सौरभ नेत्रावळकर 🎷
जन्म:
16 ऑक्टोबर, 1991 मुंबई, महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण –
पापुआ न्यू गिनीविरुद्ध 27 एप्रिल 2019 रोजी विन्डहोक येथे.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी 20 पदार्पण –
संयुक्त अरब अमिराती विरुद्ध 12 मार्च 2019 रोजी दुबई येथे.
भारताच्या U 19 संघातील एक खेळाडू, मुंबईसाठी एक देशांतर्गत क्रिकेटपटू. भारतातील तीव्र क्रिकेट स्पर्धेत सौरभ ने आपल्या जन्मभूमीच्या सीमेपलीकडे संधी शोधत यूएसएला कर्मभूमी केली. आपल्या व्यवसायातून वेळ काढून त्याने सराव सत्रामध्ये कसून तयारी केली. 17 जून पर्यंत त्याने क्रिकेटसाठी कंपनी कडे सुट्टी टाकली आहे.
सौरभच्या वेग, हालचाल व बाऊन्स यामुळे पाकिस्तानी फलंदाज विखुरले गेले.
सौरभ नेत्रावळकर ने माजी चॅम्पियन पाकिस्तानवर आश्चर्यकारक विजय मिळवून दिला.
2010 मध्ये बाबरच्या पाकिस्तानने U19 क्रिकेट स्पर्धेत नेत्रावळकर च्या आशा धुळीस मिळवल्या. या कडू आठवणीतून सावरून 14 वर्षांनी हा सुवर्णयोग घडवून आणला.
कॅनडा विरुद्ध नेत्रावळकर ने दोन ओव्हर मध्ये 16 धावा दिल्या.
CAN 194/5 USA 197/3
(20 ). (17.4)
T-20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेला पाकिस्तानवर विजय मिळवून देणारा अभियंता.
PAK 159/7. USA 159/3
13/1. 18/1
सौरभ नेत्रावळकर ने आपल्या जादूई कामगिरीने इतिहासात आपले नाव कोरले🎷
सुपर ओव्हरमध्ये 18 धावांचा बचाव करताना, क्रिकेटर-अभियंता बनलेल्या नेत्रावळकरने गुरुवारी टीम यूएसएला डॅलस येथे आश्चर्यकार विजय मिळवून दिला.
कामगिरी
4 ओव्हर मध्ये 2 विकेट घेऊन 18 धावा देत दर्जेदार कामगिरी केली. इतर गोलंदाजाच्या तुलने त्याचा इकॉनॉमी रेट 4.50 खूपच छान आहे/ होता.
ए . जोन्स ने 6 चेंडूत 11 धावा केल्यावर 7 अतिरिक्त धावामुळे एका ओव्हर मध्ये 18 धावा केल्या.
आय. अहमद ने 3 चेंडूत 4 धावा करून तो सौरभ चा बळी ठरला.
एस खान ने 3 चेंडू मध्ये 3 धावा केल्या.
2 धावा वाईड
4 धावा लेग बाई
एकूण 13 धावा सौरभ नेत्रावळकर च्या सुपर ओव्हर मध्ये निघाल्या.
USA 5 धावांनी सुपर ओव्हर मध्ये जिंकली.
सामनावीर मोनंक पटेल ठरला ज्याने 38 चेंडू मध्ये 50 धावा केल्या.
अमेरिकी क्रिकेट तर्फे बरेच भारतीय खेळाडू क्रिकेट खेळतात. मोनांक पटेल,जसकरण मल्होत्रा, हरमीत सिंह, जगदीप सिंह.
मोनांक पटेल हा USA टीमचा कप्तान आहे.