Triple function of vagina: Vagina function as a passage for menstrual flow, copulatory passage and the birth canal.
🥁 जुळे (Twins)
व्याख्या: गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होऊन दोन अपत्ये जन्मास येणाऱ्या अपत्यांना जुळी अपत्ये म्हणतात.
Twins
Definition: When two embryos develop simultaneously in
the same uterus and thus two offsprings are delivered simultaneously are called as twins.
🎷 द्वियुग्मजी जुळे
- दोन निरनिराळ्या युग्मनजा पासून निर्माण होणाऱ्या जुळ्यांना द्वियुग्मजी जुळे म्हणतात.
- द्वियुग्मजी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात.
- दोन्ही अपत्यांचे लिंग एक किंवा वेगळे असू शकते.
Monozygotic twins
- Definition: From single embryo (one zygote) when twins are formed they are called monozygotic twins.
- Monozygotic twins are genetically exactly similar to each other.
- In monozygotic twins gender of the twins is same.
*माणूस आनंदामागे धावत नाही तर, आनंदाच्या संकल्पनेमागे धावतो…*
*विशिष्ट प्रकारेच आनंद मिळायला हवा हा अट्टाहासच खरं तर दुःखाच कारण बनतो…!*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷