यश.🎷.. आणि अपयशा नंतर…📖
कोणत्याही समस्ये कडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळ्या असतो. त्याच्या अंतर्मनातील भावनावर त्याच्याकडे कोणत्याही समस्येच्या प्रश्नाचे उत्तर असते.🎷
काही वेळेस काही समस्यांचे उत्तर स्वतःला सापडत नसते कारण प्रत्यक्ष परिस्थिती उद्भवल्यावर काहीजणांचा मेंदू त्यावेळेस त्या समस्येला प्रतिसाद देत नसतो, अशा वेळेस जर आपण त्रयस्थपणे विचार केला तर त्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.
काल बारावी बोर्ड 2024 चा निकाल लागला. येत्या चार-पाच दिवसात 10 वी बोर्डाचा निकाल लागेल. काहीजण यशाच्या शिखरावर, काही मध्यम, तर काहीजण तळागाळात असतील. पण प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणतीही परीक्षा म्हणजे त्यांचे संपूर्ण जीवन नसते. यशानंतर पाय जमिनीवर ठेवून शांत मनाने पुन्हा आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाणे खूप गरजेचे असते, आणि अपयश खरंतर नसतेच फक्त त्यातून संधी शोधायची असते. ज्याला संधी शोधता आली तो विजेता. फक्त एक असते अपयशी विद्यार्थ्याला /व्यक्तीला काही काळ समाजाच्या वेगळ्या नजरेचा सामना करण्याची हिम्मत हवी. यश मिळाल्यावर ह्याच नजरा/ व्यक्ती हार तुरे घेऊन येणार असतात. माझा एक मित्र बारावी बोर्ड परीक्षेत नापास झाल्यावर प्लॉटिंगच्या व्यवसायात पडला आज तो एक नामांकित बिल्डर आहे. पण हे कोणाला शक्य आहे? ज्याला राखेतून विश्व निर्माण करता येण्याची जिद्द आहे त्यालाच. अपयश हे कोणासाठी अंतिम असते? जे प्रयत्न थांबवतात त्यांच्या साठी.
आपल्या मनातील नकारात्मक विचार जर आपण काढून टाकले तर…. स्टार्टअप योजनेअंतर्गत आज आपणास कर्ज उपलब्ध होत आहे. शिकून नोकरी करण्यापेक्षा आपल्याला जो व्यवसाय आवडतो तो व्यवसाय जर आपण सुरू केला तर…. इतरांकडे नोकर म्हणून राहण्यापेक्षा उद्योजक व्हाल व इतरांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्याल. स्वतःची कल्पकता वाढवा, योजना तयार करा कष्ट, जिद्द या शस्त्रांचा योग्य वापर करून, वेळेवर योग्य निर्णय घेऊन संधी निर्माण करून आपल्या प्रगतीकडे चला.
काही गोष्टी विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवाव्यात.
- आपल्या अंतर्मनाला अशी सवय लावावी की, जोपर्यंत तुम्ही स्वतः म्हणणार नाहीत (त्या दिवसाचे काम पूर्ण झाल्यावर )मी थकलो, तोपर्यंत थकायचे नाही.
- वेळ कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही, तुम्ही आनंदी असाल किंवा दुःखात असाल वेळ ही पुढे पुढे जातच असते.
- दररोज काहीतरी आपण नवीन शिकलेच पाहिजे
- वेळेचा सदुपयोग करावाच
- आपले ध्येय सहसा कोणाला सांगू नये व त्या ध्येयाच्या दिशेनेच वाटचाल करावी
- नियोजित कार्य:- आपले ठरवून ठेवलेले काम एवढ्या शांतपणे करावे की यशाचा आवाज हा सुतळी बॉम्ब पेक्षाही नक्कीच मोठा ठरावा.
- जीवनात चढ-उतार असतातच त्यामुळे जीवनातील प्रसंग मनाला खूप लावून घेऊ नयेत
-
जिंदगी बहुत छोटी है ऐसे लोगो के साथ बिताएजो आपको हसाये.
- निराशा सहन करण्याची क्षमता वाढवताना एकांतात कधीही बसू नये
- संवाद:- कोणत्याही परिस्थितीत आपला इतरांशी असलेला संवाद कधीच बंद करायचा नाही.कारण संवादातूनच मार्ग निघत असतात.
- युक्ती:- झपझप चालण्यातूनही काही जणांना काही युक्त्या सुचत असतात त्याच पद्धतीने आपल्याला आपल्यासाठी योग्य युक्त्या कोणत्या वेळेस सुचतात हे पहावे. काही जणांना युक्त्या 🚽 या पण ठिकाणी सुचतात. 🙏
” इच्छाओ की सडक तो बहुत दूर तक जाती है, बेहतर यही है की हम ‘जरुरतो की गली मे मुड जाये’.”
🥁 जबाबदारी पालकांची:-
प्लॅन:- पालकांनी मुलांसाठी ‘A’ प्लॅन तयार करावा, व या प्लॅन सोबत काही कारणाने यात यश आले नाही तर ‘B’ प्लॅन तयार असावा. हे सहज शक्य नसते.
अपेक्षांचे ओझे होणार नाही याकडे पालकांनी लक्ष दिले तर हे थोडे अजून सहज होते.
अपेक्षा:-आपल्या मुलांची प्रगती पाहताना, पालकांनी मुलांकडून योग्य अपेक्षा ठेवाव्यात. आपल्या अनुभवाचा,डट ज्ञानाचा योग्य वापर करून मुलांना योग्य दिशेला न्यावे. तसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्यास कशात आवड आहे, अभिरुची आहे हे पहावे व त्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
अभिरुची:- हे सर्व करत असताना, हा दीर्घकालिन पल्ला असल्यामुळे मन शांती उत्तम राहावी यासाठी प्राणायाम, योगा, ध्यानधारणा, व्यायाम यापैकी ज्यात अभिरुची असेल ते योग्य पद्धतीने मुलांकडून करून घेऊन त्यांची रेल्वे गाडी ट्रॅकवर व्यवस्थित ठेवावी.
मित्र:- प्रगतीसाठी मित्रांची गरज असतेच त्यामुळे आपल्या जीवनातील मित्र हे आपल्या ध्येयाच्या दृष्टीने योग्य असतील असेच असावेत.