9th Work & Energy 1, 9 वी कार्य आणि ऊर्जा 1.
आपल्या What’s app समूहात सामील होण्यासाठी खालील👇 निळ्या लिंकला स्पर्श करा🙏
___________________________
🥁 कार्य व्याख्या:-
‘एखाद्या वस्तूवर बल (F) प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन (s) बलाच्या दिशेने झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य (W) घडून आले असे म्हणतात.’
Definition work:-
‘Work (W) is said तोक्क be done when a force (F) applied on an object causes displacement (s)
of the object.’
____________________
🪂 सूत्र
पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिमाण F आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन s यांच्या गुणाकारा इतके असते.
कार्य = बल × विस्थापन
W = F × s
ज्यूल (J) = न्यूटन (N) × मीटर (m)
J = N × m
कार्याचे एकक
कार्य = बल × विस्थापन
SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन (N) व विस्थापनाचे एकक मीटर (m) आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन-मीटर आहे. या एककालाच ज्यूल (J) असे म्हणतात.
——————————————
The work (W) done by a force (F) acting on an object is the product of the magnitude of the force and the displacement (s) of the object in the direction of the force.
Work (W) = force (F)× displacement(s)
1 J = 1 N × 1 m
In SI system, the unit of force is newton (N) and the unit of displacement is metre
(m). Thus, the unit of force is newton-metre. This unit is called joule.
Work (J) = Force (N) × Displacement (m)
1 J = 1 N × 1 m
—————-_————————
व्याख्या 1 ज्यूल:–
1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 ज्यूल होय.
1 ज्यूल = 1 न्यूटन ´× 1 मीटर
1 J = 1 N × 1m
CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटिमीटर (cm) आहे. म्हणून कार्याचे एकक डाईन-सेंटिमीटर आहे. यालाच अर्ग असे म्हणतात.
व्याख्या:- 1 अर्ग – 1 डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 अर्ग होय.
1 अर्ग = 1 डाईन × 1 सेमी
__________________________
1 Joule : If a force of 1 newton displaces an object through 1 metre in the direction
of the force, the amount of work done on the object is 1 joule.
1 joule = 1 newton ´ 1 metre
1 J = 1 N ´ 1 m
In CGS system, the unit of force is dyne and that of displacement is centimeter (cm). Thus, the unit of work done is dyne-centimetre. This is called an erg.
🥯 Definition 1 erg : If a force of 1 dyne displaces an object through 1 centimetre in the direction
of the force, the amount of work done is 1 erg.
1 erg = 1 dyne × 1 cm
————————————–
✈️ ज्यूल आणि अर्ग यामधील संबंध
1 न्यूटन = 10^5 डाईन व
1 मीटर = 10^2
कार्य = बल × विस्थापन
1 ज्यूल = 1 न्यूटन × 1 मीटर
1 ज्यूल = 10^5 डाईन × 10^2 सेमी
= 10^7 डाईन सेमी
1 ज्यूल = 10^7 अर्ग
——————————
🪘 Relationship between joule and erg
We know that,
1 newton = 105 dyne and
1 m = 10^2 cm
Work = force × displacement
1 joule = 1 newton × 1 m
1 joule = 10^5 dyne× 10^2 cm
= 10^7 dyne cm
1 joule = 10^7 erg
———————————
धन, ऋण व शून्य कार्य. (Positive, Negative and Zero work)
धन कार्य:-
ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते त्या वेळेस त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते.
उदा:– बंद पडलेल्या स्कूटरला धक्का देऊन गतिमान करणे.
ऋण कार्य:–
ज्या वेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्या वेळी त्या बलाने केलेले कार्य ऋण कार्य असते.
उदा:- मित्राने फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे.
शून्य कार्य:- ज्या वळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमकांना लंबरूप असतात त्या वेळी
बलाने केलेले कार्य शून्य असते.
उदा:– दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे.
———————————–
Positive, negative and zero work
positive work:-
When the force and the displacement are in the same direction, the work done by
the force is positive.
Ex:- Pushing a stalled vehicle.
Negative work:-
When the force and the displacement are in opposite directions, the work done by the force is negative.
Ex:- when a cyclist applies breaks on his bicycle and slows it down, the work done by the applied force is negative.
Zero work:–
When the applied force does not cause any displacement or when the force and the displacement are perpendicular to each other, the work done by the force is zero.
Ex:- A stone tied to a string and revolved at constant speed in a horizontal plane, the work done by the centripetal force acting on the stone 🪨 is zero.
______________________________
🏵️ बलाचे प्रकार कोणते?
उत्तर:-
- गुरुत्वीय बल
- विद्युत चुंबकीय बल
- अणुकेंद्रकीय बल
- स्नायू बल
- घर्षण बल
- चुंबकीय बल
- स्थितिक विद्युत बल
- यांत्रिक बल
- स्प्रिंगबल
- यांत्रिक बल
————————————-
💪 What are different types of forces?
Ans:-
- Gravitational force,
- Nuclear force
- Electromagnetic force
- muscular force
- frictional force.
- magnetic force,
- electrostatic force
- Spring force
- Electrostatic force
- Mechanical force