मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी सांघिक ऐतिहासिक कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले.
भारतासाठी मिश्र सांघिक ब्राँझ मेडल 🙏🎷
कालची बातमी होती मनू-सरबज्योत ‘कांस्य’ च्या शर्यतीत, कालच्या या बातमीचे आज आनंदाच्या बातमीत रूपांतर झाले.
पॅरिस ऑलिम्पिक गेम्स मध्ये मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक ब्राँझ मेडल जिंकले.
भारतीय जोडीने 16-10 ने कोरियन जोडीला हरवले.
ऑलम्पिक शूटिंगमध्ये भारताला एकूण सहा पदक मिळाले आहेत.
मनू ने याच महिन्यात 28 जुलै ला पॅरिस ऑलिम्पिक मध्ये दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात कास्यपदक जिंकले होते. अंतिम फेरीत मनू ने एकूण 221.7 गुण मिळवून प्रथमच कास्यपदक प्राप्त केले होते.
2020 च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिचे पिस्तूल तुटले होते त्यामुळे तिला पदक जिंकता आले नाही.
प्ले ऑफमध्ये दक्षिण कोरियाचा पराभव करून या जोडीने भारतासाठी दुसरे पदक जिंकले.
विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे भारताच्या इतिहासात एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली खेळाडू ठरली.
भारतीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांनी X वर लिहिले “आमचे नेमबाज सतत आमचा अभिमान वाढवत आहेत”.
आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे
2 ऑगस्ट रोजी 25 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेत मनू भाकर भाग घेईल. मनू ने जर यात पदक मिळवले तर ती पहिली भारतीय अशी खेळाडू ठरेल जिने तीन ऑलिम्पिक पदके एकाच ऑलिंपिक मध्ये जिंकले. सर्व भारतीय यासाठी मनोमन प्रार्थना नक्कीच करतील.
Good luck for the third Medal.
अभिनव बिंद्रा यांनी ‘X’ वर एक पोस्ट केली, त्यात त्यांनी लिहिले आहे की, ” मनु आणि सरबजोत: तुम्ही ते केले आहे जे यापूर्वी कोणत्याही भारतीय नेमबाजी जोडीने केले नाही. भारताचे पहिले ऑलिम्पिक नेमबाजी संघ पदक. या क्षणाचा आनंद घ्या, तुम्ही ते मिळवले आहे! अभिमान आहे,”
*मित्र गरज म्हणून नाही,
तर सवय म्हणून जोडा…!*
*कारण “गरज” संपली जाते, पण “सवयी” कधीच सुटत नाहीत…!!*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷