10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.7, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.7.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.7, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.7.


आपल्या What’s App समूहात सामील होण्यासाठी खाली दिलेल्या स्पर्श करा 👇

👉माहिती विज्ञानाची 🎷

🧬गुणसूत्राचा आकार कसा असतो? आकृती काढून त्या भागांची नावे लिहा.
उत्तर: 

  • प्रत्येक गुणसूत्रांमध्ये दंडाकृती आकाराचे DNA असते. 
  • गुणसूत्रे ही प्राथमिक संकोचन व गुणसूत्रबिंदू यांनी बनलेली असतात. त्यामुळे गुणसूत्रांचे दोन भाग पडतात. प्रत्येक भागास “गुणसूत्रभुजा”असे म्हणतात.
  • इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी च्या साह्याने पेशी विभाजनाच्या वेळेसच गुणसूत्रे आपणास पाहता येतात.
  • गुणसूत्रांची लांबी व सेंट्रोमेअर च्या स्थितीवरून त्यांचे चार प्रकार पडतात 
  1. मेटासेंट्रिक, 
  2. सबमेटासेन्ट्रिक, 
  3. एक्रोसेंट्रिक आणि 
  4. टेलोसेन्ट्रिक .


🎇 What is the shape of a chromosome? Draw a figure and give its name.

Ans: 
• Chromosomes are rod-shaped structures. 
• Under an electron microscope we can see chromosomes only at the time of cell division.
• Humans have linear chromosomes.
• Depending upon the position of the centromere, there are four types of chromosomes.
1. Metacentric 
2. submetacentric
3. Acrocentric 
4. Telocentric

🧬 सूत्री पेशीविभाजन Mitosis
कायपेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजन प्रक्रियेने विभाजित होतात. 
• सूत्री पेशीविभाजन हि प्रक्रिया मुख्य दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ते दोन टप्पे म्हणजे
•  प्रकलविभाजन /केंद्रकाचे विभाजन (Karyokinesis) आणि 
• परीकलविभाजन/ जीवद्रव्याचे विभाजन (Cytokinesis).
प्रकलविभाजन चार पायऱ्यांमध्ये पूर्ण होते.
1. पूर्वावस्था
2. मध्यावस्था
3. पश्चावस्था
4. अंत्यावस्था.


🦕 Mitosis:

  • Somatic cells and stem cells divide by mitosis.
  • Mitosis is completed through two main steps. Those two steps are karyokinesis (nuclear division) and 
  • cytokinesis (cytoplasmic division). 
  • Karyokinesis is completed through four steps.
  1. Prophase
  2. Metaphase
  3. Anaphase 
  4. Telophase


🌺 पूर्वावस्था (Prophase) : 

  • प्रकल विभाजनाच्या (म्हणजेच केंद्रकाचे विभाजन) पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन (Folding / Condensation) होते. 
  •  वलीभवनामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित (Sister chromatids) दृश्य व्हायला सुरुवात होते.
  •  तारा केंद्र (centriole) द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. 
  • केंद्राकावरण (nuclear membrane) आणि केंद्रिका (nucleolus) नाहीसे व्हायला सुरुवात होते.


💐 Prophase
  • In prophase, condensation of thin thread-like chromosomes start.
  •  Due to condensation, they become short and thick and they start to appear along with their pairs of sister chromatids.
  • Centrioles duplicate and each centriole moves to opposite poles of the cells.
  •  The nuclear membrane and nucleolus start to disappear.


🎊   मध्यावस्था:

  • मध्यावस्थेमध्ये केंद्राकावरण पूर्णपणे नाहीसे होते. 
  • सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित (Sister chromatids) स्पष्टपणे दिसतात.
  • सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला (मध्य प्रतलाला) समांतर अवस्थेत संरचित (Arrange) होतात.
  •  दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू (Centromere) यादरम्यान विशिष्ट अशा लवचीक प्रथिनांचे धागे (Spindle fibres/तुर्कतंतू ) तयार होतात.


🎈 Metaphase :
  •  Nuclear membrane completely disappears in metaphase.
  • Chromosomes complete their condensation and become visible along with their sister chromatids. 
  • All chromosomes are arranged parallel to the equatorial plane (central plane) of the cell. 
  • Special type of flexible protein fibers (spindle fibers) are formed between the centromere of each chromosome and both centrioles. 


  • 💀 पश्चावस्था (Anaphase) :
  • पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते.
  •  वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्यगुणसूत्रे (Daughter chromosomes) म्हणतात.
  •   ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. 
  •  गुणसूत्रांचे दोन-दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात.


🎷 Anaphase :
  •  In anaphase, centromeres split, and there by sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite directions with the help of spindle fibers. 
  • Separated sister chromatids are called as daughter chromosomes.
  • Chromosomes being pulled appear like bunch of bananas.
  • Each set of chromosomes reach at two opposite poles of the cell.

  • 🎻 अंत्यावस्था (Telophase): अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात (Unfolding/ Decondensation). त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात.
  •  दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचांभोवती केंद्रकावरण तयार होते.
  •  एका पेशीमध्ये दोन जन्यकेंद्रके (Daughter nuclei) तयार होतात. 
  • जन्यकेंद्रकांमध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात.
  • तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात.



🔦 Telophase

  • The chromosomes that have reached opposite poles of the cell now start to decondense due to which they again become thread-like thin and invisible.
  •  A nuclear membrane is formed around each set of chromosomes reached at the poles.
  •  Two daughter nuclei are formed in a cell. 
  • A nucleolus also appears in each daughter nucleus. 
  • Spindle fibers completely disappear. 

*कौतुक आणि टिका 
या दोन्हीचाही स्विकार करा ,, कारण झाडाच्या वाढीसाठी 
ऊन आणि पाऊस 
या दोन्हीचीही गरज असते !!!*
   तुमचा दिवस आनंदात जावो,🦢🎷