CET निकाल 👏🥁🎷

 CET निकाल 👏🥁🎷

🎻पीसीएम, पीसीबी सीईटी चा आज निकाल. 
🌈 प्रवेश वेळापत्रक 20 जून नंतर उपलब्ध होणार.

इयत्ता बारावी नंतर विद्यार्थ्यांचा कल हा कोणत्या शाखांकडे आहे त्यानुसार विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा देतात. स्वतःचे करिअर घडवण्यासाठी सीईटी(CET) ही परीक्षा काही विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची असते. 
पीसीएम, पीसीबी ग्रुपच्या या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जरी अद्याप जाहीर झाले नाही तरीही या निकालाने विद्यार्थ्यांत नवीन चेतना येणार.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी 38,743 जणांनी सीईटी परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांची उत्सुकता आज सायंकाळी 6 वाजता संपुष्टात येईल. 
परीक्षा कालावधी
अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी सेलतर्फे 12 एप्रिल ते 17 मे दरम्यान 16 दिवस प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यासाठी आवश्यक शहरातील सहा केंद्रावर सीबीटी (CBT) अर्थात कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात आली होती.
मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा निकाल काही दिवसापूर्वी लागला.
आता उत्सुकता सीईटी परीक्षेच्या निकालाची होती.
सीईटी केंद्र:-
एमजीएम (MGM)चे जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय, 
नागसेन वन येथील पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, 
सातारा तांडा येथील श्रेयश अभियांत्रिकी महाविद्यालय, 
वाळूज येथील आयसीम आणि 
देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात सीईटी परीक्षा घेण्यात आली होती.
आकडेवारी:-
अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासाठी एकूण 41,413 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 
त्यापैकी 2,670 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेला गैरहजरी नोंदवली. 
38743 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली.

सीईटी परीक्षा निकालाची तारीख:- 
 महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटी चे निकाल 
रविवारी म्हणजेच 16 जून सायंकाळी 6 वाजता घोषित करण्यात येणार आहेत.

नोट:- कृषी अभ्यासक्रमाची सेलमार्फत सीईटी परीक्षा झाली तरी पण त्यांची प्रवेश प्रक्रिया तंत्र शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

विशेष बाब:
  • प्रवेश प्रक्रिया:-अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक 20 जून ते 25 जून पर्यंत येऊ शकते. 
  • पॉलिटेक्निक प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 29 मे ते 25 जून पर्यंत पॉलिटेक्निक साठी विद्यार्थ्यांना त्यांचे नाव नोंदवता येणार आहे. (यात मुदतवाढ मिळू शकते पण.) 
  • अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या प्रवेशालाही लवकरच सुरुवात होईल त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही.

मराठवाडा विशेष:-
  1. मराठवाडा विभागात एकूण 29 कॉलेज मध्ये 9,626 जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
  2. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 11 कॉलेज 🎷👏 असून या कॉलेजमध्ये एकूण 4,316 जागा आहेत.
  3. बीडमध्ये एकूण 4 कॉलेजमध्ये 1,350 प्रथम वर्षाच्या जागा उपलब्ध आहेत.
  4. जालन्यातील दोन कॉलेजमध्ये 270 जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. 
  5. लातूरच्या तीन कॉलेजमध्ये 900 जागा. 
  6. नांदेडच्या चार कॉलेजमध्ये 1,630 जागा आहेत.
  7. धाराशिव 4 कॉलेजमध्ये 870 जागा.
  8. परभणी एकमेव कॉलेज असून या कॉलेजमध्ये 210 जागा आहेत. (हिंगोलीला अभियांत्रिकी कॉलेज नाही 😔)


🎻.संकेतस्थळ:-
विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर आज सायंकाळी 6 pm नंतर भेट द्यावी.
http://www.mahacet.org



सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा