10th, Science II, Introduction to Microbiology III.10 वी, विज्ञान II, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची III.
थेंबे थेंबे विज्ञानाचे तळे साचवण्यासाठी आपल्या व्हाट्स अॅप ग्रुप ला सामील होण्यासाठी सस्नेह निमंत्रण🙏
What’s App 🔗
🔊 प्रोबायोटिक्स:
व्याख्या: ज्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये क्रियाशील जिवाणू (लॅक्टोबॅसिलस
अॅसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरिअम बायफिडम इत्याद ) (काही पदार्थात किण्व/यीस्ट) असतात त्यास प्रोबायोटिक्स म्हणतात. पचनक्रियेला मदत करणे व मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखणे हे कार्य हे जिवाणू करतात. याच सोबत उपद्रवी सूक्ष्मजीवांना उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडीअम यांना नष्टही करतात.
प्रोबायोटिक्स उत्पादने:
प्रोबायोटिक्स उत्पादने योगर्ट, डार्क चॉकोलेट, केफिर, सोअर क्रुट (कोबीचे लोणचे), तेले, मिसो सूप, लोणची, कॉर्नसिरप, कृत्रिम स्वीटनर्स म्हणजेच गोडी आणणारे पदार्थ, सूक्ष्मशैवाले जसे स्पिरूलिना, क्लोरेल्ला व नीलहरित शैवालांचा समावेश असलेले समुद्री खाद्य अशा विविध प्रकारात उपलब्ध आहेत.
प्रोबायोटिक्सचे महत्व:
प्रोबायोटिक्स उत्पादने आपल्या अन्न मार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती तयार करतात.
इतर उपद्रवी सूक्ष्मजीव व त्यांच्या क्रियावर नियंत्रण ठेवतात.
प्रतीक्षमता वाढवतात.
चयापचय क्रियेत तयार झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात. प्रतिजैविकांमुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीव अकार्यक्षम होतात, त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटीक्स करतात.
अतिसाराच्या उपचारासाठी.
कोंबड्यांवरील उपचारांसाठी हल्ली
प्रोबायोटीक्सचा वापर होतो.
🧳 Probiotics
Probiotics are milk products but they contain active bacteria and yeast.
Examples of active bacteria are lactobacillus, acidophilus, lactobacillus casei, Bifidobacterium bifidum, etc.
These microbes help in maintaining the intestinal bacteria which help the digestion.
They also decrease the population of harmful bacteria such as Clostridium.
Probiotic products:
Probiotic products are available in various forms like yoghurt, dark chocolate, kefir, oils, sauerkraut means pickle of cabbage, miso soup, pickles, corn syrup, artificial sweeteners, microalgae such as Sea food like Spirulina, Chlorella, Blue green algae, etc.
Benefits of probiotics:
These products form the colonies of useful
microbes in alimentary canal.
Control other microbes and
their metabolic activities.
Improve resistance.
lower the ill-effects of harmful substances formed during metabolic activities.
Useful microbes become inactive due to antibiotics;
probiotics make useful microbes active again.
Nowadays, probiotics are used for treatment of diarrhoea.
Treatment of poultry.
पाव Bread 🍞:
धान्यांच्या पिठांपासून पावांचे विविध प्रकार बनवले जातात.
पिठामध्ये बेकर्सयीस्ट – सॅकरोमायसिस सेरेव्हिसी
(Saccharomyces cerevisiae), पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो.
यीस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बनडायॉक्साईड (CO2) व इथॅनॉलमध्ये होते.
CO2 मुळे पीठ फुगते व भाजल्यानंतर पाव जाळीदार होतो.
यीस्ट चे प्रकार: a) व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित (Compressed) यीस्टचा वापर होतो.व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या यीस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्त्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात.
b) घरगुती वापरासाठी कोरड्या,
दाणेदार स्वरूपात यीस्ट उपलब्ध असते.
पौष्टिकता: यीस्ट वापरून बनविलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक ठरतात. हल्ली लोकप्रिय झालेल्या चायनीज खाद्यपदार्थांत वापरले जाणारे व्हिनेगर, सोयासॉस व मोनोसोडिअम ग्लुटामेट
(अजिनोमोटो) हे तीन घटक सूक्ष्मजैविक किण्वनाने मिळवतात.
🥪 Bread
Different types of breads are produced from flour of cereals.
Dough is formed by mixing of baker’s yeast- Saccharomyces cerevisiae, water, salt and other necessary materials with flour.
Due to fermentation of carbohydrates by yeast, sugar is converted in
to carbon dioxide (CO2) and ethanol.
Dough rises up due to CO2 and the bread becomes
spongy.
Types of Yeast: Compressed yeast is used in commercial bakery industry. Yeast produced for commercial use contains various useful contents like carbohydrates, fats, proteins, various vitamins, and minerals.
For domestic use yeast is available in dry granular form .
Nutritive value: Bread and other products produced with the help of yeast become nutritive. Ingredients like vinegar, soya sauce and monosodium glutamate (ajinomoto) that are used in presently popular chinese food are produced by microbial fermentation.
👉 व्हिनेगर (Vinegar) उत्पादन
रासायनिक दृष्ट्या व्हिनेगर म्हणजे 4%
अॅसेटिक आम्ल (CH3COOH). व्हिनेगरचे उपयोग:
जगातील अनेक प्रदेशांमध्ये खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी.
लोणची, सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ टिकवण्यासाठी व्हिनेगरचा वापर होतो.
फळांचे रस, मेपल सिरप, साखर कारखान्यातील ऊसाची मळी, मुळांतील स्टार्च अशा कार्बनी
पदार्थांचे सॅकरोमायसिस सेरेव्हिसी ह्या कवकाच्या मदतीने किण्वन करून इथॅनॉल हे अल्कोहोल मिळवतात.
व्हिनेगर निर्मिती: इथॅनॉलमध्ये अॅसिटोबॅक्टर प्रजाती व ग्लुकॉनोबॅक्टर ह्या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्याचे सूक्ष्मजैविक अपघटन केले जाते. यामुळे अॅसेटिक आम्ल व इतर उपउत्पादने मिळतात. मिश्रणाचे विरलन करून त्यातून अॅसेटिक आम्ल वेगळे केले जाते. पोटॅशिअम
फेरोसायनाईड वापरून अॅसेटिक आम्लाचे विरंजन करतात. त्यानंतर पाश्चरीकरण होते.
शेवटी अत्यल्प प्रमाणात SO2
वायू मिसळून व्हिनेगर तयार होते.
सोया सॉस निर्मिति: गहू किंवा तांदळाचे पीठ व सोयाबीन यांच्या मिश्रणाचे अॅस्परजिलस ओरायझी
(Aspergillus oryzae) या कवकाच्या मदतीने किण्वन करून सोया सॉस बनवता.
Vinegar Production
Chemically, vinegar is 4% acetic acid (CH3COOH).
Uses of vinegar: Vinegar is used in each country of the world to impart sour taste to food materials.
For preservation of pickles, sauce, ketch-up, chutneys,
etc.
Preparation of ethanol: Ethanol, an alcohol is obtained by fermentation of carbon compounds like fruit juices, maple syrup, sugar molasses, starch of the roots; with the help of yeast Saccharomyces cerevisiae.
Mixture of bacterial strains like Acetobacter and Glucanobacter is mixed with ethanol for its microbial degradation. Acetic acid and other by-products are obtained through it. Acetic acid is
separated from mixture by rarefaction. Acetic acid is bleached with
the help of potassium ferrocynide. Then, it is pasteurized. Finally,
very small quantity of SO2
gas is mixed to produce vinegar.
Soya sauce is prepared by fermentation of the mixture of flour of wheat or rice and soyabean with the help of the fungus Aspergillus
oryzae.
दहावी भाषा विषय संदर्भात माहिती
दहावीच्या विषयातील कृतीवर आधारित प्रश्नांची समस्या आता दूर झाली आहे. आता पेन, पेन्सिलने आकृती काढली तरीही गुण मिळणार आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने लेखी परीक्षेला एक मे 2024 पासून सुरुवात होत आहे.
मराठी हिंदी अथवा इंग्रजी या भाषा विषयांमध्ये परिच्छेदावर आधारित आकलन कृती, आकृत्या या पेन्सिलने काढल्यावर गुण दिले जात नव्हते. यात आता यंदापासून बदल करण्यात आला आहे. पेन अथवा पेन्सिलने आकृती काढल्यावरही गुण दिले जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
मराठी भाषा विषयाच्या पेपरमध्ये प्रश्न एक मध्ये बारा गुणासाठी डायग्राम व दुसऱ्या प्रश्नात चार गुणांसाठी असे प्रश्न विचारले जातात. या प्रकारामुळे आकृती पेनाने काढावी की पेन्सिलने या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य शिक्षण मंडळात मराठी विषयाकरता मॉडरेटर यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होणे अशी मागणी केली होती. यावर यंदापासून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. त्याबाबत सर्व भाषा विषयांच्या नियमक सभेत सर्व नियामकांना सूचना देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी पेन किंवा पेन्सिलने आकलन कृती, आकृती काढल्यास उत्तर बरोबर असल्यास पूर्ण गुण द्यावेत. केवळ पेन्सिलने आकृती काढली म्हणून अर्धा गुण कापू नये अशा सूचना देण्यात येतील असे मंडळाने कळवले आहे.
*बुद्धिमत्ता ही तुमच्या बुद्धीतून निघणाऱ्या नवनवीन विचारांवरून ठरवली जाते.*
*आणि नितीमत्ता ही तुमच्या वैचारिक पातळी वरून ठरवली जाते…*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷🦋