9th Science, laws of Motion-2, 9 वी विज्ञान, गतीचे नियम-2
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇
🚉 एकसमान गती:-
- जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात.
- एकसमान गतीमध्ये चाल कायम असते.
नैकसमान गती:-
- जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात.
- नैकसमान गतीमध्ये चाल कायम नसते.
वरील मुद्द्यांचा उपयोग करून आपणास एकसमान गती व नैकसमान गती हा फरक लिहिता येतो.
✈️ Uniform motion:-
- If an object covers equal distances in equal time intervals, it is said to be moving with uniform motion.
- In uniform motion, the speed of the body is constant.
Nonuniform motion:-
- If an object covers unequal distances in equal time intervals, it is said to be moving with non-uniform motion.
- In nonuniform motion, the speed of the body is not constant.
Using the above points we can write the difference between uniform motion and non-uniform motion.
🎻 त्वरण:-
- व्याख्या:- वेग बदलातील दराला त्वरण असे म्हणतात.
- जर u हा सुरुवातीचा वेग t या कालावधीनंतर बदलून अंतिम वेग v होत असेल तर..
- a = v – u / t
Acceleration:-
- Definition:- The rate of change of velocity is called acceleration.
- Acceleration is denoted by ‘a’.
- If the initial velocity is ‘u’ and in time ‘t’ it changes to final velocity ‘v’. Then a = v – u / t
🥁 धन, ऋण व शून्य त्वरण:-
धन त्वरण:-
जेथे त्वरण वेगाच्या दिशेने असते, व एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असते.
उदा:- स्थिर चेंडूवर बॅटने केलेला आघात.
ऋणत्वरण:-
जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असून, वेग कमी होतो तेव्हा त्वरणऋणअसते.
ऋण त्वरणालाच ‘अवत्वरण’ किंवा ‘मंदन’ (Deceleration) असे म्हणतात.
उदा:- गतिमान कारचे ब्रेक दाबल्यावर गतीत होणारा बदल.
शून्य त्वरण:–
वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते.
उदा:- एका सरळ रेषेत स्थिर गतीसह कार.
🌻 Positive, negative and zero acceleration:–
Positive acceleration:-
When the acceleration is in the direction of velocity and the velocity of an object increases, the acceleration is positive.
Ex. A ball at rest, hit with a bat.
Negative acceleration:-
When the velocity of an object decreases with time,and its direction is opposite to the direction of velocity, it has negative acceleration.
Negative acceleration is also called ‘deceleration’.
Ex:– When brakes are applied to a car in motion.
Zero acceleration:-
If the velocity of the object does not change with time, it has zero acceleration.
Ex. The motion of a car in a straight line with constant speed.
🥁 एकसमान गती व नैकसमान गतीसाठीच्या अंतर-काल आलेखात काय फरक दिसून येतो?
उत्तर:-
- एकसमान गतीमध्ये कापलेले अंतर हे वेळेच्या समप्रमाणात असते.
- एकसमान गती ही त्वरणित गती नाही.
- नैकसमान गतीमध्ये कापलेले अंतर हे वेळेच्या समप्रमाणात नसते.
- नैकसमान गती ही त्वरणित गती आहे.
🦢 What difference do you see in the distance-time
graphs for uniform and non-uniform motion?
Ans:-
- For uniform motion distance covered is directly proportional time
- Uniform motion is not an accelerated motion.
- For non-uniform motion distance covered is not directly proportional to time.
- Non uniform motion is an accelerated motion.
💐 आलेख पद्धतीने गतिवषयक समीकरणे:-
उत्तर:-
न्यूटनने गतीविषयक तीन समीकरणांचा संच मांडला.एका रेषेत गतिमान
वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण व काल यातील संबंध या गतिवषयक समीकरणांत मांडला आहे.
✈️ वेग काल संबंधाचे समीकरण
समजा एक वस्तू सुरुवातीला ‘u’ वेगाने सरळ रेषेत प्रतिमान आहे. ‘t’ वेळेत ‘a’ त्वरणमुळे ती वस्तू ‘v’ वेग गाठते व तिचे विस्थापन ‘s’ असेल.
एकसमान त्वरणीत वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल वरील आकृती मध्ये आलेखाच्या साहाय्याने दर्शवला आहे.
वस्तू आलेखातील D या बिंदूपासून गतिमान होते. वेळेनुसार वस्तूचा वेग वाढत जातो व t या कालावधीनंतर वस्तू आलेखातील B ह्या बिंदूपर्यंत पोहोचते.
वस्तूचा सुरुवातीचा वेग = u = OD
वस्तूचा अंतिम वेग = v = OC
कालावधी = t = OE
त्वरण (a) = वेगातील बदल / काल
त्वरण (a) = (अंतिम वेग – सुरुवातीचा वेग) / काल
a = (OC – OD) / t
at = (OC – OD) (समीकरणाच्या दोन्ही बाजूला t ने गुणून)
( बऱ्याच मुलांना हाच भाग लवकर समजत नाही.)
CD = at …… (i) (OC – OD = CD)
B या बिंदुतून Y अक्षास समांतर रेषा काढा. ती X अक्षास E बिंदूत छेदते. त्याचबरोबर D या बिंदुतून X अक्षास समांतर रेषा काढली.
ती BE ह्या रेषेस A या बिंदूत छेदते.
आलेखावरून…. BE = BA + AE
v = CD + OD
…(AB = CD आणि AE = OD)
v = at + u …………( i वरून )
v = u + at
हे गतीविषयक पहिले समीकरण आहे.
🚉 Equations of motion using graphical method:-
Newton studied motion of an object and gave a set of three equations of motion.
These relate the displacement, velocity, acceleration and time of an object moving along a straight line.
Suppose an object is in motion along a straight line with initial velocity ‘u’. It attains a final velocity ‘v’ in time ‘t’ due to acceleration ‘a’ its desplacement is ‘s’.
Equation describing the relation between velocity and time:-
The above figure shows the change in velocity with time of a uniformly accelerated object.
The object starts from the point D in the graph with velocity u. Its velocity keeps increasing and after time t, it reaches the point B on the graph.
The initial velocity of the object = u = OD
The final velocity of the object = v = OC
Time = t = OE
Acceleration (a) = (Change in velocity) /
Time
=(Final velocity – Initial velocity)/
Time
a = ( OC – OD ) / t
at = ( OC – OD ). (Many students do not understand this part.)
CD = at …… ( i ) ( OC – OD = CD )
Draw a line parallel to Y axis passing through B. This line will cross the X axis in point E.
Now draw a line parallel to X-axis passing through point D. This line will cross the line BE at A.
From the graph…. BE = AB + AE
v = CD + OD …..(AB = CD and AE = OD)
v = at + u …………(from i )
v = u + at
This is the first equation of motion.
*जर अंगातील खराब कपड्यांची लाज वाटत असेल तर, डोक्यातील वाईट विचारांची पण लाज वाटायला पाहिजे.**मन मोहून टाकणारी सुंदरता निसर्गात प्रत्येक ठिकाणी असते. फक्त आपण त्या सुंदरतेचा योग्य उपभोग घ्यायला चुकतो…!**आपला दिवस आनंदी जावो.*🎷