9th Work & Energy 2, 9 वी कार्य आणि ऊर्जा 2.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

9th Work & Energy 2, 9 वी कार्य आणि ऊर्जा 2.

आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी What’s App ग्रुपला सामील होण्यासाठी खालील👇 निळ्या लिंक 🔗 ला स्पर्श करा🙏.

👉 माहिती विज्ञानाची 🎷


✈️ ऊर्जा (Energy):-

व्याख्या:- ऊर्जा म्हणजे पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता. 

कार्य आणि ऊर्जेची एकके सारखीच

आहेत.

 SI पद्धतीत ऊर्जेचे एकक ज्यूल J व 

CGS पद्धतीत ऊर्जेचे एकक अर्ग (erg) आहे.

🥁 Energy:-

Definition:- The capacity of a body to perform work is called its energy.

The units of work and energy are the same. 

The unit of energy in SI system is joule J.

The unit of energy in cgs system is erg.


🪂 ऊर्जेची विविध रूपे कोणती?

  1. यांत्रिक ऊर्जा — अ) गतिज ऊर्जा, आ) स्थितिज ऊर्जा
  2. उष्णता ऊर्जा, 
  3. प्रकाश ऊर्जा, 
  4. ध्वनी ऊर्जा, 
  5. विद्युत चुंबकीय ऊर्जा, 
  6. रासायनिक ऊर्जा, 
  7. अणू ऊर्जा, 
  8. सौर ऊर्जा इत्यादी. 

🔫 Write different forms of energy?

  1. mechanical energy — A) kinetic energy, B) potential energy, 
  2. heat energy, 
  3. light energy, 
  4. sound energy,
  5. electro-magnetic energy,
  6. chemical energy, 
  7. nuclear energy and 
  8. solar energy, etc. 


🚗 अ) गतिज ऊर्जा:-

  1. व्याख्या:- ‘पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात.’
  2. गतीज ऊर्जेचे सूत्र = 1/2 mv^2
  3. गतिज ऊर्जेमुळे प्रत्यक्ष कार्य घडून येते. 
  4. गतिज ऊर्जा ही एकाच स्वरूपात असते.
  5. गतिज ऊर्जा ही कधीच शून्य नसते.
  6. उदा:- धरणातून वाहणारे पाणी.
🪨 आ) स्थितिज ऊर्जा
  1. व्याख्या:- ‘पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा संरुपणामुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात’.
  2. स्थितिज ऊर्जेचे सूत्र = mgh 
  3. स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर झाल्याशिवाय कार्य होत नाही.
  4. स्थितिज ऊर्जा ही विविध स्वरूपात असते. 
  5. स्थितिज ऊर्जा शून्य असू शकते.
  6. उदा:- ताणलेले धनुष्यबाण
🪘 वरील मुद्द्यांचा वापर करून आपणास स्थितिज ऊर्जा व गतिज ऊर्जा हा फरक लिहिता येतो.

📃 Kinetic energy
  1.  Definition:- ‘The energy which an object has because of its motion is called its kinetic energy’.
  2. Formula of kinetic energy  =  1/2 mv^2
  3. Kinetic energy causes actual work to be done. (For doing work kinetic energy does not have to be transformed into another form.)
  4. Kinetic energy occurs only in one form.
  5. Kinetic energy cannot be negative. 

📝 Potential energy
  1. Definition:- ‘The energy stored in an object because of its specific state or position or configuration is called its potential energy.’
  2. Formula of potential energy = mgh
  3. Work is not done till potential energy is transformed into kinetic energy.
  4. Potential energy is occurs in various forms.
  5. Potential energy can be zero.

🪘 Using the above points, we can write the difference between potential energy and kinetic energy.

💻 स्थितिज ऊर्जेचे समीकरण मिळवा:-
‘m’ एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ‘h’ एवढ्या उंचीवर नेण्यासाठी ‘mg’ एवढ्या बलाचा वापर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. 
या वेळी घडून आलेले कार्य पुढील प्रमाणे काढता येईल.
 कार्य = बल × विस्थापन
 W = mg × h. (इथे विस्थापन हे उंचीच्या रूपात आहे.)
 W = mgh
 विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली स्थितिज ऊर्जा = P.E. = mgh  ( इथे कार्य हे स्थितिज ऊर्जेच्या रूपात घडून येते W = P.E.)
विस्थापनामुळे mgh एवढी स्थितिज ऊर्जा वस्तूत सामावली जाते.

🏵️ Expression for potential energy
To carry an object of mass ‘m’ to a height ‘h’ above the earth’s surface, a force equal to ‘mg’ has to be used against the direction of the gravitational force. 
The amount of work done can be calculated as follows.
W = F s
Work = force x displacement
Here displacement is in the form of height.
 W = mg × h       ( F = mg )
 W = mgh
 The amount of potential energy stored in the object because of its displacement
P.E. = mgh (W = P.E.)
 Displacement to height h causes energy equal to mgh to be stored in the object.


🏀 ऊर्जा रूपांतरण (Transformation of Energy)

ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. 

उदाहरणार्थ दिवाळीतील फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जा ध्वनी, प्रकाश व उष्णता ह्या ऊर्जांमध्ये रूपांतरित होते.


👉 Transformation of Energy:-


Energy can be transformed from one type to another

Example:- The exploding

firecrackers convert the chemical energy stored in them into light, sound and heat energy.



🎷 ऊर्जा अक्षय्यतेचा नियम (Law of Conservation of Energy)

 ‘ऊर्जानिर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य राहते.’

उदा:- 


दोरा व नटबोल्ट घेऊन समान उंचीचे दोन दोलक तयार केले.

एक दोरा आधारकाला क्षितिजसमांतर बांधून घेतला.

तयार केलेले दोन्ही दोलक या क्षितिजसमांतर दोऱ्यास असे बांधले, की जेपुरेसे आंदोलित झाल्यावरती ते एकमेकांवर आदळणार नाहीत. दोन्ही दोलकांची उंची समान ठेवली. 

आता एका दोलकास दोलने दिली व थोडा

वेळ निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येईल, की पहिल्या दोलकाची दोलनगती कमी होत जाते त्याच वेळी स्थिर असलेला दोलक हळूहळू गतिमान होतो. म्हणजेच एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकास प्राप्त होते.


🥀 Law of Conservation of Energy:-

Energy can neither be created nor destroyed. It can be converted from one form

into another. Thus, the total amount of energy in the universe remains constant’.

Ex. 


Make two pendulums of the same length with the help of thread and two nuts. Tie another thread in the horizontal position.

Tie the two pendulums to this horizontal thread in such a way that they will not hit each other while swinging. 

Now swing one of the pendulums and observe.

We will see that as the speed of oscillation of the pendulum slowly decreases, the second pendulum which was initially stationary, begins to swing. Thus,

one pendulum transfers its energy to the other.


💐 मुक्तपतन (Free fall)

फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्तपतन असे म्हणतात.

✍️ Free fall

An object falling solely under the influence of gravitational force is

said to be in free fall or to be falling freely.


💪 शक्ती (Power)

व्याख्या:- ‘कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात.’

समजा, W हे कार्य t या वेळेत होत असेल तर


शक्ती  = कार्य  / काल

P = W / t

कार्याचे SI एकक J आहे म्हणून शक्तीचे एकक J / s असे आहे.

यालाच वॅट W असे म्हटले जाते.

1 वॅट = 1 ज्यूल / सेकंद

औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती (Horse Power) या एककाचा वापर प्रचलित आहे.

1 अश्वशक्ती = 746 वॅट

🌿 किलोवॅट तास व ज्यूल संबंध लिहा.

व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास हे आहे.

1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रतिसेकंद या प्रमाणे केलेले कार्य

1 kW hr = 1 kW × 1hr

    = 1000 W × 3600 s

    = 3600000 J

1 kW hr = 3.6 × 10^6 J


📝 घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही kW hr या एककातच मोजली जाते.

1 kW hr = 1 Unit


👊 Power

Definition:- ‘Power is the rate at which work is done.’

If W amount of work is done in time t then,

Power= Work / Time 

P = W / t

In SI system the unit of work is J, so the unit of power is J/s. This is called watt W.

1 watt = 1 joule / 1 second

In the industrial sector the unit used to measure power is called ‘horse power.’

1 horse power = 746 watt.

The unit of energy for commercial use is kilo watt

hour (k W h).

1000 joule work performed in 1 second is 1 kilowatt power.

🎻 Relation between kW h & joule

1 kW h = 1 kW × 1hr

 = 1000 W × 3600 s

 = 3600000 J

1 kW h = 3.6 × 10^6 J

Electricity used for domestic purposes is measured

in units of kilowatt hour.

1 kW h = 1 unit


😎 परिचय शास्त्रज्ञांचा:-

स्कॉटलंडचे वैज्ञानिक जेम्स वॅट

(1736-1819) यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली. जेम्स वॅट यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला

वॅट हे नाव देण्यात आले आहे.

अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅटनी केला होता.


🌜 An introduction to scientists

The steam engine was

invented in 1781 by the

Scottish scientist James

Watt (1736 – 1819). This

invention brought about an

industrial revolution. The

unit of power is called Watt

in his honour. James Watt

was the first to use the term

horse-power’.


*☘️🥁☘️*

*माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक “निंदक” आणि दुसरा “स्पर्धक” कारण दोन्ही व्यक्ती माणसात “जिद्द” निर्माण करत असतात.*

🌸*आपला दिवस आनंदात जावो 🎷🌸