NMMS परीक्षा 🎷


 NMMS परीक्षा 🎷

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

National Means-cum Merit Scholarship scheme examination.

हेतू:- समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान व विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करणे.

परीक्षेचे वैशिष्ट्ये:- वजा गुण पद्धतीचा अवलंब केला जात नाही. 

1️⃣ पेपर 1

बौद्धिक क्षमता चाचणी 

(MAT – Mental Ability Test)

गुण – 90 

वेळ – 90 मिनिटे 

सकाळी 10.30 ते 12.00

2️⃣ पेपर 2

शालेय क्षमता चाचणी 

( सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे व गणित)

SAT – Scholastic Aptitude Test 

गुण – 90 

वेळ – 90 मिनिटे 

दुपारी 1.30 ते 3.00

🏅 पात्रता गुण 

खुला वर्ग – 40 % 

ST/SC व दिव्यांग – 32 %

शिष्यवृत्ती:- परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी दरमहा 1000 ₹ एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.

दरवर्षी NMMS परीक्षे नंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाते, त्यानुसार शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्यांनी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बॉल पेन ने रंगवावे.

☝️NMMS परीक्षेसाठी विषय 

A) बौद्धिक क्षमता चाचणी 

MAT – Mental Ability Test

मानसशास्त्रीय चाचणीवर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न.

सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

B) शालेय क्षमता चाचणी  (SAT)

शालेय क्षमता चाचणीसाठी सामान्यतः इयत्ता सातवी व इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात. 

1. सामान्य विज्ञान 

a) भौतिकशास्त्र – 11 गुण 

b) रसायनशास्त्र – 11 गुण

c) जीवशास्त्र – 13 गुण

एकूण = 35 गुण 

2. सामाजिक शास्त्र 

a) इतिहास – 15 गुण

b) नागरिकशास्त्र – 05 गुण

c) भूगोल – 15 गुण

एकूण = 35 गुण 

3. गणित – 20 गुण

SAT = 35 + 35 + 20  =  90

📋 अट 

NMMS परीक्षेसाठी इयत्ता 8 वी मधील विद्यार्थी हा महाराष्ट्रातील शासकीय, शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिकणारा विद्यार्थी असावा.

सदर विद्यार्थ्यास इयत्ता सातवी मध्ये कमीत कमी 55% गुण असावेत. ( SC/ST साठी किमान 50 टक्के गुण असावेत.)

विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे रुपये 3,50,000 पेक्षा जास्त नसावे.


📖  तयारी अभ्यासाची:-

 त्याग करायला शिका.

मोबाईल, टीव्ही व इतर वायफळ गप्पा या गोष्टीत वेळ वाया घालू नका.

  1. इयत्ता 7 वी व इयत्ता 8 वी वरील अभ्यासक्रमावर NMMS परीक्षा असल्यामुळे या परीक्षेची तयारी इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी सुरू करावी. सातवीच्या अभ्यासासोबतच आठवीतील विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा अभ्यास सुरू करावा. 
  2. या विषयांच्या तयारीसाठी आठवी पास झालेल्या विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके या मुलांना शिक्षक सहज देऊ शकतात.
  3. मुख्य परीक्षेच्या एक महिना अगोदर  विद्यार्थ्यांनी कमीत कमी 90 गुणांच्या दोन तरी संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे आहे.
  4. प्रश्नपत्रिका वाचत बसू नये, त्या ऐवजी पहिल्या प्रश्नापासूनच प्रश्न सोडविण्यास सुरुवात करावे. 
  5. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर आले नाही तर त्यासाठी जास्तीचा वेळ देत बसू नये. ताबडतोब पुढचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात करावे. व त्याच प्रश्नाचे पर्यायी उत्तर वर्तुळ रंगवावेत. 
  6. सराव नसलेल्या विद्यार्थ्यांना MAT परीक्षेसाठी वेळ कमी पडतो.
  7. (Negative marking system नसल्यामुळे शेवटच्या कालावधीत…..⚫🔫🔫⚫🔫⚫🔫🎯)

वेळेचे नियोजन कसे करावे व अभ्यास नेमका कसा करावा हे समजून घेण्यासाठी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात दिलेले मार्गदर्शन कृपया वाचावे. जरी ते इयत्ता पाचवी सठी गृहीत धरून लिहिले तरीही आपणास त्याचप्रमाणे नियोजन करता येते. कारण कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचे असेल तर वेळेचे नियोजन जमले पाहिजे.

https://studyforbrain39.blogspot.com/2024/08/blog-post.html


✍️ NMMS शिष्यवृत्ती संदर्भात अधिक माहिती मिळवायची असेल तर खालील👇 लिंकला स्पर्श करा.

htpps://www.mscepune.in


*जिथे प्रश्नपत्रिका 

काढलेली नाही,

 आदर्श उत्तरांचा नमुना 

उपलब्ध नाही, 

अभ्यासक्रमही अज्ञात आहे, 

अशी परीक्षा म्हणजे

 मानवी जीवन.*

आपला दिवस आनंदात जावो 🎷

👏 आपल्या विज्ञान विषयक माहिती साठी खालील What’s App group जॉईन करावा.🙏


WhatsApp Group


Join Now