10th, Science II, Introduction to Microbiology II.10 वी, विज्ञान II, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची II.
आपल्या What’s App ग्रुप ला जॉईन होण्यासाठी सस्नेह निमंत्रण 🙏🎷.
What’s App🔗
😀👉 माहिती विज्ञानाची 🎷 🔦
योगर्ट उत्पादन:
- योगर्टचे औद्योगिक उत्पादन करण्याची कृती:
- लॅक्टोबॅसिलाय जिवाणूंच्या मदतीने म्हणजेच विरजण वापरून तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात.
- दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळणे —> दूध तापवणे –>कोमट करून —>स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी –> 1 : 1 प्रमाणातील मिश्रण मिसळणे —>
- स्ट्रेप्टोकॉकस —> लॅक्टिक आम्ल तयार करतात —-> प्रथिनांचे जेल (Gel) बनून दही घट्ट होते.
- लॅक्टोबॅसिलस —> ॲसेटालडीहाईड बनवतात —-> दह्याला विशिष्ट स्वाद.
- योगर्ट मध्ये फळांचे रस मिसळतात —-> विविध स्वादांचे निर्माण. उदा., बनाना योगर्ट स्ट्रॉबेरी योगर्ट, पायनॅपल योगर्ट.
- योगर्ट पाश्चरीकरण —-> जास्त टिकवता येते व त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढवतात.
Yoghurt production:
- Method of industrial production of yoghurt:
- Yoghurt is a milk product produced with the help of lactobacilli (inoculant).
- Condensed milk powder mixed with milk for more proteins —> milk is then boiled —> cooled a little.
- Streptococcus thermophilus and lactobacillus delbrueckii bacterial strain added to it in 1 : 1 proportion.
- Streptococcus —-> formation of lactic acid —-> makes the proteins to gel out —-> yoghurt becomes dense.
- Lactobacilli —-> formation of acetaldehyde like compounds —–> give characteristic taste to yoghurt.
- Yoghurt mixed with various fruit juices —-> import different flavours. Ex. Banana yoghurt, strawberry yoghurt.
- Pasteurization —-> increase shelf life of yoghurt and its probiotic properties.
🧈 लोणी
- लोण्याचे स्वीट क्रीम व कल्चर्ड असे दोन प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळवले जातात.
- कल्चर्ड प्रकारच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो.
👉 Butter
- Sweet cream and cultured are the two types of butter produced on large scale.
- Microbes are used for production of cultured variety.
🧀 चीजनिर्मिती
- गाईच्या दुधापासून चीज बनवले जाते. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्म जैविक परीक्षण केले जाते.
- दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस + लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस + रंग मिसळतात.
- दुधाला आंबटपणा येतो —-> दह्यातील पाणी (Whey) काढून टाकने —-> घट्ट करणे.
- पूर्वी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनेट विकर वापरला जात असे.
- हल्ली प्रोटीएज (protease) हा कवकांचा विकर वापरतात —-> शाकाहारी चीज बनते.
- दह्यातून Whey पूर्णपणे काढून टाकतात.
- दह्यातून पाणी (Whey) वेगळे काढले जाते —-> घट्ट दह्याचे तुकडे कापणे —-> धुणे —-> रगडणे इत्यादी, नंतर मीठ घालणे —-> त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव रंग, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते —-> नंतर दाबून चीज चे तुकडे केले जातात —-> व ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात.
Cheese 🧀 production
- Cheese is produced on large scale from cow milk in the entire world. First, chemical and microbiological tests of milk are performed.
- Lactobacillus lactis, Lactobacillus cremoris, and Streptococcus
- Thermophilus + some colours are mixed with milk.
- It imports soureness to the milk —-> whey (water in yoghurt) is removed to make milk dense.
- An enzyme, rennet obtained from alimentary canal of cattle was being traditional used earlier.
- For production of vegetarian cheese now, enzyme protease obtained from fungi is used.
- The whey is separated from yoghurt.
- Steps of process of cheese formation:
- Cutting the solid yogurt into pieces —> washing —> rubbing
—> salting —> mixing of essential microbes —> pigments —> flavours.
Than cheese is pressed —> cut into pieces —> stored for ripening.
🍕 पिझ्झा, बर्गर, सँडविच व इतर पश्चिमात्य खाद्यात चीजेचे वेगवेगळे प्रकार कोणते?
उत्तर:
- पिझ्झासाठी मोझेरेल्ला या प्रकारचे चीज वापरले जाते.
- बर्गर साठी चेडार चीज, स्विस व ब्ल्यू चीज वापरले जाते.
- सँडविच आणि इतर पश्चिमात्य खाद्यांत गोट चीज, हवर्ती, म्युनेस्टर, पारमेसान, प्रोवोलन, पेपर जॅक, अशा निरनिराळ्या चीज चा वापर केला जातो.
🍔 Which different types of cheese are used in western food like pizza, burger , sandwich, etc.
Ans:
- Mozzarella cheese is used for pizza.
- Cheddar, Swiss, Blue cheese are used for burgers.
- In Sandwich and other western food Goat cheese, Chevre, Feta, Emmental, Camembert, parmesan, Gouda, Cotija,Taleggio, Regginano, Monterrey, Manchego, Parmigiano these cheese are used.
🥪 वेगवेगळ्या प्रकारच्या चीज मध्ये काय फरक असतो?
चीज मधील फरक प्रकार खालील घटकावर अवलंबून असतो:
- चीजचे काही प्रकार अगदी क्रीम सारखे मऊ असतात तर काही चीज अतिशय कडक असतात.
- चीज कोणत्या प्रकारच्या दुधापासून बनवले आहे,
- आम्लता किती आहे,
- चीज मधील रंग,
- स्वाद देणारे रसायने,
- कॅल्शियम चे प्रमाण.
🫕 What is the difference between different types of cheese?
Ans:
The difference in type of cheese depends on the following factors:
- Some cheese are very soft like cream while some are very hard.
- Type of cheese depends upon the milk from which it is produced.
- The acidity of cheese,
- the colours,
- flavours
- calcium content
*ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की , आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे . तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो . धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा …. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो म्हणूनच म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर .🌻*🎷