तारे आणि आपली सूर्यमाला🎷 stars and our solar system

 तारे आणि आपली सूर्यमाला 🎷stars and our solar system. 


आपल्या माहिती विज्ञानाची 🎷  या What’s App  समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇

👉  माहिती विज्ञानाची 🎷

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही विज्ञान आपल्याला कायम माहित हवे. बरेचसे विज्ञान हे थोडेही विसरता येत नाही. आज आपण असेच विज्ञान पाहू जे लहानापासून थोरां मोठ्यापर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल.


  • 🎷 WHO – World Health Organisation
  • जागतिक आरोग्य संघटना.
  • सूर्य, ग्रह, चंद्र, तारे, धूमकेतू, उल्का, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांना खगोलीय वस्तू म्हणतात.
  • आपला सूर्य हा एक तारा असून आपल्या सूर्याभोवती पृथ्वी सह आठ ग्रह निरनिराळ्या कक्षा परिभ्रमण करतात.

  • बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनि, युरेनस, नेपच्यून हे आठ ग्रह सूर्याभोवती फिरतात.
  • मंगळ व गुरु यामध्ये लघुग्रहांचा पट्टा आहे.
  • चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात.
  • पृथ्वीच्या सगळ्याच जवळची खगोलीय वस्तू चंद्र होय.
  • चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3,84,400 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
  • प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.
  • चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.
  • चंद्राच्या लहान-मोठे दिसण्याला चंद्राच्या कला म्हणतात.

  • एका अमावास्येपासून दुसऱ्या moon अमावास्येर्यंतचा काळ
  • 29.5 दिवसांचा असतो.
  • सप्तर्षी:- रात्री आकाशात सात ताऱ्यांची एक विशिष्ट जोडणी दिसते त्यांना आपण सप्तर्षी म्हणतो.
  • व्याध:- मृग नक्षत्राच्या मधल्या तीन ताऱ्यांपासून एक सरळ रेषा काढली असता, ही रेषा एका तेजस्वी तार्याला येऊन मिळते तो तारा म्हणजे व्याध होय.
  • जेष्ठा:- वृश्चिक तारकासमूहात 10 ते 12 तारे असतात, त्यातील जेष्ठा हा तारा सर्वात तेजस्वी आहे.
  • वृश्चिक तारकासमूह दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली असतो.
  • आकाशाचे 88 भाग केले आहेत, म्हणजे एकूण 88 तारकासमूह मानले जातात.


27 नक्षत्र

प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

  • अश्विन नक्षत्र, 
  • भरणी नक्षत्र, 
  • कृत्तिका नक्षत्र, 
  • रोहिणी नक्षत्र, 
  • मृगशिरा नक्षत्र, 
  • आर्द्रा नक्षत्र, 
  • पुनर्वसु नक्षत्र, 
  • पुष्य नक्षत्र, 
  • आश्लेषा नक्षत्र, 
  • मघा नक्षत्र, 
  • पूर्वाफाल्गुनी नक्षत्र, 
  • उत्तराफाल्गुनी नक्षत्र, 
  • हस्त नक्षत्र, 
  • चित्रा नक्षत्र, 
  • स्वाति नक्षत्र, 
  • विशाखा नक्षत्र, 
  • अनुराधा नक्षत्र, 
  • ज्येष्ठा नक्षत्र, 
  • मूल नक्षत्र, 
  • पूर्वाषाढ़ा नक्षत्र, 
  • उत्तराषाढ़ा नक्षत्र, 
  • श्रवण नक्षत्र, 
  • घनिष्ठा नक्षत्र, 
  • शतभिषा नक्षत्र, 
  • पूर्वाभाद्रपद नक्षत्र,
  • उत्तराभाद्रपद नक्षत्र, 
  • रेवती नक्षत्र।

 🌞 सूर्य:-

   सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे  6000° सेल्सिअस इतके आहे.

  • सूर्याचा आकार इतका मोठा आहे की तो आपल्या पृथ्वी सारख्या आणखी 13 लाख पृथ्वी सहज सामावून घेईल.
  • सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील खगोलीय वस्तू सूर्याभोवती फिरतात.
  • सूर्याच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या 27.9 पट आहे. सूर्याची गुरुत्वीय बल 274 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकी आहे.


परिभ्रमण काळ :

ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी करण्यास जो वेळ लागतो त्यास त्या ग्रहाचा परिभ्रमण काळ म्हणतात.


🥁 प्लूटो 

  • 2006 सालापर्यंत प्लूटो या सगळ्यात दूरच्या ग्रहालाही सूर्यमालेत नवव्या ग्रहाचे स्थान देण्यात आले होते. प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते.
  • आतापर्यंत, IAU ने फक्त पाच बटू ग्रह ओळखले आहेत. सूर्यापासून अंतराच्या क्रमाने ते आहेत: 
  • प्लूटो,
  • सेरेस, 
  • हौमिया, 
  • मेकमेक आणि 
  • एरिस. (IAU stands for International Astronomical Union.)


  • प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमण काळ सूर्यापासून जसजसे दूर जावे तसतसा तो वाढत जातो.
  • बुध ग्रहाचा परिभ्रमण काळ फक्त 88 दिवस आहे.
  •  नेपच्यून ग्रहाचा परिभ्रमण काळ 165 वर्ष इतका मोठा आहे.
  • परिवलन: सूर्याभोवती परिभ्रमण करता करता ग्रह स्वतःभोवती फिरतात, त्याला ग्रहांचे परिवलन असे म्हणतात.


🌕 चंद्र

  • काही ग्रहाभोवती लहान खगोलीय ग्रह परिभ्रमण करतात त्यांना त्या ग्रहांचे उपग्रह किंवा चंद्र म्हणतात.
  • ग्रह व त्यांची चंद्र संख्या
  • बुध – 0
  • शुक्र – 0
  • पृथ्वी – 1
  • मंगळ – 2
  • गुरु – 95
  • शनि – 146
  • युरेनस – 27
  •  नेपच्यून – 16


🎻 कायपरचा पट्टा:- 

कायपरचा पट्टा किंवा एजवर्थ-कायपर पट्टा हा नेपच्यूनच्या कक्षेपासून पुढे म्हणजे सूर्यापासून सुमारे 30 खगोलशास्त्रीय एकक (A.U.) ते 50 खगोलशास्त्रीय एकक यामध्ये पसरला आहे. हा पट्टा लघुग्रहांच्या पट्ट्यासारखा आहे.


🦅 ऊर्टचा मेघ:-

ऊर्टचा मेघ हा एक धूमकेतूंचा विरळ मेघ असून त्याच्या अस्तित्वाबद्दल शास्त्रज्ञांमध्ये जबरदस्त संभ्रम आहे. सूर्यापासून तो 50,000 खगोलीय एकक किंवा 1 प्रकाशवर्ष अंतरावर आहे असे मानतात. 


  • बुध:-
  •  बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.
  •  सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर बुध ग्रहाला पाहता येते.


शुक्र

  • शुक्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. 
  • शुक्र ग्रहाला पहाटेचा तारा असेही म्हणतात.(उगवली शुक्राची चांदणी).
  • शुक्र ग्रहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो तर इतर ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करतात. 
  • पृथ्वीच्या चंद्राच्या जशा कला असतात तशा शुक्राच्याही कला असतात.


🌍 पृथ्वी

  • आपल्या सूर्यमालेचा विचार केला तर सूर्यमालेतील ग्रहापैकी पृथ्वी या एकाच ग्रहावर जीवसृष्टी आहे.
  • पृथ्वी ग्रहाचे स्वतःभोवतीचे परिवलन ज्या काल्पनिक अक्षाभोवती होते तो परिभ्रमण कक्षेला लंब नसून थोडा कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर हिवाळा उन्हाळा हे ऋतू आढळतात.

 

👏 मंगळ

  • मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे.
  •  मंगळ ग्रहाला फोबोस आणि डेमोस असे दोन उपग्रह आहेत. 
  • मंगळ ग्रहाच्या मातीत लोह (Fe) असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात.


  • सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा या दरम्यान बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत.
  • लघुग्रहांच्या पट्ट्या पलीकडे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत.
  • Ring:- बहिर्ग्रहाभोवती कडी आहेत.


गुरु:-

  •  सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह म्हणजे गुरुग्रह होय. 
  • गुरु ग्रहांमध्ये 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. 
  • गुरु ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या केवळ 318 पट आहे. 
  • गुरु ग्रह मोठा असूनही स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. गुरु ग्रहाचे एक परिवलन फक्त 10 तासात पूर्ण होते.


🪐 शनि:-

  1. शनी ग्रह हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे. 
  2. शनी ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या सुमारे 95 पट आहे. 
  3. शनी भोवती कडी आहेत. शनी भोवती असलेली कडी नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. 
  4. शनी ग्रहाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याची घनता. शनी ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.(पाण्याची अचूक घनता 1 g/ml नाही, तर थोडी कमी , 0.9998395 g/ml वर 4.0° सेल्सिअस आहे.)


😎  युरेनस:-

  1. युरेनस ग्रहाचा परिवलन अक्ष खूप कललेला आहे, त्यामुळे सूर्याभोवती परिभ्रमण करताना तो चेंडूप्रमाणे गडगडत गेल्यासारखा दिसतो. 
  2. युरेनस हा ग्रह शुक्राप्रमाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वतःभोवती परिवलन करतो.
  3. युरेनस ग्रहाचे तापमान – 224°C नोंदवले गेले आहे.


🥁 नेपच्यून

  1. नेपच्यून ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत 4,498,
  2. 252,900 कि.मी. आहे.
  3. नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा व सूर्यमालेतील सर्वांत बाहेरचा ग्रह आहे. 
  4. नेपच्यूनला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः 19 दिवस लागतात. 
  5. नेपच्यूनला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळपास 165 वर्षे लागतात. 
  6. नेपच्यून ग्रहाला हिंदीत व मराठीत वरुण असे म्हणतात. 
  7. नेपच्यूनचा शोध 4 ऑगस्ट 1964 रोजी लागला. 


🌹 लघुग्रह

  1. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान लहान लहान कमी वस्तुमानाच्या खगोलीय अवशेषांचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्यातील अवशेषांना लघुग्रह म्हणतात. 
  2. ग्रहांच्या निर्मिती काळात ग्रह बनण्यात अपयशी ठरलेले लहान-लहान खडक म्हणजे लघुग्रह.
  3. लघुग्रह देखील सूर्याभोवती परिभ्रमण करतात.



☄️ धूमकेतू

  1. धूमकेतू बर्फापासून बनलेला, केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे.
  2. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार असतात.
  3.  धूमकेतू हे सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात पण त्यांचा परिभ्रमण काळ फार जास्त असतो. 
  4. हॅले हा धूमकेतू 76 वर्षांनी एकदा दिसतो. हॅले चा धूमकेतू 2062 साली दिसण्याची अपेक्षा आहे.


🎷 उल्का/अशनी

  1. उल्का बहुधा वातावरणातच जळून नष्ट होतात. 
  2. आपण सहज बोलून जातो तारा तुटला. तारे तुटत नसतात. आपण जास्त तारा तुटणे म्हणतो ते उल्का पात होय. 
  3. जेव्हा एखादी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जवळ येते तेव्हा पृथ्वी तिला आपल्याकडे खेचून घेते त्यावेळी ती फार वेगाने पृथ्वीच्या वातावरणातून खाली येते. खाली येताना वातावरणातील घटकांशी घर्षण होऊन तापमान वाढते आणि ती वस्तू प्रज्वलित होते, आकाशात एक चमकती रेखा उमटवीत काही मार्ग आक्रमून दिसेनासा होते. हीच उल्का होय.


🎈  कृत्रिम उपग्रह:

  1. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट 19/ 04/ 1975 रोजी सोडण्यात आला.
  2. इस्रो (ISRO) या संस्थेमार्फत उपग्रह अवकाशात सोडण्यात येतात.
  3. मानवी कल्याणासाठी, उत्कर्षासाठी पृथ्वीच्या कक्षेत अनेक उपग्रह सोडले जातात अशा उपग्रहांना मानवनिर्मित किंवा कृत्रिम उपग्रह म्हणतात.
  4. कृत्रिम उपग्रह चंद्रापेक्षा कमी अंतरावरून पृथ्वीभोवती परिभ्रमण करतात.


🎻 कृत्रिम उपग्रहांचे उपयोग

  1. हवामानाचा अंदाज वर्तवणे.
  2. वैज्ञानिक संशोधन करणे .
  3. शैक्षणिक कार्यक्रम राबवणे.
  4. कृत्रिम उपग्रह GPS (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) जमिनीवरील वस्तूचे स्थान मध्ये वापरले जाते. 
  5. अवकाश संशोधन करणे.
  6. पृथ्वीवरून अवकाशात संपर्क साधने, संदेशवहन करणे.
  7. दूरसंचार रेडिओ आणि दूरदर्शनचे प्रक्षेपण करणे.
  8. अचूक भौगोलिक नकाशे बनवणे.


📡 रेडिओ दुर्बीण – GMRT 

  1. GMRT म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (Giant Metrewave Radio Telescope).
  2. जी.एम.आर.टी.मध्ये 50 मेगाहर्ट्‌झ ते 1420 मेगाहर्ट्‌झ या वर्णपटातल्या लहरींचा अभ्यास होतो.
  3. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील, पुणे- नाशिक हमरस्त्याजवळील, नारायणगाव जवळील खोडद या ठिकाणी ही दुर्बीण उभारली आहे. पॅराबोलिक आकाराच्या तारांच्या जाळ्यांच्या स्वरूपातलल्या दुर्बिणींचा हा समूह आहे. 
  4. येथे एकूण 30 दुर्बिणी आहेत. यांतल्या काही दुर्बिणींचा व्यास 45 मीटर आहे.
  5. सूर्यमाला, सूर्यमालेतील विविध ग्रह, उपग्रह, धूमकेतू पल्सार, महास्फोटक तारा (सुपरनोव्हा) इत्यादींच्या अभ्यासासाठी या दुर्बिणीचा वापर करतात.


🦢 ध्रुवताऱ्याचे महत्व काय आहे? किंवा 

ध्रुवतारा पृथ्वीवरून स्थिर दिसतो.

  1. ध्रुवतारा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या दिशेला आहे.
  2.  पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या दिशेमध्ये पृथ्वीच्या परिवलनाचा अक्ष आहे. त्यामुळे ध्रुवतारा पृथ्वीवरून स्थिर दिसतो. 
  3. त्यामुळे रात्री दिशादर्शक म्हणून ध्रुवताऱ्याचा उपयोग होतो.


🔱 पृथ्वी जर धूमकेतूच्या पुच्छेतून परिभ्रमण करत असेल तर उल्कांचा वर्षाव दिसतो.


उल्का पडली तरी नुकसान का होत नाही?

उत्तर:- उल्का पडत असताना अनेकदा तिचा बराचसा भाग हवेशी झालेल्या घर्षणामुळे जळून जातो. त्यामुळे पृथ्वीवर पडत असताना तिचा आकार वरचेवर लहान होत गेल्यामुळे उल्का पडली तरी नुकसान होत नाही.


*”समोर*” येणा-या *संधीला* जो 

*सन्मानपूर्वक* सामोरा जातो, त्या

*व्यक्तिला* त्याचे प्रयन्त *नेहमीच* साथ *देत* असतात. *काहीजण* मात्र मिळालेल्या *संधीतही* समस्या शोधत *बसतात* आणि *संधी* गमावतात.. संकट *

छोटे* असो वा *मोठे* , कुणालाच नको असते. मात्र अशा *संकटामधूनही* जे काही *धडे* घेतात, तेच *ख-या* अर्थाने आयुष्यात *यशस्वी* होतात. कारण प्रत्येक *संकटात* 

यशाचे *बीज* दडलेले *असते*…!!