10 th, Sci.2, Disaster management 2, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन 2.
छान वैज्ञानिक माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे. जॉईन होण्यासाठी निळ्या लिंक ला स्पर्श करावा.
👇What’s app link 👇
👉 🔴माहिती विज्ञानाची 🎷 🔴
आपत्तीचे प्रकार
आपत्तीचे तीन प्रमुख प्रकार आहेत.
- भूभौतिक
- जैविक
- मानवनिर्मित.
- भूभौतिक आपत्ती
A) भूभौतिक आपत्तीचे दोन प्रकार पडतात
भूशास्त्रीय व भूगर्भीय
जमिनीच्या संदर्भातील आपत्ती आहेत. उदा. जलप्रलय, त्सुनामी, भूकंप क्षारीकरण ज्वालामुखी, धूप, प्रस्तरभंग विदारण, भूप्रपात, भूप्रक्षोभ, भूमिपात
B) हवामानशास्त्रीय, वातावरणीय, खगोलशास्त्रीय: उल्कापात, चक्रीवादळे, महापूर, गारपीट, दुष्काळ, उष्ण व शीतलाट, अवर्षण, हिमवादळे, सूर्यावरील डाग व त्याच्या संख्येतील बदल, बर्फवृष्टी इत्यादी.
2. जैविक आपत्ती
A) वनस्पतीजन्य: बुरशीजन्य रोग प्रसारण, जंगल वनवा, गाजर गवत, जलपर्णी, तृण गवत या प्रकाराला तणफैलाव असे म्हणतात.
B) प्राणीजन्य: टोळधाड, विषारी प्राण्यांचा दंश, हिंस्र पशुंचा हल्ला, कीटकाकडून पसरणारे आजार जसे मलेरिया, डेंग्यू, संसर्गजन्य रोगाच्या साथी जसे विषाणूजन्य कावीळ,सर्दी आणि जिवाणूजन्य कुष्ठरोग, कॉलरा, प्लेग हे प्राणीजन्य जैविक आपत्ती होत.
3. मानवनिर्मित
A) अनाकलनीय: अणुचाचण्या, अपघात, विषारी वायू गळती, फटाके कारखान्यातील स्फोट.
B) हेतुपुरस्सर: बॉम्बस्फोट, आग, सक्तीचे स्थलांतर, बालकामगार, दहशतवाद, युद्ध, बलात्कार इ.
🔥
Types of disasters:
There are three types of disasters 1. Geophysical
2. Biological and
3. Man made.
1. Geophysical:
A) Geological: flooding, earthquake, alkalization, volcano, erosion, Tsunami, landfall, landslides, etc. are geological disasters.
B) Climatic: Cyclones, snow- storms, hot and cold waves, snowfall, hailstorm, flood, meteorite, draught,etc are climatic disasters.
2. Biological:
A) Animal-origin: Insects, bite of venomous animals, infectious viruses rabies, hepatitis, AIDS, bacterial diseases such as Cholera, malaria, ur, etc.
B) Plant-origin: weeds such as aquatic, carrot grass, common grass, forest fire fungal disease spreading such as Blister.
3. Man made:
A) Accidental or Unintentional:
Atomic test, Accidents of vehicles Unplanned action, Toxic gases, etc.
B) Intentional:
Forced migration, bomb blast, fire, child labour, war, rapes, terrorism, etc.
🌊पुरांचे विध्वंसक परिणाम कोणते?
उत्तर:
- पुरामुळे बराचसा भूभाग हा पाण्याखाली जातो. कुजण्याची क्रिया जलद झाल्यामुळे रोगराई पसरते.
- शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान होते.
- जनावरे, गुरे ढोरे अशी जीवित हानी होते.
- पुराच्या पाण्यामुळे घरे जमीनदोस्त होतात, झाडे कोसळतात.
- खूप पूर आल्यावर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.
🌊 Which are the destructive effects of flood?
Ans: Following are the destructive effects of flood,
- Drinking water problem arises,
- Since everything is underwater the process of decomposition begins at a higher rate due to which epidemic diseases spreads fast.
- The fields get waterlogged/ muddy,
- The flood waters uproot the trees,
- The house is collapse due to flood water
- The water does not recede.
🫗कोरडा दुष्काळ पडल्यास काय परिणाम होतात?
- उत्तर:
- कोरडा दुष्काळ पडल्यास शेतातील पिके करपून जातात.
- कोरडा दुष्काळ पडल्यास तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. मनुष्य प्राणी स्थलांतर करून पाण्याची गरज भागवू शकतो, पण गुरेढोरे पाण्याअभावी मरतात.
🫗 Which are the effects of dry famine?
Ans:
Following are the effects of dry famine,
- The main effect in dry famine is there is scarcity of water,
- Due to shortage of water the cattle die,
- Too much migration of human beings takes place
- Lack of water leads to lack of irrigation, it leads to shortage of food.
🫨 भूकंपाचे विध्वंसक परिणाम कोणते?
उत्तर:
- तीव्र रिक्टर स्केलचा भूकंप झाल्यावर जमिनीच्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि वित्तहानी होते
- घरे कोसळतात
- पूल जमिनदोस्त होतात
- रस्ते उखडतात
- दळणवळण संपुष्टात येते
- 💡 वीज व पाणी पुरवठा खंडित होतो .
🫨 Which are the destructive effects of earthquake?
Ans:
- The earthquake is responsible for large scale ruination.
- Large scale damage to lives and property,
- The weak houses 🏘️ collapse,
- The roads are damaged,
- The electricity 🔌 and water 💦 supply is disrupted,
🔥 वनवा म्हणजे काय? त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो?
उत्तर:
- वनवा म्हणजे जंगलातल्या वाळलेल्या झाडांना, झुडपांना किंवा गवताला लागणारी भीषण आग होय.
- ज्या जंगलात वनवा पेटला आहे त्या ठिकाणच्या झाडांची राख होतात,
- त्या वनव्याच्या तीव्रतेमुळे बरेच प्राणी मरतात, यातून जैवविविधतेची मोठ्या प्रमाणावर हानी होते.
- जंगलामुळे हवा शुद्ध होते तर वनव्यामुळे धुरांचे लोट खूप मोठ्या प्रमाणावर तयार झाल्यामुळे हवा प्रदूषित होते.
🔥 What is forest fire? What is its effect on environment?
Ans:
- The uncontrolled largely spread fire of the dry grassland shrug land entry in the forest due to more temperature is called forest fire.
- Following are the effects on environment due to forest fire
- Biodiversity is lost,
- Great loss in plants and animals,
- Plants 🌳 turn into ash and atmosphere is full of smoke,
- Air pollution increases.
*आयुष्यात स्वतःशीच स्पर्धा करून
स्वतःला सर्वोत्तम बनवणं,
ही आयुष्यात मिळालेल्या
यशाची🎷 खरी व्याख्या आहे…..*
*आपला दिवस आनंदी जावो.🥁