9th, Energy Flow in an Ecosystem 1, 9 वी, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह 1.
🎷 परिसंस्था म्हणजे काय ?
उत्तर : एखादया परिसरात असणारे जैविक घटक (वनस्पती व प्राणी), अजैविक घटक (हवा, पाणी, जमीन) आणि त्यांच्यात होणाऱ्या आंतरक्रिया यातुन परिसंस्था बनते.
🪘 What is meant by ecosystem?
Ans. The biotic (plants 🌵 and animals 😽🐊) and abiotic factors (sun ☀️, air 🌬️, water 🌊) and their mutual interactions form an ecosystem.
✍️ परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते ?
उत्तर : जलीय परिसंस्था आणि भू परिसंस्था या दोन मुख्य परिसंस्था आहेत. यांचे पुढे अनेक उपप्रकार होतात. जसे, वाळवंटी परिसंस्था, जंगल परिसंस्था, सागरी परिसंस्था, गोड्या पाण्याच्या परिसंस्था इत्यादी.
🎻 Which are the different types of ecosystems?
Ans. There are two types of ecosystems, ex. Terrestrial ecosystem and aquatic ecosystem.
🐇 प्राथमिक भक्षक:-
- जे सजीव अन्नासाठी केवळ उत्पादकावर म्हणजेच वनस्पतीवर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात.
- प्राथमिक भक्षकांना शाकाहारी प्राणी असे पण म्हणतात.
- उदा:- ससा 🐇, नाकतोडा 🦗, खार 🐿️, हत्ती🐘, इत्यादी.
🐄 Primary consumers:-
- Those organisms directly depend upon autotrophs they are called primary consumers.
- Generally, primary consumers are all herbivorous animals.
- Ex- Insects🪲, Caterpillars🐛, grasshoppers🦗, cow🐮, rabbits🐇, etc.
🐍 द्वितीयक भक्षक:-
उदा. बेडूक 🐸, साप 🐍, कोळी 🕷️, अस्वल 🐻, मांजर 😽,घुबड 🦉,कोल्हा🦊 इत्यादी.
🐊 Secondary consumers: Organisms that eat primary consumers, or herbivores, are called Secondary consumers.
Ex. Frog 🐸, snakes🐍 , spiders 🕷️, bears 🐻, cats 😽 owl 🦉, fox 🦊,etc.
🐯 सर्वोच्च भक्षक:-
- सर्वोच्च भक्षक हे केवळ मांसाहारी प्राणी आहेत.
- जे प्राणी शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात त्यांना सर्वांचे भक्षक म्हणतात.
- अन्नसाखळीत सर्वोच्च भक्षक हे प्राणी सर्वोच्च स्थानी असतात.
- यांची नैसर्गिक शिकार होत नाही.
- उदा. वाघ 🐯, सिंह 🦁, गरुड, इत्यादी.
- 🦁Apex or top consumers:
- Organisms that sit at the top of the food chain and have no natural predators are called Apex or top consumers.
- These are all carnivores.
- No other animals feed on top consumers.
- Ex – Tiger 🐯, lion 🦁, egale, etc.
🐻 उभयाहारी:-
- हे प्राणी मिश्राहारी (शाकाहार🌿 व मांसाहार🐐) आहेत.
- हे प्राणी अन्नासाठी उत्पादक आणि द्वितीय भक्षक यावर अवलंबून असतात.
- उदा. मानव 🚶♂️, अस्वल 🐻, डुक्कर 🐖 इत्यादी.
🚶♀️Omnivores (Everything):-
- An organism that eats plants 🌿 and animals🐓 is called an omnivore.
- Organisms that Feed on herbivores, carnivores and Producers.
- Omniverse are also called mixed consumers.
- Ex. Humans🚶♂️, bear 🐻, pigs 🐖, etc.
⛓️ अन्नसाखळी:-
- उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यातील क्रमवार अंतरक्रिया म्हणजेच अन्नसाखळी होय.
- प्रत्येक साखळीत चार किंवा पाच पेक्षा अधिक कड्या असू शकतात.
- उदा. गवत –> ससा🐇 —>साप🐍 —> गरुड.
- Feeding relationships among producers, consumers and saprophytes in an ecosystem is called food chain.
- In food chain each chain consists of 4, 5 or more links.
🥅 अन्नजाळे:-
- जेव्हा परिसंस्थेमध्ये अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या गेलेल्या असतात तेव्हा अन्न जाळे तयार होते.
- अन्न जाळ्यात एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष असतो.
✍️ Food web:-
- Interconnected food chains in an ecosystem is called food web.
- A food chain is a series of organisms that eat one another so that energy flows from one to the next.
🎚️पोषण पातळी:-
- अन्नसाखळीतील प्रत्येक पातळी म्हणजे पोषण पातळी आहे.
- अन्नसाखळीतील अन्नप्राप्त करण्याचा प्रत्येक सजीवाचा स्तर त्या सजीवाची पोषण पातळी दर्शवते.
- The position of organism occupies in a food web is called tropic level.
- Each level of food chain is called a tropic level.