10th Science, part II environmental management, 10 वी विज्ञान भाग 2, पर्यावरणीय व्यवस्थापन 4.

 

10th Science, part II environmental management, 10 वी विज्ञान भाग 2, पर्यावरणीय व्यवस्थापन 4.

दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे. जॉईन होण्यासाठी निळ्या लिंक ला स्पर्श करावा.

👇What’s app link 👇


ग्रुप वर जॉईन का व्हावे? याचे कारण….
  • आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.
  • दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो.
  • एखाद्याने प्रश्न विचारला व आपल्याला त्या प्रश्नाचे जर उत्तर देता आले तर तो आनंद वेगळाच असतो.
  • तुम्ही विद्यार्थी आहात तर शिकले पाहिजे, वयाने मोठे भाऊ-बहीण आहात तर लहान मुलांना अभ्यासात मदत करता आली पाहिजे, पालक आहात तर मुलांचा अभ्यास घेता आला पाहिजे, आजोबा/ आजी आहात तर नातवाच्या प्रश्नांचे उत्तर देता आले पाहिजे. 
  •  विज्ञानातील बराचसा भाग हा शाश्वत आहे, त्यामुळे बरेच विज्ञान आपल्याला आले पाहिजे.
  • देशाची प्रगती करायची असेल तर शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत. शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी विज्ञान समजले पाहिजे.
  • आणखीन कितीतरी कारणे आपणास सांगता येतील, यासाठी सस्नेह निमंत्रण🙏🎷.

चला लक्षात ठेवूया व त्याप्रमाणे वागूया. पुढील वाक्य ही नुसतीच घोषवाक्य नसून त्यांची तंतोतंत अंमलबजावणी आपण केली पाहिजे.
  • वनश्री हीच धनश्री.
  • वृक्षनाश म्हणजेसर्वनाश.
  • राखावया पर्यावरण, करू चला वनीकरण.
  • कागदाची काटकसर म्हणजे वृक्षतोडीला आवर.
  • पर्यावरण रक्षणाची धरा कास, तरच होईल मानवाचा विकास.
  • आरोग्याची गुरुकिल्ली, शुद्ध हवा, शुद्ध .
  • पर्यावरण रक्षण, हेच मूल्यशिक्षण.
  • एक दोन तीन चार, झाडे देतात सावली गार.
  • वृक्षांचे करा संवर्धन धरतीचे होईल नंदनवन.

Let us remember and act accordingly. The following sentence is not just a slogan but we must implement it precisely.
Always Remember
Let us remember…. Let us behave accordingly……
  • Forest is Wealth.
  • Destroying a plant is to destroy everything.
  • Pure air, pure water is key to healthy life.
  • Practice afforestation to conserve environment.
  • Environmental protection is value education.
  • Provident use of paper is prevention of deforestation.
  • To practice the environmental protection is to development of human society.
  • Conservation of trees will make the earth a paradise.
  • One two three four,  provide the trees cool shade.


धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण कसे केले जाते.
  • संकटग्रस्त प्रजाती (Endangered species) : या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते, किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो, की विशेष उपाययोजना न केल्यास काही काळात या प्रजाती नष्ट होण्याची शक्यता जास्त असते . उदाहरणार्थ, लायन-टेल्ड वानर, तणमोर.
  • दुर्मीळ प्रजाती (Rare species):  या प्रजातींची संख्या खूपच कमी असते. या प्रजाती स्थानविशिष्ट म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणीच असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात.  उदाहरणार्थ, रेड पांडा, कस्तुरी मृग.
  • संवेदनशील प्रजाती (Vulnerable species):  या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने कमीच होत राहते. सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातींबाबत चिंतेचे मुख्य कारण आहे. उदाहरणार्थ, पट्टेरी वाघ, गीरचे सिंह.
  • अनिश्चित प्रजाती (Indeterminate species): या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयींमुळे (उदाहरणार्थ, बुजरेपणा) अशा प्रजातींबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते, मिळत नसते.  उदाहरणार्थ, शेकरू खार.

How are endangered / Threatened species classified?
  • Endangered Species: Either number of these organisms is declined or their habitat is shrunk to such an extent that they can be extinct in near future if conservative measures are not implemented. Example, Lion tailed monkey, lesser florican.
  • Rare Species: Number of these organisms is considerably declined.Organisms of these species being endemic may become extinct very fast. Example, Red panda, Musk deer.
  • Vulnerable Species: Number of these organisms is extremely less and continues to decline. Continuous decline in their number is worrisome reason. Example, Tiger, Lion.
  • Indeterminate Species: These organisms appear to be endangered but due to their some behavioural habits (like shyness) there is no definite and substantial information. Example, Giant squirrel/ Shekru.

पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. या
पातळ्यांनुसार प्रयत्न करणाऱ्याची विशिष्ट भूमिका ठरते. प्रत्येकाने 
✍️पर्यावरणात माझी भूमिका पुढील मुद्द्यांच्या आधारे ठरवावी.
उत्तर: 
टिकवणे
उपलब्ध साधनसंपत्ती टिकवून
ठेवणे.
जतन:
  •  जे उरले आहे त्याचे जतन करणे.
  •  हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना राबवणे.
  • अज्ञात क्षेत्रे टिकवून ठेवणे.

प्रसार

1. शिक्षण
2. मार्गदर्शन
3. जागृती
4. अनुकरण
5. संघटन
6. प्रत्यक्ष सहभाग.
नियंत्रण
1. हानी रोखणे.
2. हानी करणारी कृती थांबवणे.
3. मानसिकता बदलणे.
निर्मिती
1. पर्यावरणामध्ये हानी झालेल्या
घटकांचे पुनरुज्जीवन करणे.
2. नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे.
 संभाव्य धोके रोखणे.
2. नवीन कृती कार्यक्रम आखणे.
3. पर्यावरणाला हानी पोहचवणारे घटक.

Attempts at various levels are performed for conserving
environment. Role of the person is defined as per these levels. 
✍️ My Role in Environment.
Ans: 
A.) Awareness
1. Education
2. Guidance
3. Awareness
4. Imitation
5. Organization
6. Participation
B.) Preservation
1. Preserving whatever
has been leftover.
2. Remedies to prevent
further loss.
3. Preserving unknown regions.
C.) Prevention
1. Preventing possible
harms.
2. Designing new plans
3. Factors harmful to environment.
D.) Control
1. Preventing the harm.
2. Stopping the harmful
activities.
3. Changing the mindset.
E.) Production
1. Revival of harmed
factors of environment.
2. Attempting innovation.
F.) Conservation
Conserving the available resources.


🎷 एका लहान माणसाची मोठी गोष्ट ✍️  आसाम राज्यामधील जादव मोलाई पयांग हे 1963 ला जन्मले. मोलाई जादव वयाच्या 16 वर्षापासूनच जंगल कामगार म्हणून काम करीत होता. 
गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्यूमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. 
सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला होता. याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. ही योजना थांबविल्यानंतरसुद्धा मोलाईंचे कार्य अविरत सुरू राहिले. 
झाडे लावणे व त्याची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या 
एक कर्तबगार माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले.
आज आसाममध्ये ‘जोरहाट ‘ येथील कोकीलामुख येथे हे जंगल मोलाई च्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून ‘पद्‌मश्री’🎇🥁 या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. आज या जंगलाला ‘मोलाई जंगल’ म्हणून ओळखले जाते. 
अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते हे सिद्ध झाले आहे. आपण यातून नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे.

🥁 The big story of a small man✍️ 
Jadav Molai Payeng is a highly capable person in Assam.
Born in 1963, he is working as a forest worker since the age of
16 years. 
Once, large number of snakes died in the flood of Brahmaputra River flowing by the village. As a preventive measure, Molai planted 20 bamboo plantlets. 
In 1979, the local Social Forestry Department began a social afforestation project on 200 hectares of land. ‘Molai’ was one of the few forest workers who were looking after that project. 
🎷Molai continued to plant the trees even after completion of the project. As a result of his continuous work of planting and caring for the trees, the barren area witnessed the forest cover over the 1360 acres.
Today, this jungle in Kokilamukh of Jorhat district of Assam is the result of the hard work for 30 years. 
 Jadav Molai Payeng has been awarded with the prestigious ‘Padmashree’ award🎇🥁 by government of India for this unparallel work. Now, it is well known as ‘Molai Jungle’. 
Many people come together to destroy the forest, but a single person, if determined, can establish a new forest! We should definitely take inspiration from this.🫡

आज सर्वत्र पर्यावरणाची होत असलेली हानी आपण पाहत आहोत. हे असे घडू नये म्हणून आपण खालील मुद्द्यांचा अवलंब केलाच पाहिजे.
☘️ पर्यावरण संवर्धनाची गरज.
  • निसर्गाचा समतोल टिकविण्यासाठी.
  • नैसर्गिक, मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी.
  • प्रदूषणमुक्त हवा, जल आणि भूमी टिकवण्यासाठी.
  • भविष्यातल्या पिढ्यांचे जीवन गुणवत्तापूर्वक आणि शाश्वत होण्यासाठी.
  • जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी.
  • नैसर्गिक साधन संपदा जपण्यासाठी.
 

Now a day, we are observing the environmental degradation everywhere. So for this we must follow the following steps,
🥁 Need of Environmental conservation
  • To solve the natural and artificial problems.
  • To maintain the balance in nature.
  • To conserve the natural resources.
  • To protect and conserve the biodiversity.
  • To maintain the clean, pollution free air, water and land.
  • To give quality of life and sustainable future to next generation.

             *”संवाद” सांगून जातात “ज्ञान” किती आहे..,*
             *”ठेच” सांगून जाते “लक्ष” कुठे आहे..,*
           *”डोळे” सांगून जातात “व्यक्ती” कशी आहे..,*
            *”स्पर्श” सांगून जातात “मनात” काय आहे..,*
              *आणि “वेळ” दाखवून देते “जग” कसे आहे…!!*

         🎷  *आपला दिवस आनंदी जावो.*