9th, Science Part 2, 18th Chap. अवकाश निरीक्षण: दुर्बिणी 1.

 

9th, Science Part 2, 18th Chap.  18 वा पाठ,अवकाश निरीक्षण: दुर्बिणी 1.

आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी पुढील निळ्या लिंक ला स्पर्श करा👇

👓 चश्मा तयार करणाऱ्या हान्स लिपर्शे या संशोधकाने 1608 मध्ये पहिली दुर्बीण तयार केली. हान्स लिपर्शे यांनी दोन भिंगे एकमेकांसमोर धरून पाहिल्यास दुरची वस्तू जवळ दिसते याचा शोध लावला.

🔭 गॅलिलिओने 1609 मध्ये  दुर्बीण तयार करून दुर्बिणीचा उपयोग अवकाशाच्या अभ्यासासाठी केला.

 🌖 गॅलिलिओने दुर्बिणीच्या मदतीने  गुरूचे 4 उपग्रह व सूर्यावरील डाग इत्यादींचे शोध लावले.

🌌 आकाश व अवकाश यांमध्येकाय फरक आहे?
उत्तर: 
  • आकाश आणि अवकाश या वेगवेगळ्या संज्ञा आहेत.
  • आकाश म्हणजे पृथ्वीवरील जमीन आणि अंतराळ यांच्यामधील जागा (वातावरन).
  • अवकाश म्हणजे अमर्याद अंतराळ, विश्व किंवा ब्रह्मांड. विश्व हे कुठे संपते तेच आपल्याला अजून नेमके माहित नाही. 
  • आकाश हे आपल्या उघड्या डोळ्यांना सहज दिसते.
  • अवकाश पाहण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या दुर्बिणीची गरज लागते. 
  • आकाशात ऑक्सिजन उपलब्ध आहे त्यामुळे आकाशात पक्षांचा मुक्त संचार असतो. अवकाशात ऑक्सिजन नाही त्यामुळे सजीवांना ऑक्सिजन सिलेंडर सह तेथे जावे लागते.
  • आकाशात हवा (नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड), ढग, ओझोन (O3) वायुचा थर या सर्व घटकांचा समावेश होतो. अवकाशात चंद्र, सूर्य, तारे ,ग्रह ,आकाशगंगा, धूमकेतू, खगोलीय वस्तू, लघुग्रह यांचा समावेश होतो.  
  • आकाशाचे मोजमाप केले जाऊ शकते. 
  • अवकाश हे अनंत/अगणित/अथांग/अमर्याद आहे, त्यामुळे अवकाश हे मोजण्या पलीकडचे आहे.
  •  आकाशात  गुरुत्वाकर्षण आहे.
  •  अवकाशात काही ठराविक ग्रहांना सोडले तर उरलेल्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाही.  

👀 अवकाश निरीक्षण म्हणजे काय? त्याचे काय महत्त्व आहे?
उत्तर:
  • व्याख्या: दूरचे ग्रह, चंद्र, धूमकेतू, आकाशगंगा आणि इतर खगोलीय वस्तूंच्या निरीक्षणाला अवकाश निरीक्षण असे म्हणतात. 
  • आकाश निरीक्षणाचे महत्त्व
  • अवकाशातील तार्‍यांची, नक्षत्रांची स्थिती यानुसार ऋतुचक्रांचा अभ्यास आपणास उपयुक्त ठरतो.
  • नक्षत्रांची स्थिती दर्यावर्दींना दिशादर्शक म्हणून उपयुक्त पडते. 
  • अवकाश निरीक्षणातून आपली विश्वाबद्दलची समज वाढते. 
  • ग्रहाचे ज्ञान सुधारण्यासाठी, तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी, दळणवळण प्रणाली सक्षम करण्यासाठी आणि जिज्ञासा आणि नाविन्य प्रेरणा देण्यासाठी अवकाश निरीक्षण महत्त्वपूर्ण आहे.

🥁 प्रकाश:
  • प्रकाश म्हणजे विदयुत चुंबकीय प्रारणे. तरंगलांबी (Wavelength) हा प्रकाशाचा एक महत्वपूर्ण गुणधर्म आहे. 
  • ज्या प्रकाशाची तरंगलांबी जवळपास 400 nm ते 800 nm मध्ये आहे, तोच प्रकाश आपला डोळा ‘पाहू’ शकतो. या प्रकाशाला आपण दृश्य प्रकाश तरंग म्हणतो. 
  • दृश्य प्रकाश तरंगलांबी व्यतिरिक्त तरंगलांबी असलेला प्रकाशही आहे, जे आपण पाहू शकत नाही. कारण आपले डोळे त्या किरणांसाठी संवेदनशील नाहीत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🔦 दृश्य प्रकाश दुर्बिणींना वक्रीभवक
दुर्बीण (Refracting Telescope) का म्हणतात?
उत्तर: प्रकाशकिरणे वातावरणातून भिंगात किंवा भिंगातून वातावरणात जाताना आपला मार्ग बदलतात म्हणजेच त्यांचे वक्रीभवन होते. म्हणून दृश्य प्रकाश  दुर्बिणींना वक्रीभवक
दुर्बीण (Refracting Telescope) म्हणतात.

🥁 दृश्य प्रकाश दुर्बिणी (Optical Telescopes): 

बऱ्याचशा दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये दोन

किंवा अधिक भिंगाचा वापर केले जातो. दृश्य प्रकाश दुर्बिणी मध्ये खगोलीय वस्तूंपासून येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकवटला जावा म्हणून पदार्थीय भिंग मोठया आकाराचे असते. या एकवटलेल्या प्रकाशापासून खगोलीय वस्तूची विशाल प्रतिमा तयार करणारे भिंग, म्हणजेच नेत्रिका भिंग लहान आकाराचे असते.

🦋 दृश्य प्रकाश दुर्बिणींच्या वापरातील अडचणी कोणत्या?
उत्तर:
1. स्रोताकडून येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकत्र करून स्रोताची तेजस्वी प्रतिमा मिळवायची असेल तर पदार्थीय भिंगाचा
 व्यास जास्तीत जास्त मोठा असणे आवश्यक असते. परंतु अशी मोठी भिंगे तयार करणे अवघड तर असतेच शिवाय त्यांचे वजनही खूप वाढते व त्यांचा आकार बदलतो.
2. दुर्बिणीची दोन भिंगे दोन विरुद्ध टोकाला असल्याने भिंगाचा आकार वाढतो, त्याचबरोबर दुर्बिणीची लांबीही वाढते.
3. भिंगांद्वारे तयार झालेल्या प्रतिमामध्ये रंगांच्या त्रुटी असतात.

🎻 परावर्तक-दुर्बिणी:
  • दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अंतर्वक्र आरशापासून दुर्बिणी बनवण्यात येतात. यामध्ये प्रकाशाचे अंतर्वक्र आरशाद्वारे परावर्तन (Reflection) होत असल्याने या दुर्बिणींना ‘परावर्तक-दुर्बिणी’ (Reflecting Telescope) म्हणतात.
  • परावर्तक-दुर्बिणीमध्ये, वस्तूची तेजस्वी प्रतिमा मिळवण्यासाठी मोठे आरसे अत्यावश्यक असतात.
  •  मोठे आरसे बनवणे तुलनेने सोपे असते. अनेक तुकडे जोडूनही मोठे आरसे बनवता येतात. मोठ्या आरशांचे वजनही तेवढ्याच आकाराच्या भिंगांपेक्षा कमी असते. 
  • आरशांद्वारे तयार झालेल्या प्रतिमेत रंगाची त्रुटी नसते. 
  • उपयोग: साध्या डोळ्यांनी कधीच पाहू शकणार नाही असे अतिदूर असलेले तारे (Stars) आणि दीर्घिका (Galaxies) आपण प्रचंड परावर्तक-दुर्बिणीद्वारे  पाहू शकतो.

⛱️ राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण पंचकोष बद्दल माहिती… 🎷:


पाच स्तरांचे किंवा थरांनी युक्त आपले शरीर तयार झाले आहे. कांद्यात ज्या प्रमाणे एकावर एक पापुद्रे असतात तसेच आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे. या आवरणामुळेच आपल्या अंतरात्म्याचा प्रकाश आपल्याला दिसत नाही. वास्तविक “आत्म” स्वरूपाची जाणीव यामुळेच आपल्याला होत नाही.
1. अन्नमय कोश
2. प्राणमय कोश 
3. मनोमय कोश 
4. विज्ञान कोश आणि
5. आनंदमय कोश असे पाच कोश आहेत.
1. अन्नमय कोश: आपले शरीर अन्नमय कोशावर चालू आहे. यामध्ये आपल्या भौतिक शरीराचा समावेश होतो. आपले संपूर्ण शरीर हे अन्नमय कोशापासून तयार झालेले आहे. आपल्या नुसत्या डोळ्यांना जे दिसते ते सर्व अन्नमय कोशापासून तयार झालेला भाग आहे. आपल्या आत्म्याने वापरलेले भौतिक आवरण म्हणजे अन्नमय कोशापासून तयार झालेली शरीर.
2. प्राणमय कोश:
 देव, ऋषीमुनी यांच्या शरीरा भोवती जे तेजोवलय दाखवले जाते ते म्हणजे प्राणमय कोश. प्राणायामाचा योग्य वापर करून चेहऱ्यावरील आत्मिक तेज, आपल्या प्रतिभेत झालेली वृद्धी साध्य करता येते.
3. मनोमय कोश: यामध्ये सूक्ष्म शरीराचा समावेश होतो. चेतन, अचेतन आणि उच्च चेतन त्याचसोबत मन, बुद्धी, चित्त यांच्या समावेश मनोमय कोशात होतो. मन हे कल्पना करते. आपण जी कल्पना केली ते बुद्धी द्वारे विवेचन करता येते व निर्णयापर्यंत घेऊन जाता येते. चित्त मध्ये अभ्यासावर आधारित संस्कार तयार होतात.
4. विज्ञानमय कोश:
विज्ञानमय कोश यात मानसिक शरीराचा समावेश होतो. विज्ञानमय कोश समजून घेणे तसे कठीण ठरते. केवळ साधू, यती लोकच या स्तरापर्यंत जाऊ शकतात. या कोशापर्यंत पोहोचल्यावर सहज ज्ञान प्राप्त करता येते. एखाद्या गोष्टीचे वास्तविक ज्ञान याच कोशात होते. भ्रम, मोह, शक्ती यातून बाहेर पडण्यासाठी या कोशा चा विकास करावा लागतो. योग क्रियेचा अभ्यास करून विज्ञानमय कोशा पर्यंत पोहोचता येते. या कोशाचा विकास झाल्यावर व्यक्तीला वर्तमान, भूत, भविष्य सहज समजायला लागते.
5. आनंदमय कोश:
या कोशाचा विकास झाल्यावर बाह्य जगाशी संपर्क तोडता येऊ शकतो. आत्मा हा मुक्त आहे हे समजते. स्वतःची ध्यान साधना वाढवून समाधी पर्यंत ज्यास जाता येते त्यासच आनंदमय कोशात प्रवेश करता येतो.
कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नसते. प्रयत्न करणे, नियमितता, सराव यातून असाध्य ही साध्य करता येते. या सर्व कोशावर जर वर्चस्व मिळवायचे असेल तर नियमित अभ्यासाची गरज भासते. गुरुच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी सहज साध्य करता येतात.
🙏 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी पंचकोश विकास हा जर यशस्वी झाला तर.. भारत देश बौद्धिक महासत्ता नक्कीच बनेल.

✍️ *माणसाची ओळख दोन* *प्रकारची असते. एक त्याची* *आर्थिक व शैक्षणिक बाजू व* *दुसरी असते ती त्याची* *माणुसकी आणि प्रामाणिकपणा,* *पहिली* *ओळख माणूस असेपर्यंत राहते.* 
 *दुसरी मात्र माणूस गेल्यानंतरही* *कोणीही विसरत* *नाही. तरीही जिथे* *शिक्षण, प्रामाणिकपणा,* *माणुसकी, सकारात्मक विचार* *तेथेच तर देवाच्या* *कल्पकतेतील माणूस असतो..!*