सर्व पालकांना विनंती 🙏

 

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

*सर्व पालकांना विनंती* 🙏


आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवा. नाहीतर मुलं शिक्षकाच्या डोक्यावर बसतील व नंतर भविष्यात बिघडतील व नंतरच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील म्हणून विचार करा. त्यासाठी…

*काही मुद्दे खालीलप्रमाणे असावेत* 


*1)*केशरचना/Hairstyle:- 

 मुलांच्या केसांची ठेवण व्यवस्थित असावी. केशभूषा साधी असावी.

*2)*बूट 

 पायातील बूट जास्त किमतीचे नसावेत. साधे असावेत. 

*3)*गणवेश

 शालेय गणवेश व्यतिरिक्त इतर ड्रेस वर जास्त खर्च करू नका 

*4)*दप्तर 

 वह्या आणि पुस्तके योग्य तेवढीच घ्या…. 

*5)* उपाधी

दादाचा मुलगा, भाऊचा मुलगा या उपाध्या घरीच ठेवून फक्त विद्यार्थी म्हणूनच शाळेत पाठवून द्या.

*6)*मोबाईल

 अँड्रॉइड मोबाईल पासून मुलांना दुर ठेवा….. 

*7)* लाड व हट्ट

मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पुरवू नका….. 

*8)* मित्र

मुलांचे मित्र तपासा सर्व मित्रांची माहिती करून घ्या.

*9)*शहानिशा 

मुलगा/मुलगी शाळेत जाण्यासाठी घरुन निघतात,खरच शाळेत जातात का याची वरचेवर शिक्षकांना फोन करून शहानिशा करा.

*10)*व्यसन 

 व्यसनाधीन तेचं वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या मुलाबद्दल सतर्क रहा.

 *11)*उणीव

तुमची क्षमता असली तरी आपल्याकडे काहीतरी कमी आहे, उणीव आहे हे त्याच्या लक्षात येऊ द्या*…… 

*12)* पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या…. 

*13)* शाळेत पाठवताना त्याच्याकडे एकही रूपया देऊ नका अगर .गरजे इतकेच पैसे देने…. 

*14)*संस्कार 

 आपल्या मुलांना शिक्षीत बनवण्या सोबत सुशिक्षित बनवण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा…. 

*15)*अभ्यास

 24 तासा पैकी कमीत कमी एक तास मुलांसोबत बसून अभ्यास घ्या…. 

*16)* विचारसरणी

आपली मुलं चुकीच्या विचारसरणीच्या सहवासात जात असतील तर त्यांना वेळीच त्या सहवासातून बाजूला घ्या… जास्तीत जास्त तुमच्या सहवासात ठेवा….. 

*17)*शिक्षक भेट

 महिन्यातून कमीत कमी दोन वेळा शिक्षकांना भेटायला नक्की जा…. 

*18)* सहकार्य

तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये बदल घडवू शकत नाहीत… 

*19)* जबाबदारी

मुलांना एकदा शाळेत पाठवले की आपली जबाबदारी संपली असे समजू नका… 

*20)* मूल्य संस्कार

आपल्या मुलांना शिक्षक योग्य संस्कार आणि शिक्षण देतात की नाही ते तपासून पाहत जा आणि नसेल तर ते शिक्षकांच्या लक्षात आणून द्या🙏…

*21)* आदर

शिक्षकांचा मान सन्मान करायला आपल्या पाल्याला सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या..

22) वाद

 मुलांच्या शिक्षकाविषयी तक्रारी ऐकून शिक्षकांशी विनाकारण वाद घालू नका

23) खापर फोडणे 

 घरचे व रस्त्याने जाता येता मुलांचे होणारे वाद त्याचा शिक्षकावर ठपका ठेवू नका

२4) तुमची मुलं  ध चा म करून शिक्षकाविषयी घरच्यांना काहीतरी सांगत असतात. तुमची खूप चलती आहे, पण विनाकारण शिक्षकाला काही बोलू नका,भांडू नका.शिक्षक अजून शिक्षकच आहे.

25) विद्यार्थी व पालकांनी शिक्षकांशी तुमचे जेवढे होतील तेवढे प्रेमाचे संबंध ठेवता येतील तेवढा अधिकाधिक प्रेम असू द्या. कारण मुलांना शिक्षक किंवा आईच घडवू शकते लक्षात ठेवा.

26) मानसन्मान 

 *पूर्वी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षा होती म्हणून ती पिढी सुधारली* आता शिक्षकांनी थोडे जरी काही केले तरी पालक शिक्षकांशी वाद घालतात व आमची खूप ओळखी आहे.आमची चलती आहे .असा शिक्षकाला दम देतात. तसे करू नका शिक्षकांना शिक्षकाचा योग्य तो मान द्या

27) उद्देश

तुमची मुलं सुधारतील हा शिक्षकाचा प्रामाणिक उद्देश असतो. कृपया गैरसमज करून घेऊ नका .नाहीतर भविष्यात पश्चाताप करावा लागेल.

*तुम्ही वरील नियम नाही पाळले तर तुमची मुले घडणार हे निश्चित आहे, वरील नियम नाही पाळले तर मुलं निश्चितच बिघडणार हे पण निश्चित आहे*

🙏🙏🙏🙏🙏

 *चला तर मग आपण आपल्या देशाचे एक चांगले दक्ष व सुसंस्कृत नागरिक घडवूया या…..*


*आपल्या मुलांना फक्त आई🙏 किंवा शिक्षकच🥁 घडू शकतात हे लक्षात ठेवा*


🙏ज्यांनी हे संकलित करून लिहिले, त्या लेखकास समर्पित 👏🙏




   _*आयुष्य जगताना आई, वडील व शिक्षक नावाची भीती कायम असली पाहिजे, 

ज्या दिवशी आपण आईवडिल व शिक्षकांना घाबरणार नाही

 तिथून पुढे आयुष्याची

 घसरण चालू होते.*_

🎷