10th, Science II, Introduction to Microbiology IV.10 वी, विज्ञान II, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची IV.
आपल्या What’s App समूहामध्ये सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची 🎷 या निळ्या लिंक ला स्पर्श करावा.
What’s App 🔗
👉 माहिती विज्ञानाची 🎷 🦋👈
पेयनिर्मिती (Production of beverages)
- कॅफिया अरॅबिका फळावर लॅक्टोबॅसीलस ब्रुईस या सूक्ष्मजीवाद्वारे प्रक्रिया करून, फळातून बिया वेगळ्या करून कॉफी हे पेय तयार केले जाते.
- थिओब्रोमा कॅको या फळावर कॅन्डीडा, हॅन्सेन्युला, पिचिया, सॅकरोमायसिस या सूक्ष्मजीवांची क्रिया करून फळातून बिया वेगळ्या करून, कोको पेय मिळवले जाते.
- द्राक्षे फळावर सॅकरोमायसिस सेरेव्हिसी सूक्ष्मजीवांची क्रिया करून, रसाचे किण्वन केल्यावर वाईन पेय मिळते.
- सफरचंद फळावर सॅकरोमायसिस सेरेव्हिसी या सूक्ष्मजीवांची क्रिया करून, रसाचे किण्वन केल्यावर सिडार पेय मिळते.
Production of beverages:
- Coffee is a beverage made by processing the Caffea Arabica fruit with the microorganism Lactobacillus brevis, separating the seeds from the fruit.
- By the action of Candida, Hansenula, Pichia, Saccharomyces on Theobroma cacao fruit, by separating the seeds from the fruit, the cocoa drink is obtained.
- A wine drink is obtained after the fermentation of the juice by the action of the microorganism Saccharomyces cerevisiae on the grape fruit.
- The cider drink is obtained after fermentation of the juice by the action of the microorganism Saccharomyces cerevisiae on the apple fruit.
मानवी पचनसंस्थेत स्त्रवणारे विकर कोणते काम करतात?
उत्तर:
- मानवी पचन संस्थेतील विकाराचे कार्य पुढील प्रमाणे:
- विकरांच्या मार्फत निरनिराळ्या अन्न घटकांचे पचन होते.
- विकरामुळे जटिल पदार्थांचे अवशेषणासाठी सुलभ अशा घटकात रूपांतर होते.
Which functions are perform by enzyme secreted in human digestive system?
Ans:
Function of enzymes are as follows:
- Enzymes help in the digestion of the food.
- The complex food components are broken down to simple absorvbable substances.
अन्ननलिकेत कोणते विकर कोणत्या अवयवाद्वारे स्त्रवले जाते.
उत्तर:
- जठर – पेप्सीन, रेनिन
- स्वादुपिंड- स्वादुरसातील भमायलेच ट्रीपसिन लायपेज.
- लहान आतडे- पेप्टिडेज व इतर विकरे.
Which intestinal part secretes which enzymes?
Ans:
- Stomach- pepsin and renin.
- Pancreas- amylase, trypsin and lipase.
- Intestine- Peptidases and other enzymes
रासायनिक उत्प्रेरकांच्या तुलनेत सूक्ष्म जैविक विकारांचे फायदे स्पष्ट करा.
उत्तर:
- तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकरे कार्य करतात.
- ऊर्जा बचत होते.
- महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही.
- विकरे विशिष्ट क्रियाच घडवून आणतात, अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत.
- शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो.
- सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते.
- विकरांचा पुनर्वापरही करता येतो.
- सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही आहेत.
👉 सूक्ष्मजैविक विकरांची काही उदाहरणे दया.
- ऑक्सिडोरिडक्टेजीस (Oxidoreductases)
- ट्रान्स्फरेजीस (Transferases) हायड्रोलेजीस (Hydrolases)
- लाएजेस (Lyases),
- आयसोमरेजीस (Isomerases)
- लायगेजीस (Ligases) ही सूक्ष्मजैविक विकरांची उदाहरणे आहेत.
🦚 How microbial enzymes are better than the chemical catalyst?
Ans:
- Microbial enzymes are active at low temperature, pH and pressure.
- Energy is saved.
- Erosion-proof instruments are not necessary.
- Enzymes carry out specific processes; hence unnecessary byproducts are not formed.
- Expenses on purification are minimised.
- In case of microbial enzymatic reactions, elimination and decomposition of waste material is avoided.
- Enzymes can be reused. Hence, microbial enzymes are eco- friendly.
🎷 Write examples of microbial enzymes.
Ans
- Oxidoreductases
- Transferases
- Hydrolases
- lyases
- Isomerases
- ligases, etc. are examples of microbial enzymes.
सूक्ष्मजैविक विकरे वापरले जाणारे उद्योग कोणते?
उत्तर:
- डिटर्जंट्स: डिटर्जंट्स मध्ये विकरे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते.
- माध्यम: मक्यातील स्टार्चवर बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिस पासून मिळवलेल्या विकराची क्रिया घडवून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप (तयार सरबताचे माध्यम) बनवतात.
- चीज, वनस्पतींचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद, अशा अनेक उद्योगांत सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात.
🧐 Write examples of industries that use microbial enzymes.
- Detergents: Process of dirt / muck removal occurs at low temperature too due to mixing of enzymes with detergents.
- Syrup medium: Glucose and fructose syrup can be obtained from corn flour by action of enzymes obtained from bacilli and streptomyces.
- Microbial enzymes are used in various industries like cheese, plant extracts, textile, leather, paper, etc.
झॅन्थॅन डिंक:
- निर्मिती: स्टार्च व मळीचे झॅन्थोमोनास प्रजातींकडून किण्वन घडवून हा डिंक बनवतात.
- वैशिष्ट्य: गरम व थंड पाण्यात विरघळणे, उच्च घनता या वैशिष्ट्यांमुळे त्याचे अनेक उपयोग आहेत.
- रंग, खत, तणनाशके, वस्त्रांचे रंग, टूथपेस्ट, उच्च प्रतीचा कागद बनविण्यासाठी त्याचा वापर होतो.
Xanthan gum:
- Production: Xanthan gum is obtained by fermentation of starch and molasses with the help of Xanthomonas species.
- property : This gum is useful due to properties like solubility in hot and cold water, high density, etc.
- Xanthan gum is used for production of pigments , fertilizers, weedicides, textile pigments, tooth pastes, high quality paper, etc.
जैव कीटकनाशके (Bio insecticides)
- व्याख्या: जीवाणू व कवक यांपासून मिळवलेल्या कीटकनाशकांना जैविक कीटकनाशके म्हणतात.
- जैवतंत्रज्ञान: जैविक कीटकनाशकात पिकांवरील कीड, कीटक, रोगजंतूंचा नाश करणारी द्रव्ये, जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्झिन्स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतींमध्येच अंतर्भूत केली जातात.
- अशा वनस्पती विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत. जीवाणूंप्रमाणेच कवके व विषाणूंच्या काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशके म्हणून होतो.
- उदा: किण्वन प्रक्रियेत मिळणारे उप-उत्पादन स्पायनोसॅड हे जैव कीटकनाशक आहे.
Bioinsecticides
- Biotechnology: Bacterial and fungal toxins which can destroy pests and pathogens can be directly integrated into plants with the help of biotechnology.
- These plants are being toxic to insects, they do not consume the plants.
- Similar the bacteria, some species of fungi and viruses are useful as pesticides.
- Ex. Spinosad, a byproduct of fermentation is a biopesticide.
*”नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायरासारखा असतो .*
*त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही…*
*🚩 मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!🚩*