10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.5, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.5.


आपल्या माहिती विज्ञानाची या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा 🙏.👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

👉 माहिती विज्ञानाची 🎷


🎷 अनेकदा तुमचे तोंड येते. त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाहीत.

उत्तर: अनेकदा आपले तोंड आल्यावर आपण तिखट पदार्थ खाऊ शकत नाहीत. अशा वेळेस आपल्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे नसतात.

ही समस्या सहसा जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे दिसून येते. अशा वेळेस आपण गरम, मसालेदार खाद्यपदार्थ खात असताना अडचणीत येतोत.


⛱️ Many times you cannot eat hot food due to inflammation/ ulceration in mouth. 

Ans: If enough vitamins are not taken in the diet then inflammation or ulceration in the mouth takes place.

If vitamin B complex is not taken properly then such a situation happened. In such situations hot and spicy food causes uncomfortable feeling.


🔦 काही जणांना बाल्यावस्था किंवा तारुण्यवस्थेमध्येच रात्रीचे दिसण्यास त्रास होतो.

उत्तर: 

काही जणांना बाल्यावस्था किंवा तारुण्यवस्थेमध्येच रात्रीचे दिसण्यास त्रास होतो कारण

अशा व्यक्तींच्या आहारात अ जीवनसत्त्वांची कमतरता आढळून येते.

योग्य दृष्टीसाठी अ जीवनसत्व उपयुक्त असते.

स्तोत: अशा व्यक्तींनी आहारात अ जीवनसत्व युक्त खाद्यपदार्थांचे सेवन करावे. पिवळ्या व नारंगी रंगांची फळे, दूध, गाजर, हिरव्या पालेभाज्या, रताळे, पपई, आंबा, एप्रिकॉट, दही सोयाबीन, इत्यादी.


🔥 Some persons experience difficulty in night vision since their childhood or adolescence.

Ans: 

Some persons experience difficulty in night vision since their childhood or adolescence because,

In the diet of some persons they reach deficiency of vitamin A.

Vitamin A is essential for better reason.

source: So person can take source of vitamin A such as milk, curd, soybean,papaya, apricots. sweet potato, spinach, carrots, mango, leafy vegetables, yellow and orange fruits, etc.


⚡ जीवनसत्त्वे:

  • जीवनसत्त्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक कार्बनी पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते.
  • जीवनसत्वांचे मुख्य सहा प्रकार आहेत, A, B, C,D, E, आणि K. 
  • यांपैकी A, D, E, आणि K मेद (स्निग्ध) विद्राव्य आहेत.
  • जीवनसत्व B व C जल विद्राव्य आहेत.


🍹 Vitamins:

  • Vitamins are a group of heterogeneous carbon compounds of which, each is essential for proper operation of various processes in the body.
  •  There are main six types of vitamins, A, B, C, D, E and K.
  •  A, D, E and K are fat-soluble Vitamins.
  • Vitamins B complex and C are water-soluble.


💧पाणी एक पोषद्रव्यच:

  • आपल्या शरीरात साधारणतः 65 ते 70% पाणी असते.
  • प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असते.
  • रक्तामध्येसुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असते. 
  • शरीरामध्ये थोडेजरी पाणी कमी झाले तर पेशींचे आणि पर्यायाने शरीराचेच कामकाज बिघडते. म्हणून पाणीसुद्धा एक अत्यावश्यक पोषकद्रव्य आहे.


💪 Water is an essential nutrient:

  • There is about 65 – 70% water in our body.
  • Each cell contains 70% water weight by weight.
  • Blood-plasma also contains 90% of water.
  • Functioning of cells and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. 
  • Hence, water is an essential nutrient.


🧵  तंतुमय पदार्थ:

  • तंतुमय पदार्थ अत्यंत महत्त्वाचे पोषकद्रव्य आहेत. तंतुमय पदार्थ मानव पचवू
  • शकत नाही. पण त्यांची इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये आणि नपचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये खूप मदत होते.
  • पालेभाज्या, फळे, धान्ये यांपासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात.


🥬 Fibers

  • Fibers are also essential nutrients. 
  • Though, we can not digest the fibers. However, they help in the digestion of other substances and egestion of undigested substances. 
  • We obtain the fibers from leafy vegetables, fruits, cereals, etc.


  • एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर एटीपी चे एकूण 38 रेणू मिळतात.
  • After complete oxidation of a glucose molecules, 38 number of ATP molecules are formed.
  •  ग्लायकोलायसिसच्या शेवटी पायरुविक चे रेणू मिळतात.
  • At the end of glycolysis, pyruvate molecules are obtained.
  • आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी विनॉक्सी प्रकारचे श्वसन करतात.
  • Our muscle cells perform anaerobic type of respiration during exercise.


  *🌹 जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!🌹*

  *तुम्ही आपली तुलना कोणाशीही करू नका…*

         *तुम्ही जसे आहात तसाच स्वतःवर विश्वास ठेवा.*

         *देवाची रचना कधीही चुकीची असू शकत नाही…*

 *आपला दिवस आनंदी जावो.*🎷