भारतीय नौसेनेत अग्निवीर भरती

 दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय नौसेनेत अग्निवीर भरती

नमस्कार 🙏🎷

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौसेनेत  भरती प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा


🥁 तारीख:-  अग्निविर भरतीसाठी 13 मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.


🌈 अंतिम तारीख:- ही अर्ज प्रक्रिया 27 मे पर्यंत असणार आहे.

सर्व इच्छुक उमेदवारांना कळविण्यात आनंद होतो की, भारतीय नौसेनेत अग्नीविर भरतीसाठीचे सूचना पत्र जाहीर करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवार 13 मे पासून अर्ज प्रक्रिया करू शकतील.


अर्ज प्रक्रिया:

यासाठी ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज सादर करायचे आहेत.

🎷 अट:-

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना भारत सरकारच्या मान्यताप्राप्त बोर्ड परीक्षेत दहावी मध्ये 50 % गुण असणे आवश्यक आहे.

परीक्षेत पास होण्यासाठी प्रत्येक विषयात भारतीय नौसेनेद्वारे ठरवून दिलेले गुण प्राप्त होणे गरजेचे आहे.

🥁 निवड प्रक्रिया:-  पात्रतेनुसर पुढील पद्धतीने होणार आहे

  1. लेखी परीक्षा 
  2. शारीरिक चाचणी 
  3. वैद्यकीय तपासणी
  4. कागदपत्रांची पडताळणी 

वयोमर्यादा 
भारतीय नौसेनेत उमेदवाराची वयोमर्यादा आहे पुढील प्रमाणे आहे.
उमेदवार हा 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल  2007 या तारखेत जन्मलेले असावेत.

परीक्षा पद्धत
परीक्षा ही कॉम्प्युटर बेस असेल.

प्रश्न संख्या
भारतीय नौसेनेतील भरतीसाठी शंभर प्रश्न (100) विचारले जातील.

गुण
एका प्रश्नासाठी एक गुण असेल.

कालावधी:- परीक्षेचा कालावधी एक तास असेल.

विषय:- 
परीक्षेसाठी कोणते विषय असतील?
  1. इंग्रजी 
  2. गणित 
  3. विज्ञान 
  4. सामान्य ज्ञान 
या विषयावर प्रश्न विचारले जातील.

शुल्क:-
अर्ज करण्यासाठी चे शुल्क 550 रुपये आहे.