9 th Science, Current Electricity 3, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 3.
📝 आपल्या what’s App समुहात सामील होण्यासाठी खालील👇 लिंक🔗 ला स्पर्श करा.
🪘 वाहकाचा रोध व रोधकता (Resistance and Resistivity)
वरील आकृती प्रमाणे वाहकात खूप मोठ्या प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. हे मुक्त इलेक्ट्रान्स सातत्याने यादृच्छिक गतीत (इकडे तिकडे कोणत्याही दिशेला.) असतात. जर वाहकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त केले तर हे इलेक्ट्रॉन्स कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ लागतात.अशा गतिमान प्रकारच्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहामुळे विद्युतधारा निर्माण होते.
रोध:- गतिमान इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर (Cu^2+, Al^3+) आदळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला अडथळा होतो व विद्युतधारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध (R) असे म्हणतात.
🎻 Resistance and resistivity of a conductor
Ans:-
As shown in above figure, there are a large number of free electrons e^- in a conductor. Electrons are constantly in random motion. When a potential difference is applied between the two ends of the conductor, these electrons start moving from the end at lower potential to the end at higher potential. The motion of the electrons causes the flow
of current.
Resistance:– Moving electrons strike the atoms and ions which lie along their path. Such collisions cause barrier / hindrance to the flow of electrons and oppose the current. This hindrance is called the resistance of the conductor.
🅿️ रोधकता :
विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध R हा वाहकपदार्थ (Material), वाहकाची लांबी (L) व काटछेदी क्षेत्रफळ A या गोष्टींवर अवलंबून असतो.
जर वाहकाचा रोध R असेल तर
रोध हा लांबीशी समानुपाती असतो
R ∝ L
रोधा हा काटछेदी क्षेत्रफळाशी व्यस्तानुपाती असतो
R ∝ 1 / A
∴ R ∝ L / A
R = ρ L / A (rho, ρ)
या ठिकाणी ρ हा समानुपातता स्थिरांक आहे. या स्थिरांकास वाहकपदार्थाची ‘रोधकता’ (Resistivity) म्हणतात.
एकक:- SI पद्धतीत रोधकतेचे एकक ओहम मीटर (Ω m) आहे. रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असून वेगवेगळ्या
पदार्थांची रोधकता ही भिन्न असते.
🚧
Resistivity :
At a given temperature, the resistance (R) of a conductor depends on its length (L), area of cross-section (A) and the material it is made of.
If the resistance of a conductor is R, then
Resistance is directly proportional to the length of wire.
R ∝ L
Resistances is inversely proportional to the area of cross section of wire.
R ∝ 1 / A
∴ R ∝ L / A
R = ρ L / A (rho , ρ)
ρ is the constant of proportionality and is called the resistivity of the material.
Unit:- The unit of resistivity in SI units is Ohm metre (Ωm). Resistivity is a specific property of a material and different materials have different resistivity.
🥁 विद्युत परिपथ (Electric Circuit)
विद्युतघटाच्या दोन्ही अग्रांमध्ये जोडलेल्या
वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग म्हणजे विद्युत परिपथ होय.
🔋Electric circuit
A continuous path of an electric
current through conducting wires connected to the two ends of a cell and other resistances is called an electric circuit.
🪂 खालील चित्रांमध्येकाय चूक आहे ते शोधा.
उत्तर:-
A आणि B:- आकृती A व B मधील विद्युत दिवा प्रज्वलित आहे. परिपथ पूर्ण नसताना विद्युत दिवा प्रज्वलित होऊ शकत नाही.
C:- परिपथ पूर्ण असतानाही विद्युत दिवा प्रज्वलित नाही, हे चुकीचे आहे.
D:- रबर हे विसंवाहक आहे, त्यामुळे बल्ब प्रज्वलित होणे शक्य नाही, हे चुकीचे आहे.
🎷Point out the mistakes in the figure below 👇
Ans:-
A & B :- In figure A and B though the circuit is incomplete the bulb glows, this is not possible.
C :- In figure C though the circuit is complete, the bulb does not glow.
D:- in figure D, rubber insulator is used and still the bulb glows , this is not possible.
These are the mistakes in above figure.
👇खालील चित्रात B, C, D मध्ये दिवे का पेटत नाहीत? कारण स्पष्ट करा.
🔥 Why are the bulbs in Figures B, C and D below not lighting up ?
😎 वाहक : ज्या पदार्थांची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतात. यांच्यातून सहजतेने विद्युतधारा वाहू शकते.
उदा. तांबे, ॲल्युमिनियम, सोने, चांदी., इत्यादी.
✨ Conductors : Those substances which have very low resistance are called conductors.
Current can flow easily through such materials.
Ex. Copper, aluminium, gold, silver, etc.,
🪘 विसंवाहक : ज्या पदार्थांची रोधकता खूप जास्त असते, म्हणजेच ज्याच्यातून विद्युतधारा वाहूच शकत नाही अशा पदार्थांना विसंवाहक म्हणतात.
उदा. रबर, प्लास्टिक, काच, कागद, लाकूड, इत्यादी.
🌚 Insulators : Those substances which have extremely high resistance and through which
current cannot flow are called insulators.
Ex. Rubber, plastic,paper,glass, wood, etc,.
*निर्णय व जबाबदारी या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.**लग्नाचा निर्णय व संसाराची जबाबदारी,**नोकरीचा निर्णय व नोकरीत टिकून राहण्याची जबाबदारी.**व्यवसायाचा निर्णय व तो चालवण्याची जबाबदारी.**घर बांधण्याचा निर्णय व सर्वांना सांभाळून घेण्याची जबाबदारी. यांतील गफलत बऱ्याचदा लक्षात येत नाही.**आपला दिवस आनंदी जावो.*🎷