10 th, Sci.2, Disaster management 4, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन 4.
What’s app link 👇
ग्रुप वर जॉईन का व्हावे? यांची कारणे….
आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.
अभ्यास हा दररोज करायचा असतो. परीक्षेची तयारी दोन-चार दिवसात करून ज्ञान वाढत नसते.
😰 प्रथमोपचार म्हणजे काय?
उत्तर:
- रुग्णालयात जायच्या आधी केलेला घरगुती प्राथमिक उपाय म्हणजे प्रथमोपचार.
- विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंतच्या कालावधीत दिला जाणारा उपचार म्हणजे प्रथमोपचार होय.
- एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला आपत्कालीन परिस्थिती एखाद्या तज्ञ नसलेल्या व्यक्तीद्वारे जो प्राथमिक उपचार दिला जातो त्यास प्रथमोपचार म्हणतात.
⛑️What is first aid?
Ans:
- Immediate aid given to someone who is ill or injured is called first aid.
- The primary immediate help given to a Sick or injured person until full medical treatment is available.
💁♂️आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपद्ग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?
उत्तर:
- जखमी व्यक्तीला आराम पडेल अशा अवस्थेत ठेवावे.
- कोणत्या प्रकारची इजा आहे त्याप्रमाणे प्रथमोपचार करावा.
- प्रथमोपचार हा लगेच करावयाचा असतो यात विलंब जीवावर बेतू शकतो.
⛑️ How can we offer first aid to victims of any disaster?Ans:
- put injured person in resting position in which sufferer is at ease.
- The most important is timely rescue which can help the victim to survive.
- First it given maybe different for different sufferer depending upon the nature of the disaster.
🩹 प्रथमोपचार पेटी साठी आवश्यक साहित्य
औषधे:
- अँटीसेप्टिक्स जसे डेटॉल, सॅव्हलाॅन, पेट्रोलियम जेली.
- साहित्य: ब्लेड, सुई, कात्री, छोटा चिमटा, सेफ्टीपिना
- पट्ट्या: वैद्यकीय कापूस, जखमा बांधण्यासाठी बँडेज पट्ट्या,
- आवरण: बँड -एडस, जाळीची पट्टी, त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस, चिकटपट्टी.
- रबरी हातमोजे, अँटीसेप्टिक साबण 🧼, सुके सुती कापडाचे तुकडे, टॉर्च 🔦.
🧤 The necessary material in first aid box:
- Medicines such as Dettol sevlon type antiseptics, petroleum jelly.
- Hand gloves , antiseptic soap, 🧼 clean and try cotton cloth pieces.
- Small pins, needle, safety pins, blade, scissors ✂️, torch 🔦.
- Triangular and circular bandage, medicated cotton, band aid, bandage strips of different size.
💯 स्वतःच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे मुद्दे:
- गर्दीची ठिकाणे टाळावित, गर्दीच्या ठिकाणी गोंधळ करू नये.
- रस्ता ओलांडत असताना डावीकडे व उजवीकडे पाहावे, रहदारीचे नियम पाळावेत.
- महत्वाचे दूरध्वनी क्रमांक पाठ असावेत किंवा डायरेक्ट लिहिलेले असावेत. मुलांची हेल्पलाइन 1028, रुग्णवाहिका 102, आपत्ती नियंत्रण कक्ष 108, पोलीस 100, अग्निशामक दल 101,चाइल्डलाइन 1098, बालविवाह निर्मूलन 1098 व 112.
- बेवारस वस्तू हात लावू नये.
- शाळेमध्ये, रेल्वे स्थानकात जिना उतरताना गर्दी न करता आणि एकमेकांना न ढकलतात उतरावे.
🛟 Important notes for our safety:
- Avoid crowded places, don’t mess around in crowded places.
- Looking first at left and then at right side while crossing the road. Always follow the traffic rules.
- Not to crowd and push each other while using staircase in school and in railway station.
- Important helplines should be remembered, note down in diary and used whenever need arises: Police station 100, Child helpline 1018, Ambulance 102, Disaster control unit 108, Fire fighting force 101, Abolition of child marriage- 1098 and 112.
- Do not touch any unclaimed object.
- Not to cause chaos at the crowded places.
- Not to spread rumours.
अभिरूप सरावाचे ध्येय स्पष्ट करा. Aim of mock drill.
- आपत्ती ओढावल्यावर आपण कसे वागतो याची कार्यक्षमता ओळखता येते.
- आपत्तीच्या परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे.
- आपत्ती नियंत्रणाच्या निरनिराळ्या विभागात असणारा समन्वय सुधारणे.
- आपत्ती आल्यावर दिलेला प्रतिसाद कसा आणि कितपत प्रभावी आहे याची योग्य मूल्यमापन करणे.
- आपत्ती आली असताना कराव्या लागतील अशा नियोजित कृतींची यशस्वीता तपासणे.
- आपत्ती व्यवस्थापन करताना संभाव्य त्रुटी आणि धोके ओळखणे.
Aim/objectives of mock drill.
- Checking the competency/ability of the planet action.
- Evaluating/judging the response of the common people to the disaster.
- Developing the ability to respond quickly to disaster.
- Improving the coordination between various departments that work for the disaster control.
- Identifying one’s own abilities at the time of disaster.
- Assessing/estimating the possible errors and risks.
*आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते.
त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते.*
*स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत,
तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.*
*आपला दिवस आनंदी जावो.🎷