शालेय परिपाठ 🎷


 शालेय परिपाठ 🎷


आपल्या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील🔗 लिंकला👇 स्पर्श करा.

🥁 52 सेकंदात राष्ट्रगीत व्हावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, महाराष्ट्र गीत हे सावधान स्थितीतच म्हणावेत यावेळेस हालचाल टाळावी.

भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ हे कवी आणि नाटककार रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखनातून घेतले आहे. भारताच्या राष्ट्रगीताच्या ओळी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘भारतो भाग्यो बिधाता‘ या गाण्यातून घेण्यात आल्या आहेत.  मूळ  गीत बंगाली भाषेतील आहे.


👏 राष्ट्रगीत

जनगणमन-अधिनायक जय हे

भारत-भाग्यविधाता । 

पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,

 द्राविड, उत्कल, बंग, 

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, 

उच्छल जलधितरंग, 

तव शुभ नामे जागे, 

तव शुभ आशिस मागे,

 गाहे तव जयगाथा, 

जनगण मंगलदायक जय हे, 

भारत-भाग्यविधाता ।

 जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ।।

———-##———

प्रतिज्ञा

भारतीय राष्ट्रीय प्रतिज्ञा पिडीमरी वेंकट सुब्बा राव यांनी रचली होती. तेलगू भाषेतील प्रसिद्ध लेखक आणि नोकरशहा असलेल्या सुब्बाराव यांनी 1962 मध्ये विशाखापट्टणमचे जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून काम करताना प्रतिज्ञा तयार केली. सुब्बा राव यांचा जन्म अनेपार्टी, नालगोंडा जिल्हा, तेलंगणा येथे झाला होता. ते तेलुगू, संस्कृत, हिंदी, इंग्रजी आणि अरबी भाषांचे तज्ञ होते.भारतीय राष्ट्रीय प्रतिज्ञा ही सामान्यतः भारतीय सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, अनेक भारतीय शाळांमधील दैनंदिन संमेलनांमध्ये आणि स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या समारंभांमध्ये वाचतात.

÷÷÷÷÷÷÷××××÷÷÷÷÷

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे. 

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे. 

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.

——–@@————

प्रतिज्ञा


भारत मेरा देश है।

 सभी भारतीय मेरे भाई- बहन हैं।

मुझे अपने देश से प्यार है।

 अपने देश की समृद्ध तथा विविधताओं से विभूषित परंपराओं पर मुझे गर्व है ।

मैं हमेशा प्रयत्न करूँगा / करूँगी कि उन परंपराओं का 

सफल अनुयायी बनने की क्षमता मुझे प्राप्त हो ।

मैं अपने माता-पिता, गुरुजनों और बड़ों का सम्मान करूँगा / करूँगी 

और हर एक से सौजन्यपूर्ण व्यवहार करूँगा / करूँगी ।

मैं

 प्रतिज्ञा करता/करती हूँ कि मैं अपने देश और अपने देशवासियों के प्रति निष्ठा रखूँगा/ रखूँगी । 

उनकी भलाई और समृद्धि में ही मेरा सुख निहित है।

———-∆∆————

PLEDGE


India is my country. 

All Indians are my brothers and sisters.

I love my country, 

and I am proud of its rich and varied heritage. 

I shall always strive to be worthy of it.

I shall give my parents, 

teachers and all elders 

respect, and treat everyone 

with courtesy.

To my country 

and my people, 

I pledge my devotion.

 In their well-being and prosperity alone 

lies my happiness.

________×××_________

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, 

भारताचे एक सार्वभौम 

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा 

व त्याच्या सर्व नागरिकांसः

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

 व उपासना यांचे स्वातंत्र्य; 

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा 

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा 

व राष्ट्राची एकता आणि एकात्मता 

यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत 

आज दिनांक 26 नोव्हेंबर, 1949 रोजी 

या‌द्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

———÷÷————

भारत का संविधान


उद्देशिका

हम, भारत के लोग, 

भारत को एक संपूर्ण 

प्रभुत्व-संपन्न समाजवादी पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए, 

तथा उसके समस्त नागरिकों को :

सामाजिक, आर्थिक और राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म

और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर की समता

प्राप्त कराने के लिए, तथा उन सब में

व्यक्ति की गरिमा 

और राष्ट्र की एकता 

और अखंडता सुनिश्चित करने वाली

 बंधुता बढ़ाने के लिए

दृढ़संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में आज तारीख 26 नवंबर, 1949 ई. (मिति मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत् दो हजार छह विक्रमी) को एतद् द्वारा इस संविधान को अंगीकृत, अधिनियमित और आत्मार्पित करते हैं ।

_______××__________

🎻 The Constitution of India


      Preamble


WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens:

JUSTICE, social, economic and political;

LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;

EQUALITY of status and of opportunity; and to promote among them all

FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation;

IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.


₹₹₹₹₹₹——₹₹₹₹₹

मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत प्रतिज्ञा व संविधान साठी पुढील लिंक 🎻


👉 संविधान व प्रतिज्ञा 🎷


““““||||“““


जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून घोषित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत लागू करण्यात आले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे.

शाहीर साबळे यांनी गायलेलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं 

गीतकार राजा बढे यांनी लिहिलं आहे. तर श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार🎻🪘🥁🎷 आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे.

~~~~~~~•••••~~~~~~~

🎆  राज्यगीत


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।धृ।।


भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा 

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा 

दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

 जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।१।।


काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

 पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी

 दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला

 दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ।।२।।


_______₹₹____

🙏  प्रार्थना

वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळी प्रार्थना घेतली जाते. काही शाळेत दररोज वेगळी प्रार्थना ही घेतली जाते.प्रार्थना ही शाळेप्रमाणे असते, तरी ईथे 3 प्रार्थना इथे देत आहे. 

इतनी शक्ति हमे देना दाता


इतनी शक्ति हमे देना दाता,

 मन का विश्वास कमजोर हो ना

 हम चले नेक रस्ते पे हम से, 

भूलकर भी कोई भूल हो ना ।


दूर अज्ञान के हो अंधेरे, 

तु हमें ज्ञान की रोशनी दे 

हर बूराई से बचके रहें हम,

 जितनी भी दे भली जिन्दगी दे 

बैर हो ना किसी का किसी से, 

भावना मन में बदले की हो ना.


हम ना सोचें हमें क्या मिला है,

 हम ये सोचें किया क्या है अर्पण

 फूल खुशियों के बाँटे सभी को 

सबका जीवन ही बन जाये मधुबन

 अपनी करूणा का जल तू बहा के,

 कर दे पावन हर एक मन का कोना ।

———-&&——

तू बुद्धि दे तू तेज दे

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे


हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास


जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे


सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

—-###—-

🎆 नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा

सत्यम शिवम सुंदरा ।। धृ ।।

शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे ।

प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा ।

ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। १ ।।

विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास ।

नाव नेई पैलतीरी दयासागरा ।

ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। २ ।।

होऊ आम्ही नितीमंत, कला गुणी, बुद्धीमंत ।

कीर्तीचा कळस जाई, उंच अंबरा ।

ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। ३ ।।

—–////——-

🪘  खरा तो एकची धर्म 

 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित

तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे


जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती

तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे


समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा

अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे


सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल

तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे


कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवाव

समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे


प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी

कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे.


”’::::::::::::::::::::::”’

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे


धर्म जाती प्रांत भाषा, द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगू दे अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे


भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे


लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे, जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

———+++—

तेरी पनाह में हमें रखना

सीखें हम नेक राह पर चलना

तेरी पनाह में हमें रखना

सीखें हम नेक राह पर चलना

मिला उजाला लेकिन काली रात ना अब तक पीछा छोड़े

मिला उजाला लेकिन काली रात ना अब तक पीछा छोड़े

मुझ से दो क़दम आगे मेरा

मुझ से दो क़दम आगे मेरा

पिछला कर्म सदा क्यूँ दौड़े? ओ-ओ

ख़ारिज गुनाह से हमें रखना

तेरी पनाह में हमें रखना

तेरी पनाह में हमें रखना

सीखें हम नेक राह पर चलना.

—-&&—

✍️  सुविचार 

सुविचार हा कागदावर न पाहताच सांगावा.

  1. वागण्यात खोटेपणा नसला की, जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.
  2. कुणालाच कमी समजू नका, ज्याला तुम्ही काच समजत असाल, तो हिरा सुद्धा असू शकतो.
  3. कष्ट ही एक अशी चावी आहे, जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते.
  4. जो काळानुसार बदलतो, तोच नेहमी प्रगती करतो.
  5. काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.
  6. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही, ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.

🪨 वाया घालवलेला वेळ

आपलं भविष्य बिघडवत असतो.

🔗 दोष लपवला की तो मोठा होतो

आणि कबूल केला की नाहीसा होतो.

🌜 जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या,

चांगलं वागणं कधीच सोडू नका,

विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

👊 आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत

सुखी राहण्याचा प्रयत्न करा,

दुःखी राहिल्याने

उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत, उलट

आजचे सुख सुद्धा निघून जाईल.

🎻 नेहमी उच्च ध्येय ठेवा, व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.

☕ आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे. …

🪂 आपल्या जीवनातील प्रत्येक अपयश हे एक नवीन शिकवण आहे. …

🌿 आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही थांबू नका. …

🥀 आपल्या जीवनाची दिशा स्वतः निर्धारित करा.


✈️ दररोजच्या अराजकीय बातम्या सादर कराव्यात. 

🏵️ परिपाठामध्ये आपण कोडे सादर करू शकतो. मोजकीच पण चांगली कोडे मुलांना विचारावे. मुलांनी उत्तर दिल्यावर त्याच कोड्याचे उत्तर आपण स्वतःही द्यावे, म्हणजे कोडे इतरांना छान समजायला मदत होते.

✈️  आता आपण काही कोडे पाहू 

1. लोक मला खाण्यासाठी विकत घेतात पण, मला खाऊ शकत नाहीत. सागा मी कोण?

उत्तर:- चमचा

2. दोन अक्षरी माझे नाव, नाही मला चव, नाही मला रंग, ओळखा मी कोण?

 उत्तर:- पाणी

3) जेव्हा मी उंच, तेव्हा मी तरुण, जेव्हा मी म्हतारी, तेव्हा मी लहान, सागा मी कोण?

उत्तर =मेणबत्ती

4) दळणवळणाचे साधन आहे मी, दोन पायांचे वाहन आहे मी, पाय फिरवावे लागतील गोल, धावाल सुसाट सांभाळून तोल, रस्त्यात येताच वाजली घंटी, हवा प्रदूषणाची  उडवेल दांडी, सांगा पाहू मी कोण? 

उत्तर:- सायकल

5.  तु माझा भाऊ आहेस, पण मी तुझा भाऊ नाही. सांगा पाहु कोण?

 उत्तर:- तुझी बहीन

 6. मी एका हत्तीच्या आकाराची आहे, परंतु माझे वजन काहीही नाही, सांगा पाहू मी काय आहे?

 उत्तर:- हत्तीची सावली

——————————-

📝 दररोजचे दिनविशेष सांगावे. 

===××=====

🥁 शास्त्रज्ञांचा अल्प परिचय करून द्यावा. 

(दोन ते तीन मिनिटांच्या वर कोणतीही माहिती सांगू नये. महत्त्वाचे तेवढे सांगावे. मुलांचे लक्ष वेधले जाईल अशी शब्दरचना असावी.)

^^^^^°°°°°^^^^

💻   बोधकथा

 एखादी बोधकथा सांगावी . बोधकथा ही कागद न पाहता सांगता आली तर अत्यंत उत्तम.

°°°°°°^^^°°°°

😌 🧘 मौन

  एक ते दोन मिनिटांचे मौन घ्यावे. 

$$$$$$°°°°$$$$

✍️ पसायदान 

एक ओळ मुलं व दुसरी ओळ मुली याप्रमाणे घेतल्यास खूप छान परिणाम साधला जातो.

••••••√√√•••••

 👉 महत्त्वाचे म्हणजे परिस्थितीप्रमाणे ज्या गोष्टी घेता येतील त्या घ्याव्यात. शिक्षकांची कल्पकता इथे कामाला येते. मुलांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण होईल असे प्रयत्न करावेत.

ππππππ××××πππππ

😀 😆🤣 एखादा चांगला, कोणाचेही मन न दुखावणारा विनोद सांगता आला तर उत्तम.


*****—****


इयत्ता नुसार मुलांची प्रतिभा वाढावी असे प्रयत्न करावेत.

भारत माता की जय🙏