10 वी, विज्ञान I, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण I
आपल्या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील 👇 निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा.
काळाच्या ओघात काही संज्ञा/ व्याख्या आपण विसरून जातो किंवा त्या शब्दाचे अर्थ पूर्ण कळत नाहीत. या लेखात अभ्यासासोबत स्मृतीला उजाळा मिळेल. विज्ञानातील न बदलणाऱ्या गोष्टी आपण शिकणार आहोत जे की आपल्याला चिरकाल उपयुक्त ठरू शकतात. क्रमिक अभ्यासासोबत ज्ञानवृद्धी व्हावी हा हेतू.
☕ प्रथम मूलद्रव्य म्हणजे काय ? ते पाहू .
व्याख्या:– एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ व त्या पदार्थाचे इतके साधे- सोपे रूप ज्याचे अन्य कोणत्याही रूपात रासायनिक प्रक्रियेने विघटन करता येत नाही आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व अणु एकसारखे आहेत अशा पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. एकाच प्रकारच्या मूलद्रव्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असते उदा. हायड्रोजन 1 , सोडियम 11 अल्युमिनियम 13.
* अणुची रचना
मूलद्रव्याच्या अणु केंद्रकात धनप्रभारित प्रोटॉन p तर प्रभार रहित न्यूट्रॉन n असतात.अणु केंद्रका भोवती ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन e कक्षेत फिरत असतात.
*व्याख्या अणु :-
1. जो द्रव्याचे घटक गुणधर्म राखून ठेवतो अश्या लहानात लहान अतिसूक्ष्म , अविनाशी, कणांना अणु असे म्हणतात.
2. पदार्थाचे संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे अणु.
* द्रव्याचे प्रकार कोणते ?
भौतिक अवस्थेनुसार मूलद्रव्यांचे एकूण पाच प्रकार पडतात आपणास फक्त तीन स्मरणात राहतात
- स्थायू ,
- द्रव ,
- वायू पुढच्या दोन अवस्था म्हणजे
- प्लाझ्मा आणि
- बोस आईन्स्टाईन कंडेन्ससेट.
* मूलद्रव्यांचे प्रकार कोणते ?
भौतिक रासायनिक गुणधर्माच्या आधारे मूलद्रव्यांचे एकूण तीन प्रकार आहेत
- धातू (सोने ),
- अधातू (ऑक्सिजन) आणि
- धातुसदृश्य (सिलिकॉन) .
* धातुसदृश्य :- ज्या मूलद्रव्यांचे गुणधर्म धातू व अधातू सारखे असतात त्यांना धातुसदृश्य मूलद्रव्य म्हणतात.
उदा:- बोरॉन B ,
सिलिकॉन Si,
जर्मिनियम Ge ,
आरसेनेम As .
* अणुवस्तुमान A :- मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकातील प्रोटॉन p व न्यूटनच्या n बेरजेला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान असे म्हणतात.
उदा . ॲल्युमिनियम Al
p = 13
n = 14
ॲल्युमिनियम चा अणुवस्तुमान
= p+n
= 13+14
= 27.
* अणुअंक Z :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन p किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुअंक असे म्हणतात. सोडियमचा (Na) अणुअंक – 11
* युरेनियम ( 92) नंतरची सर्व मूलद्रव्य
(अणुअंक 93 ते 118) ही मानवनिर्मित आहेत.
ही मूलद्रव्ये किरणोत्सारी आहेत.
* डोबेरायनरची त्रिके :-1. जर्मन वैज्ञानिक (1817) डोबेरायनर ने तीन मूलद्रव्यांचा एक गट केला व त्या मूलद्रव्यांना त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले असता
2 मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान हा इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या बेरजेच्या अंदाजे सरासरी इतका आढळून आला.
✍️डोबेरायनर त्रिके दोष / त्रुटी :-
सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायणाच्या त्रिकामध्ये करता येत नाही कारण इतर दोन मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांची सरासरी अंदाजे मधल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाएवढी येत नाही.
* न्यूलँड्स चा अष्टकांचा नियम :-
1.इंग्लिश वैज्ञानिक (1866) न्यूलँड्स याने मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता,
2. संगीतातील अष्टका प्रमाणे प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्म प्रमाणे दिसून आले.
(टीप:-बहुसंख्य मुलं पहिला मुद्दाच लिहीत नाही, पहिल्या मुद्द्याला एक व दुसऱ्या मुद्द्याला एक असे दोन गुण असतात.)
* न्यूलँड्सच्या अष्टकांच्या नियमातील दोष /त्रुटी /मर्यादा :-
- न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम फक्त अणुअंक 20 , कॅल्शियम Ca पर्यंत लागू होतो.
- न्यूलँड्स ने काही भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्य एकाच गणात / स्वराखाली ( Do )ठेवली. उदा. कोबाल्ट Co व निकेल Ni या धातूंना न्यूलँड्स ने डो या स्वराखाली क्लोरीन Cl व ब्रोमीन Br या हॅलोजन बरोबर ठेवले.
- नंतर शोध लागलेल्या मूलद्रव्यांना न्यूलँडच्या अष्टकात सामावून घेण्याची क्षमता /व्यवस्था नाही .
🌈 मेंडेलीव्हचा आवर्ती नियम :-
रशियन वैज्ञानिक मेंडेलिव्ह ने मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमाना च्या चढत्या क्रमाने केली असता,
मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात.
(आवर्तीफल म्हणजे ठराविक अवधीनंतर मूलद्रव्यात गुणधर्मांची पुनरावृत्ती म्हणजेच सारखेपणा दिसून येणे.)
🦅 मेंडेलीव्हच्या आवर्तसारणी चे गुण /वैशिष्ट्ये :-
- मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा विचार करून अणुवस्तुमान तपासून पुन्हा योग्य करण्यात आले.
- उदा. बेरिलियमचे अणुवस्तुमान 14.09 बदलून 9.4 असे दुरुस्त केले व बेरिलियम Be ला बोरॉन B च्या आधीचे स्थान दिले.
- तीन जागा:- मेंडेलीव्हने त्याच्या आवर्त सारणीत तीन जागा रिक्त सोडल्या व जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून एका-बोरॉन , एका-ॲल्युमिनियम व एका-सिलिकॉन अशी नावे दिली पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागल्यावर त्यांना अनुक्रमे स्कॅनडियम Sc गॅलियम Ga व जर्मिनियम Ge अशी नावे देण्यात आली. विशेष बाब म्हणजे या 3 मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलीव्हच्या भाकीताशी जुळणारे होते.
- राज वायू:- त्याकाळी राज वायू माहीत नव्हते पण राज वायूचा शोध लागल्यावर मूळ आवर्तसारणीला धक्का न लागता “शून्यगण ” निर्माण केला व त्यात राज वायू बरोबर बसले.
🎻 मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी / दोष :-
- समान अणुवस्तुमान :- समान अणुवस्तुमान (59) असलेल्या कोबाल्ट Co व निकेल Ni या मूलद्रव्यांच्या स्थानाबद्दल मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होता होती.
- समस्थानिक :- अणुवस्तुमान भिन्न असूनही समस्थानिकांचा शोध लागल्यावर मेंडेलीव्हच्या मूळ आवर्त सारणीत समस्थानिकांना जागा देता येत नव्हती.
- भाकीत :- वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीनुसार शक्य नव्हते.
- H चे स्थान :- हायड्रोजन हा हॅलोजन (गण vii) सोबत साम्य दर्शवतो तसेच तो अल्क धातू (गण I )यांच्या गुणधर्मासोबतही साधर्म्य दाखवतो. गुणधर्मांचा विचार केल्यास हायड्रोजनची जागा हॅलोजन सोबत की अल्क धातूंच्या गणात हे ठरवता येत नाही.
* आधुनिक आवर्ती नियम :-
इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोजले यांनी मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केली असता
मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्तीफल असतात असे दिसून आले.
गण :-
आवर्तसारणीधल उभ्या स्तंभांना गण म्हणतात.
आवर्त :-
आवर्तसारणीमधील आडव्या ओळींना आवर्त म्हणतात.
18 गण व 7 आवर्त आहेत.
…इतना कुछ होते हुए भी
शब्दकोश में असंख्य शब्द होते हुए भी…
…मौन होना सब से बेहतर है।
…दुनिया में हजारों रंग होते हुए भी…
काला और सफेद रंग सब से बेहतर है।
…खाने के लिए दुनिया भर की चीजें होते हुए भी…
…उपवास शरीर के लिए सबसे बेहतर है।
…पर्यटन के लिए रमणीक स्थल होते हुए भी…
…पेड़ के नीचे ध्यान लगाना सबसे बेहतर है।
…देखने के लिए इतना कुछ होते हुए भी…
…बंद आँखों से भीतर देखना सबसे बेहतर है।
…सलाह देने वाले लोगों के होते हुए भी…
…अपनी आत्मा की आवाज सुनना सबसे बेहतर है।
…जीवन में हजारों प्रलोभन होते हुए भी…
…सिद्धांतों पर जीना सबसे बेहतर है।..