सर्वधर्मीय ज्येष्ठांना मोफत तीर्थ दर्शनाची योजना 🎷


सर्वधर्मीय ज्येष्ठांना मोफत तीर्थ दर्शनाची  योजना 🎷

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 🎆

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  1. ज्येष्ठ नागरिकांना शासनातर्फे आनंदाची बातमी.
  2. या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
  3. प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाणार आहे. 
  4. निवड:- निवडीसाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. 
  5. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची पण परवानगी असणार आहे.
  6. कोटा:- प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येणार आहे.
  7. भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र म्हणजे एक सुखकर अनुभव. आपल्यासाठी तीर्थक्षेत्र म्हणजे मनशांती तसेच अध्यात्मिक पातळीसाठीचे उत्तम केंद्र.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 🥁

भारतातील एकूण 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

🪘 योजनेसाठी कागदपत्रे

  • अर्ज:- ऑनलाइन 
  • लाभार्थीचे आधार किंवा शनकार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला
  • उत्पन्न:- 2.50 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला किंवा पिवळे, केशरी रेशन कार्ड.
  • वैद्यकीय प्रमाणपत्र.


😎 या तीर्थस्थळांचा असेल समावेश.


मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत खालील तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

  • मुंबई, 
  • ठाणे, 
  • सोलापूर, 
  • कोल्हापूर, 
  • नांदेड, 
  • धाराशिव, 
  • छत्रपती संभाजी नगर, 
  • नाशिक, 
  • अहमदनगर. यासह महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे,
  • जम्मू आणि काश्मीर येथील वैष्णोदेवी, अमरनाथ गुहा,
  • पंजाब, 
  • दिल्ली, 
  • उत्तराखंड, 
  • उत्तर प्रदेश, 
  • ओडिशा, 
  • बिहार, 
  • आसाम, 
  • राजस्थान, 
  • गुजरात, 
  • मध्य प्रदेश, 
  • कर्नाटक, 
  • आंध प्रदेश, 
  • केरळ, 
  • तामिळनाडू, 
  • झारखंड, 


 • 🎻 तीर्थ दर्शनाच्या मोफत योजनेचा शासन निर्णय

60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना देशभरात तीर्थ दर्शनाच्या मोफत योजनेचा शासन निर्णय काढला आहे, ज्यामध्ये शासनाने तीन अटी ठेवल्या असून मुख्य अट म्हणजे लाभार्थीच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 तीर्थक्षेत्रांचे अ, ब, क वर्गांमध्ये वर्गीकरण केले असून एका व्यक्तीला एकाच वेळी लाभ घेता येणार असून त्याची कमाल खर्चाची मर्यादा (खर्चाची वरची मर्यादा) 30 हजार रुपये राहणार आहे.

यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन आणि निवारा यासह इतरही गोष्टींचा समावेश राहणार आहे. तीर्थ दर्शनाची इच्छा ज्येष्ठ नागरिकांच्या मनात असते. मात्र, आर्थिक परिस्थिती आणि इतर कारणामुळे तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होत नाही. मात्र, आता अशा ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड केली जाणार आहे.

🥀 योजनेचे अपात्र लाभार्थी 🙏

  1. आयकरदाता असणारे 
  2. सरकारी उपक्रम, मंडळ, भारत सरकार कर्मचारी किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तिवेतन घेणारे
  3.  विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार यांच्या कुटुंबातील व्यक्ती
  4. बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य असलेल्यांच्या कुटुंबातील व्यक्ती 
  5. ट्रॅक्टर सोडून कुटुंबीयांतील व्यक्तींकडे चारचाकी असल्यास,
  6. टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोबोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग
  7. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र नसल्यास
  8. पात्र उमेदवारांचा लॉटरीत नंबर निघाल्यानंतर आले नाही त्यांना पुन्हा लाभ दिला जाणार नाही.


                *आपली संगत आपले भविष्य घडवते.* 
                *तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोहचतात.*
               *पण जर डाळी सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते.*
              *आपण कोण आहोत ? यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत? हे जास्त महत्वाचे आहे…!!*

   *आपला दिवस आनंदी जावो.*🎷