9 वी. विज्ञान

  9 वी विज्ञान 


आभासी प्रतिमा :- ची प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही व प्रत्यक्ष प्रकाश किरण एकमेकांना न भेटता ज्यावेळेस प्रतिमा तयार होते त्या प्रतिमेला आभासी प्रतिमा असे म्हणतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही आभासी , सुट्टी व पदार्थापेक्षा लहान असते असते.

वास्तव प्रतिमा :- जी प्रतिमा आरशासमोर मिळते व जी पडद्यावर घेता येते तिला वास्तु प्रतिमा असे म्हणतात.अंतर्गोल आरशाद्वारे वास्तु प्रतिमा मिळते.

प्रकाशाचे अभिसरण :- अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावरील एका बिंदूत एकवटतात यास प्रकाशाचे अभिसरण असे म्हणतात. 

प्रकाशाचे अपसरण :- बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावरील आरशाच्या मागील एका बिंदूतून अपसारीत म्हणजे दूर गेल्याचा भास होतो त्याच प्रकाशाचे अपसरण म्हणतात.

कार्टेशियन चिन्ह संकेताची 

काही गृहीतके.

कार्टिशियन चिन्ह संकेतानुसार मुख्य अक्ष हा X – अक्ष म्हणून घेतात.

आरशाचा ध्रुव P हा आरंभ बिंदू O मानतात.

कार्टिशन चिन्ह संकेत 

1. पदार्थ नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवावावा.

2. आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवा P पासून मोजावेत.

3. A. आरशाच्या आरंभबिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन + ve मानावेत

B. आरशाच्या आरंभबिंदूच्या डावीकडे Nothing अंतरे ऋण – ve मानावेत.

4. A. मुख्य पक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे धन + ve मानावेत.

B. मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे ऋण – ve मानावेत.

5. A. अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण असते . f  = – ve

B. बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर f धन + ve असते.

आरशाचे सूत्र

u – पदार्थाचे ध्रुवा P पासूनचे अंतर.

 v – प्रतिमेचे ध्रुवा P पासूनचे अंतर.

f – नाभीय अंतर

गोलीय आरशाद्वारे होणारे विशालन m 

h1 – पदार्थाची उंची

h2 – प्रतिमेची उंची

 m – विशालन.

वरील सूत्र अभ्यासण्यासाठी एक उदाहरण पाहू.

 🎷 15 cm नाभी अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर 7 cm उंचीची वस्तू 25 cm अंतरावर ठेवली. आरशापासून किती अंतरावर पडदा पडदा ठेवल्यास आपल्याला तिची स्पष्ट प्रतिमा मिळेल ? प्रतिमेचे स्वरूप आणि आकार स्पष्ट करा.