10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 27 मे रोजी 1 वाजता 🎷.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल
27 मे 2024 दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतसळावर सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
इयत्ता 10 वी म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र मार्च 2024 परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येतील. विद्यार्थ्यांना सदर माहितीची प्रिंटआउट पण घेता येईल. पीडीएफ रूपात पण रूपांतरित करून मार्क मेमो घेता येईल.
10 वी बोर्ड निकाल हा बेस्ट ऑफ फाईव्ह/ best of 5 प्रमाणे दर्शवतात. याचा अर्थ सहा विषयांपैकी ज्या एका विषयात कमी गुण आहेत ते गुण वगळले जातात, उर्वरित पाच विषयांच्या गुणांची बेरीज होते त्यास 500 ने भाग दिला जातो.
गुणपडताळणी:-
परीक्षेत पविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून
अर्ज करून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पण यासाठी आवश्यक अटी /शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत.
मुदत:-
गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार दिनांक 28 5 2014 ते मंगळवार दिनांक 11 6 2024 पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना करता येईल. यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
🥁 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येईल. 🎷
सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना Best of luck 🎷
*”हसतमुख लोकांचा सहवास
अत्तराच्या दुकाना सारखा असतो
काहीही खरेदी केले नाही तरी
मन सुगंधीत तथा उल्हासीत होते”*