10th, Science II, Introduction to Microbiology I.10 वी, विज्ञान II, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची I.

10th, Science II, Introduction to Microbiology I.10 वी, विज्ञान II, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची I. 

दररोज थोडे थोडे विज्ञान शिकण्यासाठी आमच्या What’s App ग्रुप ला जॉईन होण्यासाठी सस्नेह निमंत्रण 🙏🎷.

What’s App🔗

सूक्ष्मजीव म्हणजे काय?
व्याख्या: जे सजीव डोळ्यांना दिसत नाही व ज्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज भासते त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात.
उदा:रोटिफर्स, जिवाणू, कवक, प्रोटोझोआ,आर्किया इ.

What is microorganism?
Definition: A very small living unicellular organisms that we can only see with a special equipment called a microscope.
Ex: Bacteria, protists, fungi, archaea,

कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात?
  • आपल्या दररोजच्या जीवनात अनेक सूक्ष्मजीव आपणास उपयुक्त असता.
  • दुधाचे दह्यात रूपांतर करणारे लॅक्टोबॅसिलस जीवाणू,
  • के जीवनसत्वाची निर्मिती जीवाणूद्वारे होते,
  • प्रतिजैविके निर्माण करणारे जीवाणू व कवक,
  • प्रदूषितांवर जैवउपचार करणारे जीवाणू उदा. सुडोमोनास,
  • पावाचे पीठ बनवणारे यीस्ट,
  • इतर दुग्ध उत्पादने करणारे जीवाणू.
  • चीज, वाईन निर्मितीसाठी सूक्ष्मजीव उपयुक्त ठरतात.

which different microbes are useful to us? 

  • Lactobacillus bacteria are used for making curd from milk. 
  • Yeast used to ferment the better of bread.
  • For production of other milk product bacteria are used.
  • With the help of bacteria and fungi antibiotics are prepared.
  • Some bacteria are used for pollution control ex. Pseudomonas. 

सूक्ष्मजीवांचा वापर करून कोणकोणते पदार्थ बनवले जातात?
  • दुग्धजन्य पदार्थ, चीज बनवण्यासाठी तंतु कवके वापरतात, कोको, लोणी, केफिर, भाज्यांची लोणची मध्यार्क पाव प्रोबायोटिक पदार्थ प्रतिजैविके आणि इतर औषधे सूक्ष्मजीवांचा वापर करून तयार केले जातात सूक्ष्मजीवांचा वापर करून गुरांना द्यायचे अमोल तयार केले जाते.
  • कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी – अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते.
  • उसाच्या मळीचे सॅकरोमायसिस किण्वन करून इथॅनॉल हे एक स्वच्छ अल्कोहोल मिळवतात.
  • पेनिसिलीन हे प्रतिजैविक पेनिसिलियम या कवकापासून मिळतात.
  • रायझोबियम नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात.
  • स्क्रिप्टोकॉकस चा वापर करून इडली व डोसा आंबवतात.
  • सूक्ष्मजीवांचा वापर करून विकारांची निर्मिती करतात.

Which different products can be produced with the help of microbes?
  • Milk products,Lactic acid bacteria,used to make curd, Biofuels, Lactobacillus and Streptococcus fungi are used for cheese 🧀  production, Cocoa, pickles made from  vegetables, Streptococcus-used to make idli and dosa, wine and other behaverages, braid, probiotic substances and cattle feed are produced with the help of microorganisms. 
  • Amylase enzymes are produced with the help of microbes. 

औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू कोणते?
  • औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राच्या मदतीने विविध उत्पादने किण्वण प्रक्रियेने तयार केले जातात जसे पाव, दारू, लॅक्टोबॅसिलस आणि स्क्रिप्टोकोस किण्वा द्वारे चीज तयार करतात, अन्नघटक, विकरे, औषधे, त्याचबरोबर रासायनिक प्रक्रियेसाठी लागणारा कच्चामाल.
  • आजकाल सूक्ष्मजीवांचा वापर करून कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण केले जाते.

Write down the main features of industrial microbiology.

  •  Fermentation process, different products such as bread, wine, cheese, raw material for chemical reactions are produced using industrial microbiology. 
  • Garbage management and pollution control: solid waste management and pollution control can be done with the help of microorganisms. 

दुग्धजन्य उत्पादनांची मूलभूत प्रक्रिया कोणती?
  • दुधाचे पाश्चरीकरण केल्यामुळे दुधातील इतर सूक्ष्मजीव नष्ट होतात.
  • लॅक्टोबॅसिलस जिवाणू वापरून दुधाचे किण्वण करणे.
  • दुधातील लॅक्टोज शर्करेचे लॅक्टिक आम्लात रूपांतर करणे.
  • लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन/आळणे (coagulation).
  • स्वाद व सुगंध असणाऱ्या संयुगांची निर्मिती करणे उदा: लोण्याच्या सुगंधाचे डायअॅसेटिल 

Write down the basic process for production of milk products.
  • Pasteurization of milk initially to destroy other harmful bacteria. 
  • Later fermentation using Lactobacilli.
  • Lactose sugar present in the milk get converted into lactic acid. 
  • Lactic acid coagulates the milk proteins.
  • Compounds with taste and flavour are formed, such as the Diacetyle having buttery flavour. 

प्रोबायोटिक्स खाद्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
  • प्रोबायोटिक्स खाद्यपदार्थ हे मुख्यतः आपली रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
  • प्रोबायोटिक्स या प्रकारच्या खाद्यपदार्थात लॅक्टोबॅसिलस जिवाणू वापरलेले असतात. लॅक्टोबॅसिलस मुळे अन्नपदार्थ अधिक पोषणद्रव्यांनी समृद्ध होते.  
  • आपल्या अन्ननलिकेतील क्लॉस्ट्रिडियम या घातक जिवाणूंचा प्रोबायोटिक्स मुळे नाश होतो.
  • प्रोबायोटिक्स मुळे आपल्या आठवड्यातील जीवनसत्वे संश्लेषित करणाऱ्या जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.

What for biotic food is famous?

  • The disease resisting power is increased due to use of probiotic food material.
  • In probiotic food, the nutritional value of food increases, as lactobacilli bacteria added in it. 
  • The harmful bacteria clostridium which are present in our elementary canal are destroyed due to probiotic. 
  • Probiotics also increase the intestinal flora of bacteria that synthesize the vitamins inside the human intestine. 

*कोणालाही न दुखावता जगणे 
याच्याइतके सुंदर कर्म 
जगात दुसरे कोणतेच नाही…*
*आणि ज्याला हे कळले 
त्याला वेगळे कर्म करण्याची 
गरज राहत नाही...*🌻🎷